user

स्थिरचित्र

उजाड!!

विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं.
कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्‍या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं..

काळा राजहंस, गोरा मोर आणि इतर

काल आम्ही एका जवळच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. "साउथविक्ज झू" असे त्याचे नाव आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न्यु इंग्लंड (अमेरिकेतील उत्त्तरपूर्व भागातील ६ राज्ये) मधील हे सगळ्यात मोठे प्राणिसंग्रहालय आहे. खरे खोटे माहीत नाही. पण त्यात काढलेली काही छायाचित्रे येथे दाखवत आहे. मी काही छायाचित्रकार म्हणून तज्ञ नाही पण एखादे आवडणारे दृश्य तात्काळ टिपायचा प्रयत्न करतो. हा त्याचाच भाग आहे. फक्त वरील शिर्षकाच्या अनुक्रमाने हे फोटो नाहीत...

तर हा खालील २-३ छायाचित्रे आहेत ती चिडलेल्या सिंह आणि सिंहीणीची. एका चित्रात ती केवळ जाळीच्या मागे दिसेल ज्यात ती उठण्याच्या पोज मधे आहे (खाउ की गिळू). कारण ही तसेच होते. दोघे बिचारे शांतपणे बसले होते. बाजूला काही मुले त्यांनी डरकाळी फोडावी म्हणून जोरजोरात ओरडायला लागली. ते त्यांना शेवटी असह्य होऊ लागली आणि ती सिंहीण एकदम उठून आता ती जाळी सोडून बाहेर येणार का काय अशा त्वेशाने उठली... मग त्या सिंहाने बाजूला असलेल्या एका दरवाज्याला (ज्यातून त्यांना खाणे दिले जाते त्याला) धक्के मारून पाहीले. शेवटी रागारागाने दुसरीकडे जाऊन चालू लागले... हे वास्तवीक मला बघताना अस्वस्थ होत होते. पण तरी देखील छायाचित्र काढण्याचा मोह टाळता आला नाही...



खालील छायाचित्राला काही लिहीण्याची गरजच नाही...!

खालील चित्रात दाखवलेला मोर मी तरी प्रथमच पाहीला. हा सगळीकडे हिंडत होता. त्याचा आधी नुसताच फोटो आहे, नंतर पिसारा फुलवलेला दिसला म्हणून जसा मिळाला तसा काढला. त्यानंतर अजून छान काढता आला पण एक हरणाच्या जातीतील प्राणि त्याच्याशी मस्ती करत होते (आणि मोर पण त्याच्याबरोबर) त्यामुळे जरा मधेमधे आले आहे... तरी देखील त्याचे देखणेपण लपलेले नाही...



मोगरा फुलला...

पहिला दिवस...

दुसरा दिवस...

तिसरा दिवस...

स्थळ - घरचा बगिचा
दिनांक - ७. ८ आणि ९ एप्रिल, २००९
कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!

पुलावरचा न्हावी

नमनाचे तेलः

माझी बायको ऑईल, वॉटर आणि पोस्टरकलर अशा माध्यमात चित्रे काढत असते.
तिची काही चित्रे इथे तुम्ही पाहिली होतीच.
इतकी वर्षे तिची चित्रकारी पाहता-पाहता मलाही रंगांशी खेळायची हुक्की आली.

आमच्या गावात एक आर्किटेक्ट/लेखक/कवि/नाट्यकर्मी कलाकार आहेत - प्रकाश धर्मा म्हणून.
अत्यंत हरहुन्नरी माणूस. स्वतः उत्कृष्ट चित्रकार.
त्यांनी एक प्रयोग म्हणून नवशिक्या, अर्धशिक्षित आणि अनुभवी चित्रकारांना वॉटरकलर चित्रकला
शिकवायला सुरुवात केली. दर रविवारी सकाळी उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या परिसरात हा प्रयोग सुरू असतो.
(हे वाचून इथल्या कुणाला हुक्की आली तर तेही सामिल होऊ शकतात. प्रवेश विनामूल्य!)

