user

स्थिरचित्र

माझी पण कोकण भ्रंमंती... थोड्या अपरिचित कोकणात...

सध्या सतत कोकणात भटकतेय. गठ्ठ्याने फोटु मारतेय. अर्थात बरेचसे लोकेशन रिसर्च चे असल्याने इथे टाकता येत नाहीत पण त्यात नसलेले काही असंच सहज म्हणून टाकतेय.
फोटोंच्या क्रमाला महत्व नाही.

100_4195
असाच एक मॅजिकल मॉन्सून...

Shpr-vaayangani
भातशेती.

vicharamagna-digdarshak
नदीकाठी उभा असलेला माझा विचारमग्न दिग्दर्शक. माहौलच असा की परत प्रेमात पडल्याशिवाय पर्याय नव्हता.

Goa-chorla-ghat-view-(6)
इथून सूर्यास्त पण अप्रतिम दिसतो पण पोचायला उशीर झाला. आणि जे मिळालं ते असं. नदी, धरण, डोंगर, झाडी हळूहळू सगळे आकार वितळून एकमेकात शिरत असताना पाह्यले.

aronda
सुंदर खाडी, होडी, झाडी, डोंगर आणि थोडासा निवांत वेळ आणि नुकता नुकता घेतलेला कॅनन पॉवरशॉट SX 120 IS

Aronda-khadi-(33)
आरोंद्याच्या किरणपाणी खाडीवरचा आरोंदा-पेडणे ब्रिज. अजून काम चालू आहे

Tilari-kalawa-(7)
तिलारीच्या कालव्यांमधूनचे रस्ते. नागमोडी राखाडी वाट बाजूला जर्द लाल माती, मधेच कुठे हिरवाई, वर विस्तीर्ण निळं आकाश. कॅमेरा बाहेर आला नाही तरच नवल.

0222-(6)
उगवला नारायण
लाल शेंदराच्या खापा
फुले अंगणात चाफा ||

0222-(18)
उगवले नारायण
सारी उजळे दुनिया
किती लावाव्या समया ||

वरचा कुठलाही फोटो फोटोशॉपमधे रंग बदलून टाकलेला नाही. जसे रंग दिसले तसेच फोटोत मिळाले आहेत सुदैवाने. कॅमेर्‍याला धन्स! सर्व फोटो कोकणातलेच आहेत. थोडं अपरिचित असलेल्या कोकणातले पण कोकणच. जागांची नावं टाकली नाहीत कारण त्यांना इथे महत्व नाही.

- नी

साथ!

कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले.
आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्‍या आजी, हात पाय सुजलेले आजोबा... घर बहुतेक गडकरवाडीच्या डोंगरात म्हणजे थोडा चढ मग वहाळ ओलांडायचा आणि मग एक छोटा पण खडा चढ संपवायचा की आलंच घर...
sath-01

सगळं कसं एकमेकांच्या साथीनं.. किती काय काय दिवस पाह्यले असणार त्यांनी. कित्ती वर्षं कुणास ठाऊक. आत्ताचेही दिवस कष्टाचे असतीलच की पण तरी डोक्यात जास्वंद का होईना माळण्याइतक्या आजी उत्साही होत्याच.
sath-02

ते दूर जाईपर्यंत, डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे मला दिसेनासे होईपर्यंत मी त्यांच्याकडेच बघत राह्यले. हे असंच कायम रहावं अशी इच्छा करत आणि तोच आशिर्वाद त्यांच्याकडे मागत....
sath-03

- नी

----------------------
मिपावर फोटो चढवणे हे थोडं कटकटीचं असल्याने आधी इतरत्र टाकलेलं हे फोटो फिचर इथे टाकायला कंटाळा केला होता.

विलोभनीय नायगरा!

यंदा नायगरा ला जाण्याचा योग आला ,मेमोरिअल डे ची सुट्टी असल्याने लाँग वीकेंड मिळाला होता.खरे तर खूप लांब चा प्रवास होता पण नवरापण स्वखुशीने तयार होता !
शनिवारी खायचे ,प्यायचे घेवून डिकी भरून घेतली ,गाडी बरोबर आपल्याला पण पेट्रोल हवे ना! गुगल रावांकडून पण माहिती गोळा करून झाली.GPS पण सज्ज झाला आणि आम्ही निघालो.
खरे गाडीत लांब जायचे असल्यास मजा येते पण ३,४ तास गाडी सतत चालवल्याने सवय नसणार्याला दमायला होते.मध्ये १,२ वेळा थांबून पोहोचलो एकदाचो!



