काही क्षणिका - स्त्री
(१)
वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.
(२)
पद्मिनीने म्हणे
चितेत उडी घेतली.
आगीत वासनेच्या
नाही ती जाळली.
(३)
देह वासनेचा
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता
अमर प्रेम तराणे.
(१)
वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.
(२)
पद्मिनीने म्हणे
चितेत उडी घेतली.
आगीत वासनेच्या
नाही ती जाळली.
(३)
देह वासनेचा
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता
अमर प्रेम तराणे.
====================================
"सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा....
°°°°
झुडपात जाऊन तोंडाला
लय फासलाय साबण
चाललू हिरीत मुटका मारायला
तर आरची म्हणली " हु म्हागं"
- लंगडा प्रदीप
°°°°°°
केळीच्या बागा तुडवून
पाय दुखतात सारखे
आसं काय करती येड्यावणी
"घरची उठत्याल की आरचे"
- परश्या
==================================
"सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !! तुम्हाला?
•••••••••
तू
कधीतरी आयुष्यात , सदाफूली व्हावं
सुख बनून मातीत , आनंदाने फुलावं
अंत स्वतःचा , माहीत असून देखील
भेटणाऱ्या प्रत्येकाला , आनंदी करावं
- अभिषेक पांचाळ
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!
उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..
संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..
विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...
धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा
मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..
त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..
कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी,
अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी,
कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात,
पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !!
डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी,
लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी,
ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी,
विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.
झाळं आंब्याचं हिरवं
कसं फुलारुनं आलं
नवरीच्या वानी पिव्वी
जशी लपेटली शालं
ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य
बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य
भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य
कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य
देवा तुझ्या नामानं, मीपण गळलं
बासुरीगत झाले मनं, रितं न् पोकळं
तुझ्या फुंकरेने केले, स्वर हे मधाळं
संगीतमय झाले सारे, जीवन सकळं
नमस्कार,
मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही.
पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये"
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.