मीही त्या प्रयोगात नवशिक्या म्हणून सामिल झालो. चुकत माकत काही कागद आणि बरेच रंग खराब केले.
अजून करतोच आहे. मी रंगवलेले एक चित्र येथे देण्याचे धाडस करतो आहे.
काही चुकलंय असं वाटलं तर सांगा.
काही बरं वाटलं तर श्रेय 'मास्टरजींना'. Smile

आता चित्र :

शीर्षक : पुलावरचा न्हावी (द बार्बर ऑन द ब्रिज)
माध्यम : वॉटरकलर (जलरंग)
आकार : ६ इंच * ४ इंच अंदाजे.

चित्राबद्दल थोडेसे :
दररोज ऑफिसला जाताना मला नल्लाकुंटा नाल्यावरील पुलाच्या फुटपाथवर हा न्हावी आपले दुकान मांडून बसलेला दिसतो. हे दृष्य मला कालौघातील दोन बिंदूंना जोडणार्‍या पुलासारखं दिसतं. म्हणून चित्राचं नाव 'न्हाव्याचा पूल' किंवा 'द ब्रिज ऑफ द बार्बर' असं द्यावं काय? असाही विचार मनात डोकावतो. (स्पष्टीकरण : जागतिक नकाशावरच्या आजच्या शहरात अजूनही साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या खेड्यात पिंपळाच्या पारावर हजामतीचं दुकान मांडणारे न्हावी दिसतात. )

बंड्याची शाळा - धडा तिसरा

बंड्याची शाळा
(धडा तिसरा - मधली सुट्टी)

बाकी सगळ्या विषयांना ४५ मिनिटं आणि मधली सुट्टी फक्त ३० मिनिटं ह्या अन्यायाचं कारण मला अजून सापडलं नाहिये. मुलांना जे आवडतं ते करू द्यायचं नाही हा सर्व शाळांमध्ये अलिखित नियम असावा. पि. टी. चा तास आठवड्यातून फक्त २ दिवस आणि गणित, इतिहास मात्र रोज. कधी कधी तर दोन वेळा. ह्या बद्दल मी दहावीत असताना आमच्या एका सरांकडे खंत व्यक्त केली होती. तेव्हा 'मोठेपणी पि. टी. कामाला येणार नाही. हेच विषय कामाला येतील' असा सल्ला मला देण्यात आला. मास्तरांच्या इतर सल्ल्यांप्रमाणेच हा पण कुचकामी ठरला. रोज सकाळी लोकल पकडताना पि. टी. च्या तासाला मैदानाला मारलेल्या चकराच कामाला येतात. पाढे आणि तहाची कलमं स्टेशनवर उभा राहून मोट्ठ्याने म्हणायला लागलो तर फार फार तर सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटेल.

तर, शाळेच्या त्या आठ विषयांच्या रखरखीत वाळवंटात मधली सुट्टी म्हणजे आमचं हक्काचं ओऍसीस होतं. मधल्या सुट्टीच्या घंटेची आम्ही अगदी कानात प्राण आणून वाट पाहायचो. घंटा बडवणारा प्यून आज चुकून १० मिनिटं आधीच बेल वाजवेल अशी रोज आशा वाटायची. पण दहा वर्षात एकदाही असं झालं नाही. नियमाला अपवाद म्हणूनही नाही. मधली सुट्टी फार कमी वेळ असल्याने खेळण्याचा एक क्षणही वाया जाऊ नये म्हणून आम्ही आदल्या तासालाच डबा संपवायला सुरुवात करायचो. तास संपेपर्यंत आमचा डबाही संपलेला असायचा. मधल्या सुट्टीचा तो अर्धा तास हा हा म्हणता संपायचा. इतक्या पटापट बाकीचे तास कधीही संपले नाहीत.

मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानावर बरेच खेळ चालायचे. त्यातला सगळ्यात आवडता म्हणजे अर्थातच क्रिकेट. दिवसचे दिवस मॅचेस चालायच्या. कालच्या राहिलेल्या इनिंग्स आज कंटिन्यू व्हायच्या. त्यात कुणी तरी रन्स लिहिलेला कागद बदललेला असायचा, मग त्यावरून मारामारी झाली, १-२ जणांचे शर्ट फाटले की पुढे खेळायला सुरुवात व्हायची. त्यात पुन्हा गोंधळ. कालच्या आणि आजच्या मधल्या सुट्टीच्या दरम्यान काही जणांच्यात भांडणं झाल्यामुळे टीम्सची फेर-रचना व्हायची. इतकं होई पर्यंत पंधरा मिनिटं झालेली असायची.

