user

चारोळ्या

अघटीत

सूर्य गारठला, चंद्र विझला

जेव्हा माणसाने माणुसकीचा बळी दिला...

तारे हरपले, अवकाश संपले,

जेव्हा प्रेम हृदयाला सोडून गेले...

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा

आज पुन्हा एकदा
चींब पावसात भिजुन घेतल
तेवढच ओझ्या मनाला
हलक करुन टाकल

मनमुराद रडाव वाटत
ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत
जळेल सारी वस्ती म्हणुन
ठसका काढुन उठाव लागत

मग काय?
आज पुन्हा एकदा
चींब पावसात भिजुन घेतल
तेवढच ओझ्या मनाला
हलक करुन टाकल

fsdfs

चार ओळी मनापासुन...

दूर कोठेतरी कोण तो छेडी मारवा
साद आर्त घालुनी आठवितो प्रियेला
ओढ वेडी का अशी लागते जीवाला
चांदण्यांच्या फेरयात चंद्र शोधतो कुणाला??

४ चारोळ्या

आताशा डोळ्यात
आषाढमेघ येऊन वसलाय
मनात मात्र माझ्या
वैशाखवणवा पेटलाय

*********
तुझी जागा मनामध्ये
अपुरीच राहिली
फुल खुडलेल्या देठाला का
कधी पुन्हा कळी आली?

*********
प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

*********
माणसे तशीच राहतात
युग फक्त सरते
महाभारतातली द्रौपदी
कलियुगातही झुरते

सुरेश नायर

https://sites.google.com/site/surmalhar/

मन.....

मूसळधार पावसात.....
अंग चिंब चिंब भिजले
भिजलेल्या अंगातील.....
मन मात्र तहाणलेलेच राहीले.

~ स्पंदन ~

!! चारोळ्या !!

हा आमचा एक प्रयत्न... आवडला तर सांगा, नाही आवड्ला तरी सांगा..

तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

*******************

चिमण्याची चिमणी कुठेतरी हरविली
चिमणा व्याकुळतेने तडफड्ला
चिमणी शोधुनही नाही मिळाली
मग चिमण्यानेही प्राण सोडला..

आपला मराठमोळा

आठवण

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल

नॉनसेन्स!

माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''!
म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक!

No one is exempt from talking nonsense. The great misfortune is to do it solemnly.

१९९२ साली प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकात वेगवेगळ्या धर्माच्या, संप्रदायांच्या आचार्यांच्या - गुरुंच्या आयुष्याविषयीच्या शिकवणी मोठ्या खुबीने मांडल्या आहेत. ह्यांतील ''मास्टर'' हा कोणी एक व्यक्ती नसून त्यात हिंदू गुरु, झेन रोशी, ज्यू रबाय, ताओ साधू, ख्रिश्चन साधक, सूफी गूढवादी या सर्वांचा समावेश आहे. लाओ-त्सु, बुध्द, सॉक्रेटस, झरतुष्ट्र, मुहम्मद यांपैकी तो कोणीही असू शकतो. त्याने सांगितलेले ज्ञान महत्त्वाचे की तो पूर्वेकडून आला की पश्चिमेकडून हे महत्त्वाचे? त्याचा इतिहास खरोखर इतका महत्त्वाचा आहे काय? कारण, शेवटी इतिहास म्हणजे तरी काय? तर, जे दाखवलं गेलं त्याची नोंद....जे होतं त्याची नाही! जे कागदांमध्ये लिहिलं गेलं त्याची नोंद म्हणजे इतिहास.... त्या दोन ओळींमधील रिकाम्या जागेची, मौनाची नोंद कोठेच सापडणार नाही!!!