दुरूनच नायगरा नदी दिसत होती ,मुलगा पण माहिती देत होता lake Ontorio आहे म्हणून .खूप थकल्यासारखे वाटत होते पण फ्रेश होवून लगेच जायचे ठरले.
म्हणून हॉटेल वर सामान टाकले आणि थोड्यावेळात निघालो . मस्त परिसर व थंड हवेने थकवा पळाला.पर्यटकांपैकी बहुतेक ८०% भारतीय होते.
प्रचंड असा जलप्रपात पाहताना मन अंतर्मुख होवून गेले.सगळेजण हे असीम दृश्य कॅमेर्यात टिपायचा प्रयत्न करत होते त्यात मीही सामील झाली.





दुसर्यादिवशी हॉटेलवर ब्रेकफास्ट करून "Maid of the Mist " च्या राईड च्या रांगेत उभे राहिलो.१ तासाने बोटीत चढल्यावर मिळेल तिथे उभे राहिलो.
सहस्र जलधारा कोसळताना जवळून पाहताना खूप मस्त वाटत होते.
पटापट फोटो काढले जात होते.हळू हळू बोट धबधब्याच्या जवळ जावून पोहोचली.













त्यानंतर तिथेच असलेल्या Imax Theator मध्ये नायगर्यावर माहितीपट पाहिला.रौद्र तरीही विलोभनीय असे नायगारा दर्शन त्यात झाले.
त्यानंतर तिथेच दुपारचे खाणे झाले वेजी रोल!वेज मध्ये जास्त पर्याय नसल्याने काय खावे असा प्रश्न न्हवता!


मग Cave of the winds ह्या राईड साठी निघालो तर भली मोठी रंग होती.उन पण खूप होते पण सगळे जण उभे होते.धबधब्याच्या अगदी जवळ जाता येते ना !
त्यासाठी तिकीट दाखवून पिवळा रेनकोट आणि चपला घेवून आम्ही पण रांगेत उभे राहिलो.तब्बल अडीच तासाने आम्ही लिफ्ट ने खाली आलो आणि धबधब्याच्या दिशेने निघालो.
लाकडी डेक वर चढून लोक ग्रुप मध्ये धबधब्याच्या तुषारांमध्ये मनमुराद भिजत होते.



मुलाने पण मनसोक्त भिजून घेतले.तो हलायलाच तयार न्हवता.थोड्या वेळाने हॉर्स शु पॉईंट कडे निघालो.


त्यानंतर हॉटेल वर जावून थोडा आराम केला जवळ हॉटेल असल्याने हा फायदा झाला.
कॉफी मेकर मध्ये पाणी तापवून टी बॅग्ज ,मिल्क पावडर ,साखर टाकून मस्त चहा बनवून पिला तेव्हा कुठे बरे वाटले.
रात्री फटाक्यांची आतिषबाजी पहायची असल्याने जवळच असलेल्या "पंजाबी हट"मध्ये जेवायचे ठरले.तिथे गेलो तर धर्मेंद्र बरोबर मालकाचा फोटो लावला होता !
जेवण पण छान होते.जेवण करून परत नायगरा पार्क मध्ये गेलो, खूप गर्दी झाली होती.
कॅनडा चे रंगीत दिवे नायगर्याला रंगीत साज चढवत होते.






मग फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली.मला छान जागा मिळाली असल्याने भरपूर फोटो टिपता आले.






























नायगर्याला मनात साठवून परत निघालो.निसर्गनिर्मित विशाल ,विराट असे पाहिले कि आपण सूक्ष्म होवून जातो.

(तीळ आणि त्याचा अर्थ)

आता ह्या तीळाचा अर्थ काय तो आम्हास ठाऊक नाही. परंतु, जे काही आहे ते ह्या तीळामुळेच, अशी आमची खात्री आहे! Wink

माधुरी'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

१५ मे! आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माधुरी दीक्षित-नेने' ला HAPPY BIRTHDAY!