दुसरा आवडता खेळ म्हणजे मारामारी. ह्यासाठी काहीही कारण लागत नसे. बाईंना नाव सांगितलं पासून ते मला खुन्नस का दिलीस इथपर्यंत काहीही चालत असे. सर्वसाधारणपणे मारामारी करणारेही काही ठरावीक विद्यार्थी असत. मी त्या फंदात कधीही पडलो नाही. कारण मारामारी म्हटलं की मार देण्यासोबतच मार खाणंही आलंच. पण मार खाण्याचा कोटा वर्गात मास्तर आणि घरी पिताश्री इमाने इतबारे पूर्ण करत असल्याने नव्याने मार खाणं नको व्हायचं. आम्ही आपले बाहेरून टाळ्या वाजवायला. दोन आडदांड मुलांना एकमेकांवर दात ओठा खाऊन तुटून पडताना बघण्यात जी मजा असते ती सांगून कळणार नाही. अशी मारामारी सुरू असताना, त्यातल्या एखाद्यावर असलेली खुन्नस काही जण काढून घेत. समोरा समोर मारामारी करायचा दम नसल्याने त्या गर्दीत ज्यानी आपल्याला आधी ठोकलं आहे अशाला गर्दीचा फायदा घेऊन लाथा बुक्के मारत. मग ह्यातून उप-मारामारी सुरू होत असे. वा वा वा. काय नजारा असे तो. १५-२० मुलं घोळक्यात आहेत, कोण कुणाला मारतंय ह्याचा पत्ता नाही, कोण कुणाच्या बाजूने आहे माहिती नाही, मार खाणाऱ्याला आपण मार का खातोय आणि मारणाऱ्याला आपण का मारतोय ह्याचाही बऱ्याचदा पत्ता नसे. पण मजा यायची.

शाळेच्या मैदानावर आम्हाला गोट्या खेळायला सक्त मनाई होती. तरीही आम्ही नियमाला न जुमानता एखादा कोपरा पकडून गोट्या खेळतच असू. त्यातले आवडते प्रकार म्हणजे दहा-वीस, राजा-राणी आणि ढुस्स. ह्यात पुन्हा चिटींग आणि मारामारीला ऊत यायचा. नेम धरताना बोट जमिनीला न टेकवणे, वीत घेताना अंतर ढापणे, गोटी शेजारी उभं राहून पायाने हळूच गोटी पुढे सरकवणे इत्यादी प्रकारांवरून यथेच्छ भांडणं व्हायची. चार आण्याला १० मिळणाऱ्या गोट्यांवरून इतकी मारामारी करायचो हे आठवून आज हसू येतं. पण त्यावेळी ती एक गोटी म्हणजे जगण्या-मरण्याचा प्रश्न असे.

पुढचा आवडता उद्योग म्हणजे बोरं आणि चिंचा पाडणे. शाळेच्या आवारात आंब्याचं झाड होतं. पण त्याला हात लावायची कुणाच्यातही धमक नव्हती. एकदा मी मला झाडावर चढता येतं हे दाखवण्यासाठी त्या झाडावर चढलो. त्यावेळी खरं तर आंब्याचा सीझनही नव्हता, पण पैज लावून चढलो. आणि नेमके त्याच वेळी आमचे पि. टी. चे सर मैदानात आले. माझी वर पार म्हणजे पारच तंतरली. साक्षात यम आणि त्याचा रेडा एका शरीरात एकजीव होऊन समोर आल्यावर अजून काय होणार? सरांनी मला प्रेमाने खाली उतरायला सांगितलं "जोशा, माकडा सारखा वर काय चढलायस, पाच मोजायच्या आत खाली उतर. " मी काही ऐकलं नाही. कसा ऐकेन? साक्षात सिंह आणि अजगर एका शरीरात एकजीव होऊन समोर आल्यावर अजून काय होणार? खाली वाघ डरकाळ्या फोडत फेऱ्या मारत असताना झाडावर बसलेल्या माकडाची जी अवस्था होत असेल तीच माझी झाली होती. मग सरांनी आमच्यातल्या एकाला झाडावर चढून त्याला खाली उतरवायला सांगितलं. पण मास्तरांच्या कंपूत कोण सामील होणार. सगळ्यांनी झाडावर चढता येत नाही असं सांगून सुटका करून घेतली. शेवटी वैतागून मला आठवडाभर मधल्या सुट्टीत झाडावर चढून बसायची शिक्षा फर्मावून सर निघून गेले.

