चंचला कमळा ती
हातातुनी निसटली
दिव्यांच्या उजेडात
कमळावर स्वार झाली.
पीएम इन वेटिंग सारखा
सीएम इन वेटिंग राहिला
कोकणचा राजा
आज ही उपाशी राहिला
धनुष्य बाणाचा नेम
कसा काय चुकला?
शकुनी पास्यानी
दगा का दिला?
अंधार दूर झाला
वनवास आज संपला
आज वोट पाउलांनी
सत्ता घरात आली.
प्रतिक्रिया
23 Oct 2014 - 2:09 pm | पाषाणभेद
जावूद्याहो काही बदल होणार नाहीत.