उद्धव ठाकरे यांचे "महाराष्ट्र देशा" पुस्तक

नेहेमी प्रमाणे यावेळी देखील पुण्यात गेल्यावर अप्पा बळवंत चौकात भटकुन आलो (बायकोला माहेरी सोडायला आणी पुस्तक खरेदि करायला). यावेळी मनाला जरा आवर घालुन निवडक खरेदि केली. कारण दर वेळी २/३ डझन पुस्तकं घेउन येतो आणि नंतर वाचायला वेळच मिळत नाहि. असो.

यावेळी एक छान पुस्तक हाती लागले आहे. साधारण पणे ६/७ वर्षापुर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या हवाई छायाचित्रणाचे प्रदर्शन बालगंधर्व मधे पाहिले होते. आपल्या आवडत्या किल्ल्यांची, मंदिरांची, सागरकिनार्‍यांची भिंत भिंत लांबी ऊंचीची स्थिरचित्रे बघुन मी तर थक्क झालो होतो. छाताडात धडकी भरवणारा कोकण कडा, आव्हान देणारा तेलबैला, जहाजा सारखा आकार असलेला उंदेरी, लांबच लांब पसरलेली अजिंठ्याची लेणी, एकांडी उभी कुलाब्याची दांडी ह्यांचे खरेखुरे भव्य स्वरुप त्यातुन सार्थकपणे व्यक्त होत होते. महाराष्ट्राचे सौंदर्य नव्याने कळुन आले. त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे. भारावलेल्या अवस्थेत बाहेर येतांना अभिप्राय वहित हे सगळं पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध व्हावे असे लिहुन आलो. अशीच प्रतिक्रिया अनेक जणांनी आधीच लिहुन ठेवली होती. पुढे बरेच दिवस काहि कानावर आले नाहि.

पण यावेळी मात्र हि सगळि छायाचित्रे असेलेले पुस्तक हाती लागले आहे - उद्धव ठाकरे यांचे "महाराष्ट्र देशा". अलभ्य लाभ! पानांवर क्रमांक नाहित पण साधारण पणे १००-१५० पाने असावीत. पुस्तकाची मांडणी आकर्षक आहे. पुस्तकासाठी वापरलेला कागद आणि छपाई उत्कृष्ठ दर्जाची आहे. किंमत नाममात्र १००/- ठेवण्यात आली आहे. प्रत्येक (माझ्या मते!) मराठी माणसाच्या संग्रहात हवे असे हे पुस्तक आहे.

म.टा. बातमी: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5866015.cms
सकाळ बातमी: http://72.78.249.124/esakal/20100428/5285395004349812569.htm

जय महाराष्ट्र!

मॅजिक किंगडम!

मॅजिक किंगडम

लिबर्टी स्वेयर बोटीने आम्ही मॅजिक किंगडम च्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो.

बोटीतून दिसलेले डिस्ने चे रेसोर्ट.

गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून थोडे पुढे गेलो आणि सिंड्रेला चा महाल दिसला. हेच मुख्य आकर्षण आहे.

डिस्नेवर्ल्ड चा स्वप्न सत्यात आणणारा जादुगार !

वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फॅन्टसी -यशवंत रांजणकर(राजहंस प्रकाशन )हे पुस्तक मिळाले तर जरूर वाचा.

मिकी माऊस ,मिनी,गुफी सात बुटके,डोनाल्ड डक ,हिमगौरी ,पिनाचिओ,मेरीमेड असे सर्व डिस्ने कॅरॅक्टर्स मुलांना भेटून त्याच्याशी गप्पा मारतात त्यांना सह्या देतात.मुलांना पण खूप अप्रूप असते त्याचे.
कार्टून वेड्या मुलांना ह्या मिकी ,गुफी,सिंड्रेला बरोबर फोटो काढायला खूप छान वाटते.
आणि आपलेपण वाटावा म्हणून मधून मधून डिस्ने टीम मधले कोणीना कोणी आपल्याला शुभेच्छा देत असतात.आणि मुलांना खेळायला रिंग किवा स्टिकर्स देतात.मग दुखणारे पाय पाय चालू लागतात.
सगळी कडे छान परिसर असल्याने फोटो काढायची ज्यांना आवड आहे त्यांना भरपूर वाव आहे.
मग आम्ही राईडस घ्यायला निघालो.सुट्ट्यांचे दिवस असल्याने रांग खूप मोठी असायची ,उभे राहून पायांची वाट लागायची.

