स्थिरचित्र
कर्नाळा....एक आठवण....
ही भटकंती जरा जुनी आहे पण जास्त आठवणीत राहीलेली....
सकाळीच पाण्याची बाटली आणि केकचा पुडा घेऊन वाशी-अलिबाग एस-टी धरली आणि कर्नाळ्याचा पायथा गाठला.गणेशचतुर्थीचा दिवस आणि त्यातही मिड-वीक असल्यामुळे कोणीही नव्हते. कधीही पाऊस पडेल असे अन्धारून आले होते.
कर्नाळ्याचा पायथा आणि एकंदर परीसरच गच्च झाडीने झाकलेला आहे. हे जंगल नवख्या माणसाला दचकवेल असे भयाकारी नक्कीच आहे. पण तसे घाबरण्याचे काही कारण नाही. इथे वन्य प्राणि मला तरी कधी दिसले नाहीत. कर्नाळा पक्शी अभयारण्य आहे.
या वेळी माझ्याकडे माझा जुना Canon A400 होता. १-२ भट्क्यांपलीकडे दिवसभरात कोणीही दिसले नाही. कर्नाळा एक दिवस माझा पर्सनल फोटो स्टुडीओ होता.
त्यातलेच काही फोटोज....


















महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान्........रायरेश्वर!!!!!!!!
अवघ्या महाराष्ट्रात ज्याला रायरेश्वर माहिती नाही असा माणूस विरळा. जर कोणी असेल तर तो कमनशिबिच....
मी रायरेश्वरला आजवर दोनदा गेलो. माझ्या सुदैवाने म्हणा किंवा मित्रांच्या दुर्दैवाने, दोन्ही वेळेस एकटाच होतो. या वेळेस मुक्काम करायचा ठरवला. थोडे तहान्-भूक लाडू घेउन आणि नेहमीच सोबत करणारा दोस्त्....माझा Camera.
सन्ध्याकाळी ४.३० ला बाईक ने पायथा गाठला आणि माझा फोटोग्राफीक प्रवास सुरू झाला. माझा मीच असल्यामुळे कोणी टोकणारे नव्हते. रमतगमत, नीरव शांतता पीत (क्लिक हा आवाज सोडल्यास) मी निघालो. (शिवाय गडावर महाराज आणि मावळे होतेच :)).
रात्री पुजार्याकडेच मुक्काम केला. गरमागरम भाकरी आणि झोपायला पलंग १००/- मधे मिळाला. रात्रीची मऊ हवा पीत आणि पिठूर चांदणे बघत शान्त झोप झाली पण थोडीच. सकाळी उजाडायच्या आत जवळ्च्या टेकाडावर Camera मांडून बसलो.
तर या फोटोग्राफीक मेडीटेशन मधे जे काही मिळाले ते असे....
गडाची वाट....

शीडी





रायरेश्वराचे देऊळ........




रम्य पहाट्........मागे केंजळगड.


एका कोळीयाने....
काशीद समुद्रकिनार्यावर झाडाखाली बसलो असताना हा सापडला....
Canon 450D, 18-55mm lens


ब्राझील फुटबॉल जत्रा
मागच्या आठवड्यात ब्राझील मधल्या फुटबॉल वेडा बद्दल मी दिलेला प्रतिसाद ..
काल झालेला ब्राझील विरुद्ध आयव्हरीकोस्ट सामना, ब्राझीलीयन जनते बरोबर बघण्याचा योग आला त्याची ही क्षणचित्रे.. आयुष्यभर लक्षात राहिल असा हा अनुभव होता...
सामना पाहण्यासाठी रस्त्या रस्त्यावर केलेली जय्यत तयारी


सामना पाहण्यासाठी कोपाकबाना या जगप्रसिद्ध समुद्रकिनारी फिफा ने दोन महाकाय पडदे लावले आहेत..



चला सामना सुरु होण्यासाठी १ तास बाकी आहे लवकर जाउन मोक्याची जागा धरूया..





