ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Oct 2014 - 2:07 am

ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.

डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.

ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.

डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...

१. ठिकाण ===> नंदी पॅलेस

२. दिनांक ===> १८-१०-२०१४

३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०

४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.

डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

काउबॉय's picture

6 Oct 2014 - 2:13 am | काउबॉय

नक्कीच येणार :)

श्रीरंग_जोशी's picture

6 Oct 2014 - 2:21 am | श्रीरंग_जोशी

तीनही कट्ट्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!! भारतात असतो तर नक्कीच सामिल झालो असतो.

पिवळा डांबिस's picture

6 Oct 2014 - 11:51 pm | पिवळा डांबिस

तीनही कट्ट्यांना हार्दिक शुभेच्छा!!

कट्ट्यांस शुभेच्छा.

तीनही कट्ट्यांचं सचित्र वर्णन येऊ द्या.

स्पार्टाकस's picture

6 Oct 2014 - 4:22 am | स्पार्टाकस

डिसेंबर मध्ये काही नाही का?
बहुतेक भारतवारीला येणार आहे.

श्रीरंग_जोशी's picture

6 Oct 2014 - 5:22 am | श्रीरंग_जोशी

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील.

जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

मुक्त विहारि's picture

6 Oct 2014 - 8:15 am | मुक्त विहारि

तुम्ही फक्त डोंबोलीला यायची ता. कळवा.

कट्टा होईल...

लेखनविषय आणि लेखनप्रकारासाठी शि.सा. दंडवत !

कंजूस's picture

6 Oct 2014 - 7:51 am | कंजूस

या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Oct 2014 - 8:40 am | माम्लेदारचा पन्खा

चला.... तारखा बुक करतो.... ठाण्याची पण तारीख सांगा....

मुक्त विहारि's picture

6 Oct 2014 - 9:21 am | मुक्त विहारि

उत्सवमुर्तींवर अवलंबून आहे.

त्यांचे यायचे नक्की झाले की सांगू...

स्पार्टाकस's picture

6 Oct 2014 - 9:25 am | स्पार्टाकस

बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :).
अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

प्रचेतस's picture

6 Oct 2014 - 9:26 am | प्रचेतस

पुणे कट्ट्याला हजर असूच.

उगा काहितरीच's picture

6 Oct 2014 - 9:28 am | उगा काहितरीच

पुण्यात होणाऱ्या कट्ट्याला अस्मादिकांची उपस्थिती अपेक्षित आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2014 - 11:28 am | डॉ सुहास म्हात्रे

मुवींचे पुण्यात स्वागत आहे. तारीख कळवा बस !

पुण्याच्या कटट्याला असेन.

फक्त माझ्या एखाद्या पेशंटने ............

कट्ट्याला यायची इच्छा आहे, फक्त योग जूळून यायला हवा..

सस्नेह's picture

6 Oct 2014 - 2:49 pm | सस्नेह

पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

कोल्लापूरकरांनी आधी पंचगंगा ओलांडून दाखवावी आणि मग पुणेकरांच्या लक्ष्मणरेषेवर ताशेरे ओढावेत, कसें?

दिपक.कुवेत's picture

6 Oct 2014 - 3:37 pm | दिपक.कुवेत

काय नेहमी तोच तोच वाद घालता?

सूड's picture

6 Oct 2014 - 4:06 pm | सूड

असंच !! मज्जा येते. ;)

करा की हो कट्टा मग पुण्यात ?
आम्ही लगेच पंचगंगा पार करतो बघा !

भाते's picture

6 Oct 2014 - 3:58 pm | भाते

मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल.

माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी.
यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

मुक्त विहारि's picture

6 Oct 2014 - 8:47 pm | मुक्त विहारि

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत.

त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

भाते's picture

6 Oct 2014 - 10:50 pm | भाते

आपल्या मध्यवर्ती डोंबिवलीतल्या मिपाकरांची संख्या वाढत आहे. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Oct 2014 - 1:00 am | निनाद मुक्काम प...