मुलांबरोबर नाचताना डिस्ने ची हसरी नाचरी टीम.

काही राईडस च्या सुरुवातीला आधीच सूचना दिलेल्या असतात.त्या वाचून आपण जायचे कि नाही ठरवायचे.
मागे सिक्स फ्लॅग ला गेलो होतो , पण तिथे अशा काही राईडस होत्या कि वाटायचे,हि राईड आहे की शिक्षा ?
तसे डिस्नेपार्क मध्ये जाणवले नाही.
उदाहरणार्थ.

स्पेस ऑर्बिट सफारी.

अलिस इन वंडरलँड, सिंड्रेला , हिमगौरी आणि सात बुटके,डोंगरातली रेल्वे अशा राईडस होत्या.अंधारातून भुते ,परी ,सिंड्रेला ,मिकी असेहि भेटत .मधून पाण्यातून तर मधेच आगीमधून चाललो आहोत
असा भास होई.तर कधी उंचावरून एकदम दरीतून रेल्वे जाई.पण ती दरी येईपर्यंत गुहेतून जाताना छान हलते देखावे असत.त्यात आपण रममाण असताना एकदम झूऊऊऊऊऊऊऊम.....दरीतून गाडी जाई,
दरी पण कशी तर पाणी असलेली ... पाण्याच्या शिडकाव्यात भिजून आपण बाहेर येतो.ह्या दरी मध्ये कॅमेर्यातून आपला फोटो पण काढला जातो ,पण फोटो जरा महाग वाटला.घाबरलेले आपण कसे दिसतो
ते पण बघायला मिळते.आम्ही नुसता फोटो पाहून घेतला!




अलाउद्दीन चा उडता गालीचा.(इथे हा गोल गोल फिरतो.)

चित्रकार तो ...

बोटीतून दिसलेला देखावा.



स्विस रॉबिनसन चे कुटुंब राहत असलेल्या महाकाय झाडावर पण जावून आलो.आधी वाटले हे खरे आहे कि काय पण ते बनवले होते.

जेवायची खोली .....

पाणी वर कसे आणले जाते ......

रात्री फायरवर्क्स ,लेसर शो खूपच मनोवेधक होता.त्यात वेगवेगळ्या रंगाची उधळण असल्याने महाल खूप जादुई भासत होता.सोबतीला सुरीले संगीत होते मग काय....!
श्रवणीय सुरांच्या तालावर फायरवर्क्स पाहून स्वर्गात आल्यासारखे वाटले क्षणभर!
रात्री ११ पर्यंत हा शो सुरु होता.सगळ्यांबरोबर माझाही कॅमेरा सज्ज झाला होता.
रात्री दिसणारा सिंड्रेला चा महाल!















एक परेड पण खूप प्रेक्षणीय असते.मिकी,डोनाल्ड डक,सिंड्रेला आणि राजपुत्र,मेरीमेड,ससे,मासे,पर्या असे बच्चे कंपनीची दोस्त मंडळी ही सगळी ह्या परेड मध्ये असतात.
रात्री लाईटस चे ड्रेस घालून हि मंडळी नृत्य करत जातात.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोक आधीच आपली जागा पकडून ठेवतात.सर्वजण कॅमेरे सज्ज करून वाट पाहत होते.
छानसे संगीत सुरु झाले कि एक एक रथ सरकू लागतात.पर्या ,मिनी,डोनाल्ड सगळी नाचत मुलांशी हात मिळवत पुढे जातात.
ह्या आनंद्यात्रेतील काही क्षण पकडण्याचा प्रयत्न.

























शो संपल्यावर मोनोरेल ने परत निघालो.

फुलव पिसारा नाच :)

मला आलेल्या एका मेलमधले हे फोटोज...अतिशय सुंदर वाटले, आवडले म्हणून शेअर करत आहे Smile

आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ... Smile

पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया (?) सवंगडया नाच, नाच रे मोरा .

पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

आमची काही चित्रे

नमस्कार,
आम्ही मिपावर नविनच आहोत, आम्ही प्रसवत असलेली चित्रे आणी काही लिखाण इथे द्यावे म्हणतो....

झणझणीत

नमस्कार मंडळी!

आज रंगपंचमीच्या निमित्ताने माझे हे रंगीत उद्योग.

Syndicate content
Scroll to Top