काल ह्या ठीकाणी ९८,००० च्या आसपास लोक सामना पाहण्यास आले होते..(साखळी सामन्याला इतके तर बाद फेरीला किती.... :W )



सामन्या दरम्यान कोकाकोलाचा लुफ्त घेणारे अस्मादिक... <:P

३ गोल झाल्यावर सुरु झालेला जल्लोश पाहून आस्मादिकांनी तेथून पळ काढला.. 
पुढचा ब्राझीलचा सामना कोपाकबानाला जाऊनच पाहायचा हा निर्धार केला आहे हे. वे. सा. न. ल.
काही किडे आणि फुलपाखरे........
मघाशी टाकलेली फुले नविन आहेत. तिथे किडे आणि फुलपाखरे मिळाली नाहित. म्हणून काही काही जुनेच किडे लावतो आहे.
Camera पण जुनाच आहे....
Camera Canon A400 (3.2 megapixel, 2.5x optical zoom)






ये लीली मुझे घर के गमले मे मिली....
घरातल्या लीली चे काही फोटो....
Canon 450D (18-55, 50-1.8 mm lenses)




Macro lens घेणे गरजेचे आहे....
माझ कोकण..........श्रीमंत!
मुळ लेख येथे आहे
दीलेले फोटो आमच्या गावच्या घराबाजुचे आहेत,गावातल्या स्थितीबद्दल माहीती नाही.आमच्या कंपाउंडच्या आतमधली चित्र आहेत.
फोटो मोठ्या आकारात असल्याने load व्हायला वेळ लागत असल्यास,जमवुन घ्यावे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आज फक्त आंबेच बघु.अजुन फोटो आहेत पण ते सवडीने.
शहरात आंब्यांचे फार कौतुक होत,'हापुस हय्,हपुस' बोलुन काही लोक काहीही चिपकवतात.पण गावाला 'रायवळी'ला काही कींमत नसते,हे बघा.
" alt="" />
" alt="" />
झाडावरचे आंबेसुध्दा वाळीत टाकल्यासारखे दुर्ल़क्षित असतात.झाडावर हे असे गडच्या गड असतात.
" alt="" />
" alt="" />
ही हालत फक्त रायवळीची हां! पण हापुस खुप भाव खाउन जातो, त्याबद्दल व इतर खुप काही सांगायच आहे,वेळ नाही म्हणून बस करतो.
गावची माणस फार प्रेमळ असतात्,म्हणजे चाकरमन्यांना तरी तसच वाटत.ही माणस जवळच्या माणसांची फार काळजी करतात.गावची माणस झाडाचीसुध्दा कशी काळजी घेतात बघा....
" alt="" />
" alt="" />
आपण ह्या भावना फार मागे सोडुन आलोय्.......
....असो.
(हे कधी माडावर पाहीलेय का?? )
आमची प्रेरणा!
दक्षिण भारतात, एका धार्मिक विधीदरम्यान फटाक्यांमुळे नारळाच्या झाडाला लागलेली आग!

