चाटूगिरी

(गफ)

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
27 May 2019 - 8:09 pm
वावरपाकक्रियाविडंबनविनोदआईस्क्रीमकृष्णमुर्तीमौजमजाganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआता मला वाटते भितीकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगणेश पावलेगरम पाण्याचे कुंडचाटूगिरीजिलबीटका उवाचफ्री स्टाइलरतीबाच्या कविताविडम्बनहट्ट

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
29 Apr 2019 - 4:20 am

एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???

पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे.
चुस्त, मस्त, व्यस्त ....
चतुर, धाडसी, जबरदस्त ...
नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत.

संस्कृतीइतिहासबालकथाबालगीतविडंबनविनोदसमाजजीवनमानकालवणव्यक्तिचित्रणराजकारणमौजमजाआता मला वाटते भितीइशाराकालगंगाकाहीच्या काही कविताचाटूगिरीजिलबीबालसाहित्यहट्टकरुण

(दाराआडची आंटी)

मार्कस ऑरेलियस's picture
मार्कस ऑरेलियस in जे न देखे रवी...
4 Apr 2019 - 3:10 pm

एक आंटी दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
फोटोरुमच्या बाहेर, एडिटिंग्च्या टेब्लावर
जिथे एक मुलगा बसला आहे एडिटिंग करत....
करत असेल का तो खरेच एडिटिंग ?
की पहात असेल तो
हिडन कॅमेराचे लाईव्ह फीड, लपवलेल्या टॅबमागे?

आंटी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
मग ती त्यालाच बोलावते फोटो रुम मध्ये,
ते डोळे डोळ्यात भरुन घेऊन
मुलगा खाडकन जागा होतो ....
भान हरवलेली आंटी
निसरड्या रस्त्यावरुन घसरत रहाते एकेक पाऊल...
घसरतच राहते....

-"जिंदा दिल"(चा एक फॅन )

प्रेमकाव्यकोडाईकनालगट्टेचाटूगिरीनागद्वारशृंगार

बडव्यांची दुनिया

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
15 Jan 2019 - 5:43 pm

प्रस्तावना

जंगलावर राज्य करायचं असेल

तर खबरीलाल पोपट पाळून चालत नाही

त्यासाठी सिंव्ह पाळावा लागतो

हा सिंव्ह आपल्यासमोर उभा आहे

फक्त आपल्या किमतीचा भाव जुळावा लागतो

-----------कविता -------

धूर दिसे , काहीही नसे

पोपट करी जो त्रागा

शिकाऱ्यास तो असे भासवे

जणू तोच जीवनधागा

जंगल मंगल पोपटामुळे

पोपट किती रे चपळ

हा नसता तर अवघड असते

पेलले नसते जंगल

बित्तम्बातमी अशी आणतो

जंगलाची जणू नस जाणतो

पोपट पोपट करी शिकारी

काहीच सुचे ना त्याला

चाटूगिरीजीवनमानडावी बाजू