पुस्तकात अक्षरशः एका मिनिटात वाचून संपवता येणारे अनेक उतारे, ओळी, काव्यपंक्ती आहेत....त्या वाचून जरी एका मिनिटात संपत असल्या तरी त्यांवर पुढचे चोवीस तास मंथनही अपुरे पडेल! मनात एकदम ''ओह्ह्ह्ह!!!! अहो!!!'' असा आश्चर्यपूर्ण आनंदाचा प्रकाश-झोत टाकण्यासाठी ह्या पुस्तकातील एखाद्या पानावरची ओळच पुरेशी असते. मग मिळालेल्या त्या विचारकणाला उरा-पोटाशी धरून रिकाम्या क्षणांना त्या विचारावर अजून मंथन करायला आपण मोकळे होतो!

उदाहरणार्थ :

(अनुवादित)
१. आचार्यांना विचारधारांची अ‍ॅलर्जी होती. ते म्हणाले, '' विचारांच्या युध्दात जर कोणाचा बळी जात असेल तर तो आहे माणसाचा!'' पुढे ते म्हणाले, '' लोक पैसा व सत्तेसाठी खून करतात. पण सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.''

[ "In a war of ideas," he said, "it is people who are the casualties." Later he elaborated: "People kill for money or for power. But the most ruthless murderers are those who kill for their ideas.]

२. तुम्ही जेव्हा सत्य, वास्तवाला शब्दांचे रूप द्यायला जाता तेव्हा तुम्ही अव्यक्ताला शब्दबध्द करु पाहत असता.... तेव्हा तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाणार हे नक्की! त्यामुळे सत्याचे व्यक्त स्वरूप असणारे ज्ञानग्रंथ वाचणारे लोक आपले व्यवहार ज्ञान वापरण्याऐवजी त्यांना ''उमगलेल्या'' ज्ञानग्रंथांनुसार वागताना अनेकदा मूर्ख व क्रूर वर्तन करताना दिसतात.

["When you speak about Reality," said the Master, "you are attempting to put the Inexpressible into words, so your words are certain to be misunderstood. Thus people who read that expression of Reality called the Scriptures become stupid and cruel for they follow, not their common sense, but what they think their Scriptures say."]

त्यासाठी आचार्य एक चपखल उदाहरण देतात : एका गावातल्या लोहाराला त्याच्याकडे काम करण्यासाठी कमी पगाराची व भरपूर कष्टाची तयारी असलेला एक मदतनीस मिळाला. लोहाराने त्या मुलाला लगेच शिकवायला सुरुवात केली. त्याने सूचना केली, ''मी जेव्हा आगीतून धातू बाहेर काढून तो ऐरणीवर ठेवेन आणि मुंडी हालवेन तेव्हा तू त्यावर चटकन हातोड्याने घाव घालायचास!''
मदतनीसाने त्याला ''वाटल्याप्रमाणे'' सूचनेचे तंतोतंत पालन केले.
दुसर्‍या दिवशी त्याला गावाचे लोहारपद मिळाले!!!!

३. एकदा एका नास्तिकाने विचारले, '' ईश्वर आहे का हो खरोखरीच?''
आचार्य म्हणाले, ''मी जर तुझ्याशी प्रामाणिक रहावे असे तुला वाटत असेल तर मी ह्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही.''
नंतर एका शिष्याने आचार्यांना विचारले की त्यांनी उत्तर देण्यास का नकार दिला....
''कारण त्या प्रश्नाचे उत्तरच नाही!'' आचार्यांनी सांगितले.
''म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का?''
''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!''

["Tell me," said the atheist, "Is there a God — really?"
Said the master, "If you want me to be perfectly honest with you, I will not answer."
Later the disciples demanded to know why he had not answered.
"Because the question is unanswerable," said the Master.
"So you are an atheist?"
"Certainly not. The atheist makes the mistake of denying that of which nothing may be said... and the theist makes the mistake of affirming it.]

४. एका गंभीर चेहर्‍याच्या पाहुण्याने आचार्यांना विचारले, ''गुरुचे काम काय?''
''लोकांना हसायला शिकवणे!'' आचार्यांनी तितक्याच गंभीरपणे उत्तर दिले.

