योद्धा

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
18 Sep 2023 - 8:48 am

दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही,
घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही.
.
वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो,
जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही.
.
हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली,
अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही.
.
सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती,
जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही.
.
सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती,
श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही.
.
कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता
नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही

- कवी योगेश

आयुष्याच्या वाटेवरआशादायकदुसरी बाजूआरोग्य

प्रतिक्रिया

खरी शक्ती,यानेच कित्येकदा नियती सुद्धा हार मानते. अशाच एका योद्ध्याची घमासान लढाई
मध्ये लढताना केलेली आणखी एक शब्द रचना.

शब्द येतात कविता घेऊन
आजारी असताना माणसं येतात,
डझनभर केळी घेऊन,
किती असतात कोण जाणे,
आलेली आपण होऊन.।।

भेटताना ही येतात,
हातावरती वेळ बांधुन,
जाताना मात्र म्हणतात,
परत येऊ वेळ घेऊन.।।

कोणी आणतात फुलं पानं,
क्षण जातात सुगंधात न्हाऊन ,
मळभ दाटलेले विरु लागते,
जातात वृत्ती स्वच्छ होऊन.।।

आलं कोणी भेटायला की,
डॉक्टर तेंव्हाच जातात पाहुन ,
गर्दी कमी करण्यासाठी,
जातात मोठ्ठं इंजेक्शन देऊन.।।

सगळ्यांच्या शुभेच्छांनी,
आजार जातो बरा होऊन,
उमटतात त्याच्या पाऊलखुणा,
अन शब्द येतात कविता घेऊन.।।

कुमार१'s picture

18 Sep 2023 - 9:13 am | कुमार१

आवडली.

चित्रगुप्त's picture

19 Sep 2023 - 2:24 am | चित्रगुप्त

दोन्ही रचना आवडल्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Sep 2023 - 12:01 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडल्या.

घेउनी जखमा उरी,फिरलो कसा ठाऊक नाही./
घेउनी व्रण ते उरी, फिरलो कसा ठाऊक नाही
.
अंधारल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही.

जिंकताना नेमके, हरलो कसा ठाऊक नाही.

कटिबद्ध होती ती, नि होता विपुल तीचा शस्त्रसाठा/
बांधली होती कटी अन् विपुल होता शस्त्रसाठा

विवेकपटाईत's picture

5 Jan 2024 - 6:18 pm | विवेकपटाईत

कविता आवडली. हॉस्पिटलचा हा अनुभव अनेकदा भिग्ला आहे.