विरहणी आणि वीज
उन्हाळ्यात सर्वांच्या अंगांची लाही लाही होऊ लागते, त्यात विरहाने व्याकूळ विरहणीची दशा काय झाली, कल्पनाच करणे अशक्य. १०० डिग्री सेंटीग्रेड तापलेल्या या विरहणीच्या शरीराचा काय बरा उपयोग होऊ शकतो, अशी खट्याळ कल्पना मनात आली.
विरहणीच्या डोक्स्यावारी
मी पाण्याची धार धरली
वाफेचा उसळत्या डोंबावरी
चालविला जनरेटर भारी
अशी म्या वीज वाचविली.
ज्ञानियाचा पाठीवर
भाजली होती पोळी
विरहणीच्या पाठीवर
मी *पिज्जा बेक केला.
अशी म्या वीज वाचवली.
(* युग बदलले आता पोळीच्या जागी पिज्जा)