["What is the work of a Master?" said a solemn-faced visitor.
"To teach people to laugh," said the Master gravely.]

५. अहंकाराचे ओझे जो टाकून देतो त्याची पावले कायमच आनंदी वाटचाल करत जातात.

[One always treads with a joyful step when one has dropped the burden called the ego.]

६. स्वतःचेच खरे मानणार्‍या एका धर्मशिक्षकाने आचार्यांना विचारले, ''तुमच्या मते जगातील सर्वात घोर पाप कोणते?''
आचार्य उत्तरले, '' ते (पाप) ज्यात तो इतर माणसांना पापी समजतो...''

[Said the self-righteous preacher, "What, in your judgment, is the greatest sin in the world?"
"That of the person who sees other human beings as sinners," said the Master.]

अशा अनेक चुरचुरीत (सु)वचनांनी हे पुस्तक ठासून भरलेलं आहे. नवीन दृष्टी देण्याबरोबरच ते आपल्याला हसायला लावते, कंटाळा झटक्यात दूर करते आणि विचारांना खाद्य पुरविते. मिळाले तर जरूर वाचा व आपल्या संग्रही बाळगा!

धन्यवाद!

-- अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

माझा चारोळी संग्रह (२२ चारोळ्या)

(मी आत्तापर्यंत लिहिलेल्या २२ चारोळ्या मिसळपाव च्या वाचकांसाठी देत आहे! )

-------------------------------------------------------
(१) गुढीवाडव्याच्या शुभेच्छा

"चैत्र महिन्याशी करूया

पुन्हा मैत्र...

नव्या वर्षाचे रंगवूया

सुखद चित्र... "

(२) भूताच्या भूतकाळाचे भूत

भग्न वाड्यात रोज मध्यरात्री...!!

सूडाच्या स्वप्नात मग्न, तो बसलेला असतो

मृत्यू लादला गेलेला हा मृतयात्री ...!!

भूतकाळाचे भूत, मानगुटीवर घेत "जगतो"

(३) 'विविधतेतील' कथित एकता

या देशाच्या 'विविधतेतील' कथित एकता...

सांगा बरे उरली आहे का आता?

स्वातंत्र्यापासूनच हा देश आहे म्हणतात धर्मनिरपेक्ष!

पण जन्मापासूनच जगतो प्रत्येकजण आरक्षणसापेक्ष!

(४) कोजागिरी? ( कोण जागतंय?)

चंद्राच्या साक्षीने मिळाली,

बासुंदीची मेजवानी...

कोजागिरीच्या रात्रीने लिहिली,

जागरणाची कहाणी...

(५) होळी

मिळून सारे करूया

दहशतवादाची होळी...

मग(च) साजरी करूया

आनंदोत्सवाची होळी...!


(६) बेकारी...

बेकारीला कंटाळून त्याने,

दहशतवादाची कास धरली.

त्याच्या मनातील रावणाने शेवटी,

मनातल्या रामावर मात केली.

(७) उपहासात्मक चारोळी: दहशतवाद्याचे रोजचे नवे शब्दकोडे : (सोडवा पाहू!)

(शहरांच्या आद्याक्षरानुसार दहशतवादी एक कोड तयार करून त्याप्रमाणे क्रमाने स्फोट घडवून आणत... त्यावर ही चारोळी)

बी नंतर ए नंतर डी

दहशतवादी शिकवतो एबीसीडी

टांगले जातेय सुरक्षेच्या अब्रुचे लक्तर

सांगा बरं दहशतीचे पुढचे कोणते अक्षर ?
किंवा
सांगा बरं दहशतीचे पुढचे कोणते शहर?

(८) वेडी चारोळी...

एका वेड्याला शहाण्यांनी दगडं मारून पिटाळलं...

वेड्याचं शहाणं मन वेड्याला सांगू लागलं,

" या सगळ्या वेड्यांच्या जगामध्ये,

माझ्यासारख्या शहाण्यांना जगणं कठीण झालं "

(९) हे मात्र न कळे...! भाग एक

सौंदर्य असते म्हणतात बघणाऱ्यांच्या डोळ्यात...