ही भयावह घटना सगळ्यांच्या मनात घर करून असल्याने आंब्याचं झाड आम्हाला वर्ज्य होतं. शाळेजवळच २-३ चिंचेची आणि बोरांची झाडं होती. किमान १० दगडाला एक ह्या हिशोबाने बोरं पडत असत. चिंचा काढायला आम्ही एक बांबू मिळवला होता. बोरं जो पाडेल तो खायचा पण चिंचांचं मात्र सार्वजनिक वाटप व्हायचं. कारण तो बांबू धरायला किमान २ मुलं लागत, पडणाऱ्या चिंचा खाली पडू दिल्या तर पिचकत त्यामुळे त्या झेलण्यासाठी २-३ पोरं अशी टीम असे. लोकांनी पाडलेली चिंचा, बोरं पळवणारीही काही वाह्यात कार्टी होती आमच्यात. मग तावडीत सापडल्यावर त्यांना मारही सार्वजनिक मिळत असे.

कधी कधी मधल्या सुट्टीत मी झोपतही असे. पण एकदा माझी झोप मधल्या सुट्टीवरून पुढच्या गणिताच्या तासाल कंटीन्यू झाली होती. आधी मास्तरांनी मी उठेन म्हणून वाट बघितली. पण ते होणे नाही हे लक्षात आल्यावर मला धपाटा घालून उठवलं. सगळा वर्ग फिदीफिदी हसत होतां. प्रचंड अपमान. त्यावर कडी म्हणून सरांनी मला पुढचा अर्धा तास झोपायची शिक्षा फर्मावली. दर पाच मिनिटांनी विचारीत "झोपलास का रे? " भीती आणि अपमानाने वाट लागली असताना झोप कशी येणार "नाही सर" मग मी न ऐकल्याबद्दल अजून २-४ धपाटे मिळाले होते.

ह्या शिवाय इतर आवडते उद्योग म्हणजे बाकांवर उड्या मारणे, लोकांच्या दप्तरांमध्ये कागदाचे बोळे भरणे, कुणी बाथरुम मध्ये गेल्यास बाहेरून कडी घालणे. एकदा कडी घालताना पकडल्या गेल्यामुळे मला तब्बल दहा मिनिटं बाथरुम मध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं. चालू तासाला हे झालं असतं तर दु:ख नव्हतं पण ती दहा मिनिटं मधल्या सुट्टीतली असल्याने जास्त वाईट वाटलं होतं.

शाळेतल्या ह्या सगळ्या उपद्व्यापांच्या खाणाखुणा आम्ही आजही अंगावर बाळगून आहोत. कधी कधी निवांत बसलो असताना एखादा अजून असलेला व्रण अथवा जखमेची खूण आठवते आणि मधल्या सुट्टीची आठवण मनात दाटते. अशी ही आमची आवडती मधली सुट्टी अजूनही आम्हाला प्रचंड जवळची वाटते. हिच्याशी बरोबरी करेल अशी एकही गोष्ट आमच्या शालेय जीवनात नव्हती. अजूनही नाही.

मधल्या सुट्टीच्या मजेची तुलनाच करायची झाली तर त्याला काही प्रमाणात पॅरेलल अशी एकच गोष्ट आहे - तुडुंब जेवल्यानंतरची रविवार दुपारची झोप.

सूर्यास्त मालवण समुद्र किनारी..

इ.स. २१७९ - लॉस अँजलिसवर परग्रहवासीयांचा हल्ला

परवा ग्रिफिथ ऑब्झर्व्हेटरी नावाच्या एका जागेवरून लॉस अँजलिस डाऊनटाऊनचा फोटो काढला. त्या फोटोवरून मला ही कल्पना सुचली. मूळ फोटो आणि संपादित केलेला फोटो खाली देत आहे. संपादनासाठी जिंप ही मुक्तस्रोत प्रणाली वापरली आहे. कृपया आपले अभिप्राय कळवावेत.