जुन्या कट्ट्याच्या आठवणीने गहिवरलो
नंदी पेलेस मस्तच

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Oct 2014 - 4:56 pm | माम्लेदारचा पन्खा

बर...मग आम्ही काय करावं तिथे??

भाते's picture

6 Oct 2014 - 8:03 pm | भाते

मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते.
कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही.
खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत!
तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Oct 2014 - 8:26 pm | माम्लेदारचा पन्खा

"पहिलटकर" असल्यामुळे शंकेची कळ आली आणि पाय लटलटले इतकेच!

मुक्त विहारि's picture

6 Oct 2014 - 10:49 pm | मुक्त विहारि

अन या...

डोंबोली आपलीच आहे...

सुबोध खरे's picture

6 Oct 2014 - 11:54 pm | सुबोध खरे

पंखा साहेब,
मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Oct 2014 - 9:22 am | माम्लेदारचा पन्खा

पण एरवी " हे विश्वचि माझे घर " !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Oct 2014 - 1:03 am | निनाद मुक्काम प...

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत
गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

मुक्त विहारि's picture

14 Oct 2014 - 1:16 am | मुक्त विहारि

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

अजून अक्षता पोहोचल्या नाहीत म्हणून विचारले.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Oct 2014 - 8:05 pm | अत्रुप्त आत्मा

पुणे कट्ट्या ला नक्की येणार! =))

आता उत्सवमूर्तींचे नक्की झाले की कळवतो.

पुणे आणि ठाणे कट्टे घोषित झाले की काय ते कळवतो.

सर्व कट्ट्यांना कचकुन शुभेच्चा, मजा करा.. :-)

स्पाचा पिंपळाचा पार कुठल्या गावात आहे ?

प्लूटो किन्वा नेपच्यूनवर असावा

बॅटमॅन's picture

7 Oct 2014 - 1:01 pm | बॅटमॅन

बहुधा तो सिडनी की मेलबोर्न इथे असावा. मीनाक्षीताई देवरुखकरांसोबत ;)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2014 - 7:06 pm | अत्रुप्त आत्मा

@ >>> =)) आगागागागाग्गा!!! =))

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत.

कट्ट्याची जागा.

ट्विन्स, ठाणे (पुर्व)

दिनांक : १९ ऑक्टोबर.

वेळ : दुपारी ११:३०

शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....)

आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Oct 2014 - 10:11 pm | माम्लेदारचा पन्खा

नक्की कुठचं ?

मुक्त विहारि's picture

6 Oct 2014 - 10:47 pm | मुक्त विहारि

व्य.नि. करा...

अन बिंधास्त र्‍हावा...

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Oct 2014 - 10:57 pm | माम्लेदारचा पन्खा

करतो..

प्रणित's picture

7 Oct 2014 - 1:09 pm | प्रणित

ठाणे कट्टा + १

श्रीयुत उत्सवमूर्ती कोण आहेत?

डिसेंबरात पुणे कट्टा हाय का?

मुक्त विहारि's picture

6 Oct 2014 - 10:42 pm | मुक्त विहारि

स्पार्टाकस येत आहेत...

भाते's picture

6 Oct 2014 - 10:47 pm | भाते

गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली.
आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील.

उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

बादवे,

उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही....

पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

हरकाम्या's picture

6 Oct 2014 - 11:22 pm | हरकाम्या

राव " पुणे कट्टा " कधी?

मुक्त विहारि's picture

6 Oct 2014 - 11:26 pm | मुक्त विहारि

पुण्यातले उत्सवमुर्ती आल्यावर.....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Oct 2014 - 8:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुणे कट्टा कधी. गुरवारी करा बॉ!!! एकदातरी कट्ट्याला भेटायचे आहे मिपाकरांना. जनरली शनिवार रवीवारची वेळ साधुन होतात कट्टे.

सूड's picture

7 Oct 2014 - 2:10 pm | सूड

करु हं !! ;)

या वेळी पुण्यातल्या कट्ट्यावर हजेरीचा विचार केला जाईल.