(चित्र जालावरून साभार)
तैलचित्र
तैलचित्र!
आदला दिवस पुर्ण आणि आज दुपार पर्यंत गाडी चालवून चालवून जीव अगदी मेटाकुटीस आला होता. कधी एकदा गादीला पाठ टेकवतोय असे झाले होते. गरम तर इतके होत होते की मुक्कामाला पोहोचल्या पोहोचल्या दोन बीअरच्या बाट्ल्या मागवून घेतल्या आणि त्याचा आस्वाद घेत बगिच्यातील खुर्चीवर निवांत बसलो. बसल्या बसल्या केव्हा डोळा लागला तेच कळले नाही.
हवेतल्या गारव्याने जाग आली आणि डोळे किलकिले करुन जरा बघितले आणि खोलीत धाव घेतली - कॅमेरा घ्यायला. कॅमेरा चालू केला आणि बाहेर आलो तर साक्षात "त्याने" हातात कुंचला धरला होता. समोर डोंगराच्या मधे पाण्याचे मस्त व्यासपीठ उभारले होते. आकाशाचा निळ्या रंगाचा कॅनव्हास त्या डोंगरात मस्त पैकी ताणून बसवला होता. हा साधासुधा कॅनव्हास नव्ह्ता. जादूचाच होता म्हणा ना ! त्याच्यावर रेखाटलेले पटकन पुसता येत होते आणि रंग तर असे पसरत होते की बस्स ! मी डोळे विस्फारुन तो रंगाचा अद्भूत खेळ बघत बसलो. किती कमी रंगात असंख्य छटा त्या कॅनव्हासवर फासल्या जात होत्या ! मधेच संगिताची साथ असावी म्हणुन गडगडाट, पावसाचा खर्जातला तालबध्द आवाज, दुसर्या पातळीवरचा पक्षांचा मंजूळ आवाज.... असले भारी पार्श्वसंगीत मी तरी आत्तापर्यंत ऐकलेले नव्हते. खेळ सुरू होण्याची घंटी म्हणून एक कडकडाट झाला आणि रंगमंचावर एकदम प्रकाशाचा झोत पडला. मी आता जरा सावरून बसलो. कॅमेरा सज्ज केला....
त्याने पहीला कुंचला पांढर्या रंगात बुडवला आणि त्या रंगाचा भला मोठा ठिपका त्या कॅनव्हासवर टाकला. बघता बघता तो खाली ओघळणारा रंग त्याने एका फटक्यात उलटा वरच्या दिशेला फिरवला आणि एक पांढराशुभ्र ढग त्या कॅनव्हास वर अवतिर्ण झाला. त्या रंगाला जणू याचा राग आला आणि तो डाव्या बाजूला जरा पिंजल्यासारखा झाला. निळ्यावर हा पारदर्शक पांढरा रंग म्हणजे..... तेवढ्यात त्या रंगमंचावर घोंगवणार्या वार्याचे आगमन झाले. त्या वार्याबरोबर त्याने काळा रंग शिंपडला. तो थोडा उचलला आणि तसाच सोडून दिला. ज्या वेगाने तो खाली पसरायला लागला ते पाहून मी दचकलो. मला वाटलं शाई सांडते तसा हा रंग आता खाली सांडणार आणि पाण्यात मिसळणार. पाणी काळे होणार, पण त्याने मग त्याच्या कुंचल्याची अजून एक करामत दाखवली. तो रंग त्याने आडव्या फटक्याने उजव्या बाजूला पसरवला आणि निवांत त्या रंगाची गंमत बघत बसला. मधेच त्याने कुठून कोणास ठाऊक एक पांढरा रंग त्या काळ्या रंगात सोडून दिला, त्याचा झाला तरंगणारा धुरकट डोंगर. मी आपला माझ्या इलेक्ट्रॉनिक कुंचल्याशी मारामारी करत त्याची कॉपी करायचा प्रयत्न करत होतो.
एकदम त्या रंगमंचावर स्तब्धता पसरली. जणू काही त्याने संमोहनअस्त्र वापरुन सगळे विश्व थांबवले, माझे तर बोटही उचलेना - कॅमेर्याचे बटन दाबायला. एक क्षण असा गेला आणि परत त्या रंगमंचावर गडबड उडाली. पावसाचे थेंब ताडताड वाजायला लागले, विज चमकली, रंगाची झपाझप सरमिसळ झाली आणि तो काळा रंग या टोकापासून ते त्या टोकापर्यंत झपाट्याने खाली उतरायला लागला. मी माझा श्वास रोखून पुढे काय होणार याची वाट बघू लागलो. तेवढ्यात काय झाले कोणास ठाऊक त्याने एकदम तो रंग जागेवरच थांबवला. जणू काही त्याला खालच्या डोंगराची काळजी वाटत होती. खालचे, मर्त्य जग खाली आणि हा स्वर्ग वरती राहिला. मधे तयार झाली एक या दोघांना विभागणारी रेषा. या रेषेत मी अडकलो. वर जाता येईना आणि खाली यायची इच्छा होईना !
कुण्डलिका दरी...............
कुण्डलिका दरीचे काही फोटो








