पावसाळी पिकनिक
पावसाळी पिकनिक
हिरवाईच फ्याड
धबधबे, डोंगर
चिकन,भुजिंग ,
पोरींची परमिशन असेल तर दारू
पोरी भिजलेल्या जाकीटातल्या
खेड्यातली उघडीनागडी पोर
त्याशिवाय कारुण्याचा टच नाही
आमच्या फिलिंग ओवसमला...
वरती अवसान न्याचरल
अपलोडिंग .....
ट्याग कर रे मला ...
सत्राच लाईक अजून.....
शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....