✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

योद्धा

क — कर्नलतपस्वी, Mon, 09/18/2023 - 08:48
दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही, घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही. . वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो, जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही. . हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली, अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. . सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती, जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही. . सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती, श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही. . कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही - कवी योगेश

प्रतिक्रिया द्या
3117 वाचन

💬 प्रतिसाद (6)

दुर्दम्य आत्मविश्वास आणी इच्छाशक्तीच....

कर्नलतपस्वी
Mon, 09/18/2023 - 09:09 नवीन
खरी शक्ती,यानेच कित्येकदा नियती सुद्धा हार मानते. अशाच एका योद्ध्याची घमासान लढाई मध्ये लढताना केलेली आणखी एक शब्द रचना. शब्द येतात कविता घेऊन आजारी असताना माणसं येतात, डझनभर केळी घेऊन, किती असतात कोण जाणे, आलेली आपण होऊन.।। भेटताना ही येतात, हातावरती वेळ बांधुन, जाताना मात्र म्हणतात, परत येऊ वेळ घेऊन.।। कोणी आणतात फुलं पानं, क्षण जातात सुगंधात न्हाऊन , मळभ दाटलेले विरु लागते, जातात वृत्ती स्वच्छ होऊन.।। आलं कोणी भेटायला की, डॉक्टर तेंव्हाच जातात पाहुन , गर्दी कमी करण्यासाठी, जातात मोठ्ठं इंजेक्शन देऊन.।। सगळ्यांच्या शुभेच्छांनी, आजार जातो बरा होऊन, उमटतात त्याच्या पाऊलखुणा, अन शब्द येतात कविता घेऊन.।।
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Mon, 09/18/2023 - 09:13 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

दोन्ही रचना आवडल्या.

चित्रगुप्त
Tue, 09/19/2023 - 02:24 नवीन
दोन्ही रचना आवडल्या.
  • Log in or register to post comments

आवडल्या.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 09/19/2023 - 12:01 नवीन
आवडल्या.
  • Log in or register to post comments

दोन ओळींना लयीत बसवायचा नम्र प्रयत्न

धष्टपुष्ट
Fri, 01/05/2024 - 15:06 नवीन
घेउनी जखमा उरी,फिरलो कसा ठाऊक नाही./ घेउनी व्रण ते उरी, फिरलो कसा ठाऊक नाही . अंधारल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. जिंकताना नेमके, हरलो कसा ठाऊक नाही. कटिबद्ध होती ती, नि होता विपुल तीचा शस्त्रसाठा/ बांधली होती कटी अन् विपुल होता शस्त्रसाठा
  • Log in or register to post comments

कविता आवडली. हॉस्पिटलचा हा

विवेकपटाईत
Fri, 01/05/2024 - 18:18 नवीन
कविता आवडली. हॉस्पिटलचा हा अनुभव अनेकदा भिग्ला आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा