user

राशी

मैसूर

२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.

हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले

वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.

वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:

वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.

वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे Wink

लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच

हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर

मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम

बाकी उटी भाग -२ मध्ये.

१२ राशींमधला प्रवास

जवळ्जवळ एक तप झालं असेल भारतात एक खूप मस्त राशींवरचं पुस्तक वाचलं होतं. ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं. आणि एका धाग्यात तो प्रवास सुंदर रीतीने ओवून दाखवला होता. जितकं आठवेल तितकं आणि तर्कशुद्ध इथे मांडायचा प्रयत्न करते.

मेष राशीत जीवात्मा नुकताच जन्मास आलेलं अर्भक असतो. स्वयंकेंद्रीत आणि मी म्हणेन तसच व्हावं अशी अपेक्षा असणारा. मनाविरुद्ध झाल्यास सगळं घर डोक्यावर घेणारा.
वृषभ राशीत तो ज्याला इंग्रजीत "टॉडलर" म्हणतात तसा होतो. या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं. प्रत्येक गोष्ट हातात घेऊन चाखून पहाणे , हाताळणे तिचा आनंद घेणे.
मिथुन राशीत जीवात्म्याची ओळख पहील्यांदा पुस्तकांशी, शब्दांशी होते. नाना प्राकारचे शब्दखेळ, कोट्या त्याला मोहवतात. अनेक लेखक या राशीवर सापडतात.
कर्क या राशीत बाळ थोडं अजून मोठं होतं. त्याला अवतीभवती कुटुंब आहे याची जाण पहील्यांदाच येते. कौटुंबीक जिव्हाळा कळू लागतो. या राशीवरचे स्त्री-पुरुष अतोनात कुटुंबवत्सल असतात खरे.
सिंह ही रास म्हणजे पौगंडावस्था. सारखं आरशापुढे रममाण होण्याची वृत्ती.
कन्या पहील्यांदा बाहेरच्या जगाची चाहूल लागते आणि कुणासाठी तरी काहीतरी करावं , मदत, सेवा करावी असं जीवात्म्यास वाटू लागतं.
तूळ १८० अंशातून राशीचक्र फिरलं आणि स्वकेंद्रीत जीवात्मा प्रथमच बहीर्मुख झाला. त्याला जोडीदाराची निकड भासू लागली. लग्न, सोशल सर्कल (मित्र परीवार) ही अनुभवसंपन्नता या राशीत तो अनुभवतो.
वृश्चिक विवाहोपरांत कामपूर्ती, अधिक गूढ गोष्टींकडे कल आदि चा अनुभव या राशीत येतो
धनु धर्म, धार्मीकता, पर्यटन, देशाटन आदिची आवड जीवात्म्यास निर्माण होते. थोडं मी, माझं कुटुंब या पलीकडे जाणार्‍या या शेवटच्या ४ वैश्वीक राशी
मकर बरचसं वैराग्यं
कुंभ देशाटन उपरान्त लोकसंग्रह, लोकोपयोगी कार्य हे जीवात्म्याकडून होतं
मीन मोक्ष, अंत, सर्व राशींचे गुण पहावयास मिळतात.

वृषभ राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये...

सूचना:
ज्योतिषशास्त्र, राशी आणि स्वभाव वैशिष्ट्ये हे सर्व मानणार्‍या मिसळपावच्या वाचकांसाठी हा चर्चेचा प्रस्ताव....

रास ओळखण्याचा नियम-
जन्मकुंडलीत ज्या राशीत चंद्र असतो ती आपली रास असते.

मिसळपाव चे जे वाचक वॄषभ राशीचे आहेत त्यांनी आणि ज्या वाचकांचे मित्र/नातेवाईक/ ओळखीचे/ संपर्कातले व्यक्ती वृषभ राशीचे आहेत त्यांनी वॄषभ व्यक्तींचा स्वभाव येथे मांडावा.
हेतू हा की ज्योतिष शास्त्रात जी वॄषभ राशीची वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती पडताळून पाहाणे....

अजून एक :
कुंडलीत प्रथम स्थानी २ हा आकडा असेल (वृषभ) आणि प्रथम स्थानी शुक्र ग्रह असला ...
तरीपण त्या व्यक्तीचा स्वभाव वृषभ राशीसारखा असू शकतो,
मूळ रास वेगळी असली तरी... (म्हणजे चंद्र हा २ हा आकडा असलेल्या स्थानात नसला तरीही..)

चैत्र शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

लोकहो,

चैत्र शके १९३० हा महिना विविध ग्रहराशीप्रवेशांनी गाजणारा महिना आहे.

मंगळ आणि राहू असे दोन तापदायक ग्रह या महिन्यात राशी बदलत आहेत. नेपच्यून कुंभेत जातोय.

मिथुनेत गेले अनेक महिने ठाण मांडून बसलेला मंगळ आता कर्केत जाईल.

मिथुनराशीवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप सोसले आहे. खरेतर साडेसाती संपल्यावर मधुमास येतो. पण शनीमहाराज गेले तरी मंगळमहाराज मिथुन राशीत ठाण मांडून होते. त्यात ते वक्री झाले, स्तंभी झाले आणि आता ३१ जानेवारीपासून मार्गी लागले आहेत. हा कुजस्तंभ फार वाईट असतो.

गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील.

कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे.

त्यात आता मंगळराव राशीत येत आहेत. केतू सिंहेतून कर्केत येतोय. समोर राहुमहाराज आहेत. राहू मंगळ प्रतियोग कर्केतच घडणार आहे. काय करावे?

परमेश्वरा...... वाचव रे या धोंडोपंताला!!!!!

तर लोकहो, चैत्र महिन्यातील ग्रहराशीप्रवेश असे आहेत.

चैत्र शुक्लपक्ष:-

१) दिनांक १३/०४/२००८ रोजी सायंकाळी ०६ वाजून २९ मिनिटांनी रवि मेष राशीत प्रवेश करतो आहे. मेष ही रविची उच्च रास आहे.

२) दिनांक १४/०४/२००८ रोजी रात्री २९ वाजून ४९ मिनिटांनी म्हणजेच दिनांक १५ एप्रिल रोजी पहाटे ०५ वाजून ४९ मिनीटांनी बुध मेषेत येतो आहे.

चैत्र कृष्णपक्ष:-

१)दिनांक २४/०४/२००८ रोजी सायंकाळी ०६ वाजून ५७ मिनिटांनी नेपच्यून कुंभेत जातो आहे.

२) दिनांक २५/०४/२००८ रोजी रात्री ०९ वाजून ४० मिनिटांनी शुक्र मेषेत जातो आहे.

३) दिनांक २८/०४/२००८ रोजी दुपारी ०२ वाजून ४७ मिनिटांनी मंगळ कर्केत जातो आहे. ( ही ब्याद एकदा निघाली की सुटले बिचारे मिथुन वाले)

४) दिनांक २१/०४/२००८ रोजी सायंकाळी ०५ वाजून ४० मिनिटांनी बुध वृषभेत जातो आहे.

५) दिनांक ०५/०५/२००८ रोजी रात्री ०८ वाजून ०१ मिनिटांनी राहू मकरेत जातो आहे. (कुंभवाले सुटले)

६) दिनांक ०५/०५/२००८ रोजी रात्री ०८ वाजून ०१ मिनिटांनी केतू कर्केत जातो आहे.

आपला,
(गणकभास्कर) धोंडोपंत

Syndicate content
Scroll to Top