मूळ चित्र -

बदल केलेले चित्र -

-भटोबा

छोट्यांसाठी वॉलपेपर

माझ्या दीड वर्षाच्या मुलीला आतापासून संगणकाचा लळा लागला आहे. बालगीते मस्त एन्जॉय करते.
तिच्यासाठी बालगीतातील/ नर्सरी रिम्स सिडी तील तयार केलेले काही वॉलपेपर तीला खुप आवडतात.
ही घ्या काही तुमच्या कडील छोट्यांसाठी. त्यांनाही आवडतील





राऊरकेला

दिड वर्षांपूर्वी मला स्वप्नात देखिल वाटले नव्हते की, मी एम् टेक करण्यासाठी ओडिसा राज्यात जाईल. ज्या राज्याचा उल्लेख फक्त महानादीच्या पुरापूरता आणि रथ यात्रेपूरता येतो, त्याच राज्यात एक भारत सरकारच्या कायद्यानुसार राष्ट्रीय महत्वाचे इंजीनियरिंग महाविद्यालय आहे, राष्ट्रीय तंत्रद्न्यान संस्था, राऊरकेला , हे त्याचे नाव.
असो, मी मिसल पावचा नुकताच सदस्य झालो, भटकंती हा माझ्या अनेक छंदान्पैकी एक, म्हणुन सुरुवात करतांना या राज्याचे सौंदर्य मी आपल्या समोर ठेवत आहे.
ओडिसा राज्य जितके निसर्गसुन्दर तितकेच कमालीचे विरोधाभासी आहे. एकीकडे सम्पन्न असा किनारी प्रदेश तर दुसरीकडे अतिशय मागास असा पश्चिम भाग. किनारी प्रदेश शेती, शिक्षण, आणि वाहतुकीच्या सुविधेमुले पुधारलेला तर पश्चिम भाग नक्सलवाद, अशिक्षण, आदिवासींना लुतनार्या खानिच्या कम्पन्यान्मुले मागासलेला. आशा या राज्यात अनेक सहलिची ठिकाने आहेत. मी माझ्या वार्गमित्रान्सोबत अनेक ठिकाणी गेलो, त्यापैकी काहींची माहिती देत आहे.....

१. राऊरकेला
हे शहर ओडिसा चे तीसरे महत्वाचे शहर असून या राज्याची औद्योगिक राजधानी आहे. अतिशय घनदाट जंगल असलेले निसर्गसंपन्न वातावरण आणि विपुल खनिज संपत्ति असलेल्या या भागात १९५८ मधे भारत सरकारने स्टील प्लांट सुरु केला आणि सुनियोजित असे राऊरकेला शहर वसवले. याच दरम्यान इथे रीजनल इंजीनियरिंग कॉलेज सुरु करण्यात आले. हेच कॉलेज आता राष्ट्रीय महत्वाचे असे नेशनल इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी म्हणुन देशातील उत्तम कोलेजान्मधे प्रसिद्ध आहे. या शहरात आणि जवल अनेक सुंदर ठिकाने आहेत. अभ्यासातून वेल काढून आम्ही मग भटकंती करण्यासाठी बाहेर पडत असू...

हनुमान वाटिका:
हे उद्यान राऊरकेला स्टील प्लांट ने वसवले आहे. याचे ख़ास वैशिष्ठ्य म्हणजे ७२ फ़ुट हनुमानाची मूर्ति. मूर्ति अतिशय प्रसन्न असून, बांधनी आकर्षक आहे. खरे पाहता हे उद्यान अनेक आकर्षक मंदिरांचा समूह आहे.

Hanuman Statue in Hanuman Watika

वेद व्यास :
व्यास मुनिन्च्या चरणाने पावन झालेले हे स्थल अतिशय सुन्दर आहे. या ठिकाणी व्यास मुनिंची एक गुहा आहे. "शंख", "कोयल" आणि जमिनीतून येणारी "सरस्वती" आशा तिन नद्या इथे एकत्र येतात आणि "ब्राह्मणी" या नावाने पुढे वाहतात.

