सावधान मत्स्य पुत्रानों आयुष्यभर मासे मारणारा बगळा आता मगरीचे रूप घेऊन अश्रू ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही.
आयुष्यभर बगळ्याने
मासे सारे फस्त केले .
घेऊनी वेश मगराचा.
ढाळतो अश्रू आता.
एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला:
भुलूनी मगर अश्रुना
जीव गेला मत्स्याचा.
अर्पिली गांधी "चित्रफुले"
ढाळूनी अश्रू मगरीने.
सावधान! मत्स्य पुत्रानों
घेउनी वेश साधूचा
रावण हरतो सीतेला.
जाणीव ठेवा इतिहासाची
भुलू नका मगर अश्रुना.
प्रतिक्रिया
29 Apr 2015 - 8:35 pm | श्रीरंग_जोशी
रुपक चारोळया आवडल्या.
1 May 2015 - 8:05 pm | विवेकपटाईत
मासे = शेतकरी
मगर = पूर्वीचा बगळा आता लावारिस मगरीचे रूप घेऊन खोटे अश्रू गाळून पुन्हा मास्यांना आपल्या जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करण्यासाठी नुकताच विदर्भात येऊन गेला.
दुसरी चारोळी दिल्लीतली घटना