प्रेम तर असते म्हणतात मात्र आंधळे!

मग 'सौंदर्याच्या प्रेमात' पडणाऱ्यांच्या डोळ्यात...

नेमके काय असते हे मात्र न कळे!

(१०) हे मात्र न कळे...! भाग दोन

एकमेकांवर 'आंधळेपणाने प्रेम' करणाऱ्यांच्या डोळ्यात...

नेमके काय असते हे मात्र न कळे!

फक्त डोळ्यांनी व्यक्त करायच्या या प्रेमात...

आंधळेपणाचे काय काम ते मात्र न कळे!

(११) मन .. असे आणि तसेही

मन म्हणजे-कल्पनाशक्तीचा उगम

आणि सुविचारांचा संगम..

त्याचसोबत- शैतानी शक्तींचा उगम

आणि विकारांचा संगम...

(१२) गूढ प्रेम!!

मध्यरात्री ती आली...

पायवाटेवर बसली, डोळ्यात 'त्या'ची अतृप्त आशा घेवून!

त्या रात्री 'तो'ही आला...

तीच्यासोबत यायला, स्वतःच्या जीवाला पारखा होवून!

(१३) स्वस्त शब्दकोश

महागाईने केले

जनतेला भलतेच त्रस्त

'स्वस्त' हा शब्दच केला

शब्दकोशातून फस्त

(१४) क्षणाचा सोबती - भाग एक

आपल्या दोन आयुष्यांचे

क्षण एकमेकांत मिसळून जाती

झालो मी तुझ्या आयुष्याच्या

प्रत्येक क्षणाचा सोबती

(१५) क्षणाचा सोबती - भाग दोन

एका क्षणी तुला पाहिले

क्षण तो खास अगदी

त्या क्षणी मिळाला क्षणाला

क्षणाचा सोबती

"प्रेमाचा" पाऊस


(१६)

पावसाच्या संथ धारांमध्ये

मदनाच्या मंद वाऱ्यामध्ये

मादक गंध तुझ्या शरिराचा

लावी मनाला छंद मिलनाचा.

(१७)

पाऊस बरसला

सुगंध पसरला

सहवास बहरला

श्वास मोहरला

(१८)

पाऊस धारा बरसल्या

मनाच्या तारा जुळाल्या

इंद्रधनुष्य उगवले

त्याने मिलनाचे संकेत दिले

(१९)

जसे, ऊनपावसाच्या खेळात

इंद्रधनुष्याची संगत

तसे, रुसव्या फुगव्याशिवाय

येत नाही प्रेमात रंगत

(२०) ती पाहा आली दिवाळी...

आशेच्या एका सकाळी...

ती पाहा आली दिवाळी...

घेवूनी प्रकाश ओंजळी...

लख्ख करूनी आभाळी...

(२१) आजकाल ...

आजकाल, खेळाडू अभिनय करतात

अभिनेते राजकारणात शिरतात

राजकारणी भ्रष्टाचारात मग्न असतात

देशासमोरचे प्रश्न तसेच रहातात

(२२) स्वातंत्र्य

स्वातंत्र्य मिळाले आपल्याला, नावापुरते

गरिबांच्या तोंडाला मीठही नाही, चवीपुरते
------------------------------------
सर्व चारोळी लेखन-

निमिष सोनार, पुणे--(क्षणाचा सोबती)

माझ्या ब्लॉग्ज ना जरूर भेट द्या-
http://cartoonimish.blogspot.com
http://nimish-marathi.blogspot.com
http://nimish-english.blogspot.com/

~ गुढीपाडवा ~

चैत्र महिन्याशी करूया

पुन्हा मैत्र...

नव्या वर्षाचे रंगवूया

सुखद चित्र...

सर्वांना गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा...

--- निमिष सोनार, पुणे

Syndicate content
Scroll to Top