वैष्णो देवी:
राउरकेला रेलवे स्टेशन पासून जवलच हे ठिकान एक टेकडीवर वसले आहे. येथून राउरकेला शहराचे विहंगम दृश्य दिसते. काश्मीर मधील वैष्णो देवी प्रमाणेच हे मंदिर बांधण्यात आहे. साधाराण ५०० पायर्या चढून गेल्यावर आपण देवीच्या गुहेत प्रवेश करतो. हे सर्व बांधकाम कृत्रिम असले तरीही आकर्षक आहे.

Vedvyas Sangam
Sri Ram-Hanuman Bhet
Towards Vaishno Devi
Inside Vaishno Devi Cave
Bhairao Nath
Rourkela Hocky Stedium
On top of Durga Hills
Rourkela Still Plant as seen from Durga Hills
खंदाधर:
राउरकेलाच्या आस पास असलेल्या स्थालान्पैकी हे माझे सर्वात आवडते ठिकान आहे. अतिशय घनदाट जंगल, उंचच उन्च पहाड़ आणि त्या मधून कोसलनारा प्रपात. आयुष्यात एकदातरी इथे गेलेच पाहिजे असे माझे मत आहे. विशेष म्हणजे हा धबधबा वर्षभर चालू असतो. १० जानेवारीला भर सकाली थंडित आम्ही कॉलेज मधून प्रयाण केले. साधारण दोन तासानी आम्ही खंदाधरला पोहोचलो. धबधबा असा कही डोंगरात लपला आहे की जवल जाईपर्यन्त दिसतच नाही. जेव्हा पोहोचलो तेव्हा डोळ्याचे पारणे फिटले. सर्वत्र मन्द धुके पसरलेले होते आणि नेमक्या आशा वेळी त्यावर सुर्याची कोवळी किरणे पडली आणि त्याच्या त्या चमकत्या रुपवारून नजर हटेना. ( आशा वेळी नेमका माज्या कामेर्याचा zoom कमी पडला. Bad luck दुसरे काय?) त्या निबिड़ आरन्यातुन वाट काढत मग आम्ही फेसालनार्या प्रपाताजवल पोहोचलो. माझे तेलुगु मित्र तर फारच खुश होते. आयुष्यात प्रथमच इतके सुन्दर स्थल ते पाहत होते. मग काय...त्या धब्धाब्याखालील कुंदात आम्ही उड्या टकल्या. बर्फासारखे थंड पाणी पण त्या वातावरानात कशाची ही फिकिर वाटत नव्हती. मनसोक्त अंघोळी करुन मग आम्ही सोबत नेलेल्या आचार्याने बनविलेले सुग्रास भोजन केले. ते वनभोजन मी कधीही विसरणार नाही....
असा हा धबधबा राउरकेलपासुन साधारण ११० किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा भारतातील चौथा सर्वात उन्च धबधबा असून त्याचा मुख्य धारेची उंची २४४ मीटर आहे.
Khandadhar water fall in fog
Dense Forest of Khandadhar
Water Fall
Water Fall
Khandadhar forest
Water Fall
Water Fall
At Water Fall

"नात॑......!!!!"

Laughing out loud ;;) नात॑......!!!

एक नात॑ जन्माच॑,
ते फक्त असत॑ आईच॑,
अस्तित्व असत॑ ममतेच॑, वात्सल्याच॑,
येथे स्वार्थाला मात्र स्थान नसत॑.... !!

एक नात॑ रक्ताच॑,
जे फक्त असत॑ भाऊ-बहिणीच॑,
ज्यात फक्त राज्य असत॑ मायेच॑, आपुलकीच॑.... !!

एक नात॑ कर्माच॑,
ज्यात असते कसोटी साठी निष्ठा,
जेथे कामाला येते धैर्य, विरता.... !!

एक नात॑ प्रेमाच॑,
जिथे असतो एक विश्वास,
दोन शरीर॑ अन् एक श्वास....!!

एक नात॑ मैत्रीच॑,
महत्त्व यात आहे वेळेच॑,
पड्त्या वेळेला लागणारया आधाराच॑....!!

एक नात॑ नाव नसलेल॑,
तरीही मर्यादेत बसलेल॑,
दोन मन॑ जुळ्लेल॑....!!

असे म्हट्ले जाते की,
"नाती जुळ्व्णी फार सोप असत॑, पण ती टिकावण फार कठीण होऊन बसत॑."

Syndicate content
Scroll to Top