मनोमनी
मनोमनी
मनोमनी कोणाच्या काय असते
कधी नाही कळायचे।
समजा कळले असते तर
अग बाई!अरेच्चा! व्हायचे।।
मनोमनी
मनोमनी कोणाच्या काय असते
कधी नाही कळायचे।
समजा कळले असते तर
अग बाई!अरेच्चा! व्हायचे।।
तू जवळ पाहिजे होतीस
ढग आज गरजला होता
पाऊस तुला आवडतो
हे तो उमजला होता
--
बिनधास्त तुझ्यासारखा
असा काही तो कोसळतो
तू नव्हतीस म्हणून
तूझ्यावरचं मीच भिजत होतो.
--
माहित नव्हतं भिजायचं
तुच मला शिकवलं होतं
पावसात कोणाला कळलं नाही
अश्रू मात्र ओघळलंं होतं
--
थांबला पाऊस
वारं सुद्धा मंदावलं होतं
तुझ्या आठवणींच्या मातीने
मन माझं गंधावलं होतं
=====
मूठ
झाकली मूठ
म्हणे सव्वा लाखाची
दाबली मूठ
ती मात्र तिजोरी कुबेराची
कर्ज
अर्जावर अर्ज
तरी नाही गरिबाला कर्ज
हात करा ओले
मिळेल अर्जाशिवाय कर्ज
चारोळी
चंद्रप्रकाश चोहीकडे
चंचल चांदणे,
चंद्रकोर चित्तचोरते
चंद्रमा चमचमते..
कवी - स्वप्ना
छंदात बांधण्याचे,
गेले सखे दिवस ते |
मज अभिजात जे उमजले,
ते मुक्त छंद होते....||
मलयगिरीचे वारे
वासंतिक वारे
चैतन्य नांदे
घर-अंगणी
शहरी वारे
स्मागी वारे
मृत्यू नांदे
घर-अंगणी.
दुःख दर्शविण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई
शोभून दिसते सुंदरी
अन् सुगंध देते मोगरी
फरक इतकाच सखे
भार तुच्छ हा उरावरी
टकटक आवाज करती
चाले गुलाबी परी
मधुर सुगंध तिचा
वाटे नभाची सरी
हे दृश्य पाहण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई
तिला भेटायला जाताना
वेगावर नियंत्रण जमतं मला
पण तिला भेटल्यावर
आवेग आवरला जात नाही
ढग भरून आले कि
नेहमीच पाऊस पडतो
पण मन भरून आलं कि
त्याला एकांताचाच कोपरा लागतो
ती मला आवडते
जेव्हा लाडिकपणे
अंगाशी झोंबते
तेव्हा ती मला खूप आवडते
जेव्हा किरकोळ गोष्टीला
खट्याळपणे Oh My God म्हणते
तेव्हा ती मला खूप आवडते
माझ्या टोमण्यांवर
गुद्द्यांचा प्रसाद देते
तेव्हा ती मला खूप आवडते
मी टकाटक आवरून बाहेर जाताना
हूं... करून नाक मुरडते
तेव्हा ती मला खूप आवडते
जेव्हा माझा पचका होतो
तिला कशी जिरली एकाची
असा लहान मुलासारखा आनंद होतो
तेव्हा ती मला खूप आवडते
कधी कधी माझ्या रागवण्यावर
भोळा भाबडा चेहरा करते
तेव्हा ती मला खूप आवडते