सोत्रि's picture

7 Oct 2014 - 6:50 pm | सोत्रि

१७ ते २७ ऑक्टोबर ह्या दरम्यान पुण्यात कट्टा झाल्यास हजेरी नक्कीच लावली जाईल!

- (कट्टेकरी) सोकाजी

मुक्त विहारि's picture

7 Oct 2014 - 8:48 pm | मुक्त विहारि

चिंता नसावी...

बिंदास र्‍हावा...

टवाळ कार्टा's picture

11 Oct 2014 - 1:19 pm | टवाळ कार्टा

तारखा ठरल्या का?

मुक्त विहारि's picture

11 Oct 2014 - 10:43 pm | मुक्त विहारि

कुठलाही बदल नाही...

मुक्त विहारि's picture

11 Oct 2014 - 10:58 pm | मुक्त विहारि

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे.

त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर.

तसदी बद्दल क्षमस्व....

पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Oct 2014 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

@मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु. >>> जोरदार +१

टवाळ कार्टा's picture

11 Oct 2014 - 11:57 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११

नाखु's picture

13 Oct 2014 - 9:26 am | नाखु

एक तुम्ही आल्यावर आणी पुन्हा पे काका आल्यावर "हाकानाका"

शशिकांत ओक's picture

11 Oct 2014 - 11:08 pm | शशिकांत ओक

मुवि,
वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच.

डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत.
गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

मुक्त विहारि's picture

12 Oct 2014 - 2:38 pm | मुक्त विहारि

तुम्हाला सुचलेला पर्याय योग्य वाटतो...

रेवती's picture

12 Oct 2014 - 10:25 pm | रेवती

कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

कंजूस's picture

13 Oct 2014 - 8:46 am | कंजूस

रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे.
चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल.
नीरा चांगली मिळते.

तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

प्रचेतस's picture

13 Oct 2014 - 9:07 am | प्रचेतस

भाजे लेणी कट्टा करूया का?
मुंबैकर, पुणेकर दोघांनाही सोयीचे.

मुक्त विहारि's picture

13 Oct 2014 - 9:19 am | मुक्त विहारि

कुठेही जायला मी तयार आहे..

भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम...

मी सहकुटुंब येईन...

प्रचेतस's picture

13 Oct 2014 - 9:24 am | प्रचेतस

एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

कंजूस's picture

13 Oct 2014 - 11:06 am | कंजूस

1)भाजे लेणी +लोहगड
२)भाजे +विसापूर
असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते.

मी येण्यास तयार आहे.

लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

सुबोध खरे's picture

13 Oct 2014 - 11:30 am | सुबोध खरे

कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2014 - 12:32 pm | टवाळ कार्टा

लाल डब्बा :)

माझीही शॅम्पेन's picture

13 Oct 2014 - 1:51 pm | माझीही शॅम्पेन

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो.
लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

रेवती's picture

13 Oct 2014 - 5:25 pm | रेवती

धन्यवाद कंजूसराव!

प्रभाकर पेठकर's picture

12 Oct 2014 - 3:19 pm | प्रभाकर पेठकर

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.).
सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक.
सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

मुक्त विहारि's picture

12 Oct 2014 - 8:54 pm | मुक्त विहारि

आणि चार घटका मौज-मजा करायला...

त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते.

शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा.

सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे.

तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा...

मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो.

बादवे,

नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

कंजूस's picture

12 Oct 2014 - 9:54 pm | कंजूस

ओके.

सुबोध खरे's picture

17 Oct 2014 - 9:48 pm | सुबोध खरे

उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत.
मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम.
माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९.
ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2014 - 2:44 am | प्रभाकर पेठकर

मी तीर्थ प्राशन करत नाही..

कित्ती..कित्ती ती जाहिरात?

कंजूस's picture

18 Oct 2014 - 7:35 am | कंजूस

मी नाही, राग नसावा.

भाते's picture

18 Oct 2014 - 11:55 am | भाते

निमित्त बाहेर जायचे असल्याने मला नंदी पॅलेसला यायला जमणार नाही. :(