मन
आज मनाचा काही कळतच नाही,
मनाचा मनाला काही पत्ताच नाही,
का असं होतं काही केल्या उमगतच नाही,
पण आज मन कुठे रमतच नाही!!!!
आज मनाचा काही कळतच नाही,
मनाचा मनाला काही पत्ताच नाही,
का असं होतं काही केल्या उमगतच नाही,
पण आज मन कुठे रमतच नाही!!!!
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता.
बाटली रिकामी
ग्लास घरंगळलेला,
टेबलावरचा थेंब
केव्हाचाच सुकलेला.
ढग विखुरलेले
पाऊस थांबलेला,
कुंदाळ हवेत
मी गारठलेला.
काडी काडी करुन
तिनं घरटं बांधलं,
वाराही वहायचा थांबला
त्यानेही ते जाणलं.
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.
पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.
श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.
आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?
किती वाजता करायचा?
खायला-प्यायला काय आणायचे?
इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.
तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.
(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625
"काण्या तू ? वहिनी कुठाय"
या तुझ्या टोकदार प्रश्नानं
तु माझ्या पोटाचं
मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं
टचकन फुटून गेलं,
आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात
तू पुन्हा एकदा यशस्वी झालास..
अभिनंदन!!!
सत्तेचा आनंद
नाक कान डोळे
ठेवा सर्व बंद
गुपचूप चिडीचूप
सत्तेचा आनंद
नागपुरी संत्रा
नागपुरी संत्रा
पहा कसा बहरला
लवकरच कळेल
गोड आहे कि कडू.
टोल प्रश्न
गादीवर बसतात
सत्ताधारी झाला
टोलचा प्रश्न
झाडावर टांगला
चाईनीज बॉम्ब
जोरात फुटला
कानाचा परदा
कुणाचा हो फाटला.
फटाक्यांचा धूर
आकाशी दाटला
खोखलत-खोखलत
कुणाचा प्राण गेला.
आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा
दिवाळीचा सण मोठा
असा साजरा केला.
चंचला कमळा ती
हातातुनी निसटली
दिव्यांच्या उजेडात
कमळावर स्वार झाली.
पीएम इन वेटिंग सारखा
सीएम इन वेटिंग राहिला
कोकणचा राजा
आज ही उपाशी राहिला
धनुष्य बाणाचा नेम
कसा काय चुकला?
शकुनी पास्यानी
दगा का दिला?
अंधार दूर झाला
वनवास आज संपला
आज वोट पाउलांनी
सत्ता घरात आली.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.
डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.
ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.
डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...
१. ठिकाण ===> नंदी पॅलेस
२. दिनांक ===> १८-१०-२०१४
३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०
४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.
डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.
विकेंड बिकेंड
ट्रेकिंग बिकिंग ...
धबधबे.. डोंगर बिंगर ...
पोरी बिरी जाकेटातल्या...
फोटो बिटो
uploading.....
Tag
like
कमेंटेड ...इंजोयेड अलोट....
चार आण्याचा प्रसाद
देवाजीच्या दारात अन्
डोंगराएव्हढ्या कामना
भक्ताच्या मनात.
******************************
सगळ्यांच्याच जीवनाच एक
सामाईक धोरण
आयुष्याची दोन टोकं
जिवण आणि मरण.
******************************
साव कुनाला म्हणावं,
सगळेच हात बरबटलेले
साधु-संताचे मठही एथं
गुन्हेगारीत गुरफटलेले.
******************************
अशीच तु मला एकदा
उदास्-उदास दिसलीस
तेव्हा पासुन मला तु
माझ्यासारखीच भासलीस.