Skip to main content

शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?

लेखक उगा काहितरीच यांनी गुरुवार, 28/01/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे. शनीच्या चौथर्‍यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ? राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ? आपल्याला याबद्दल काय वाटते ? मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ? सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....

वाचने 58440
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

बर्फ आणि सोडा लागेल. चखण्याला काय आहे ? तिकडे ड्राय काबुली चना मिळतो का ? चकल्याही चालतील. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या बेस्ट ब्रांड बकार्डी ब्लॅक रम आहे. चखण्याला स्वीट अॅण्ड सोअर ड्राय चना... बर्फ सोडा तयार आहे... या सायबांनू...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्रांड तुम बोले वो. चखणेमें भुना हुवा लहसुण और चना, स्पेष्यल मसाला मारके! ऑर्डर प्लीज!

In reply to by संदीप डांगे

गाववाले, राजहंस ढाब्यावर जाने झाले कधी इंजीनियरिंग कॉलेज बाभुळगाव मधी तर, तिथलचे चना रोस्ट खासान! तंदूरी चिकनच्या दहीवाल्या मॅरिनेशनवाल्या मसाल्यात घोयलेले रायतेत! बंबाट आइटम हाय!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जेव्याच्या टायम्बाले तुम्ही अशे आतरंगी काय तरी सांगता. आता जा लागीनच. पैलवान भौ! रैवारी कोंबडी हाय मंग आता... पेटोता लेको जाणून बुजून. निरा सुत नायी तुम्हाले. धागा आपला देवादिकाचा आन् चिकन-मटन-दारूच्या गोठी करू रायले. कुटी फेडसाल हे पापं?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

या धाग्यावर प्रतिसाद फक्त ओल्ड मोन्क दिसला म्हणून

In reply to by अद्द्या

आला....

In reply to by संदीप डांगे

मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!)
कारण बदल हि काळाची गरज आहे.

मुळीच जाऊ नये... काही परंपरा या अनुभवावर तयार झालेल्या असतात... त्यात बदल करणे घातकच ठरते... मुळात अनेक हिंदु देवता या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून त्रास होतोच... हिंदु धर्मात महिलांसाठी दुर्गा, गणपती, भोलेनाथ, महालक्षमी, सत्यनारायण, कृष्ण, श्रीराम वगैरे अनेक सौम्य देवता आहेत. त्यांना सोडून या कडक देवतेचा हट्ट धरणे अनावश्यक आहे...

In reply to by विजय पुरोहित

हिंदु धर्मातील प्रत्येक देवता ही वेगवेगळ्या स्वभाव, गुणधर्म, वैशिष्ट्ये, मेंटॅलिटी यांचे प्रतिनिधित्व करते आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर रामराम करणेच शहाणपणाचे आहेत. मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेलो आहे आणि त्यातूनच सांगतो की वर उल्लेख केलेल्या सौम्य देवता या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत. कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...

In reply to by विजय पुरोहित

मुळात हिंदु भक्तीमार्ग हा महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे: "तुम्ही ज्याचे ध्यान करता तसे तुम्ही बनत जाता." मग आता सांगा की एखाद्या संसारी स्त्रीने या विरागी, निरपेक्ष, ब्रह्मानुसंधानी देवतेचा हट्ट धरण्याचे कारण काय? मुळात अनेक पुरुष तिथे जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात. शनीमहाराज अतिशय काटेकोर हिशेब मांडतात. आणि जे निगेटीव्ह कर्म असेल त्याचा पाॅझिटीव्ह पर्याय तुम्हाला गोरगरीब, अंध अपंग, समाजाने तिरस्कृत केलेले व्यक्तीसमूह यांची सेवा करुनच परतफेड करावा लागतो. तिथे ढोंग करुन उपयोग नाही. एक नारळ आणि १०-५ रुपयाची देणगी देऊन निगेटीव्ह कर्म नष्ट होत नाही. तर ते मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे वर्तणूक सुधारणे यातूनच नलीफाय होते...

In reply to by विजय पुरोहित

राहु आणि शनी यांची युती झाली अन तो एकदा कोणत्या तरी घरात बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा सोग्यानी डोळे पुसावे लागतात. शनिचा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक मंत्र सात वेळा म्हणावा लागतो. (मंत्र सांगायची फ़ीस घेतो मी) आपल्या आयुष्यात एका महिन्यात सुख, समृद्धि आणि शांती नै लाभली तर फ़ीस परत. घरात बरकत राहते. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मीळतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात. महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो. मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात. -दिलीप बिरुटे (अंदाजपंचे पुरोहीत) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर मी वरच म्हटले आहे की असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता शनीमाऊली नव्हे. त्यांना फक्त तुमचे उत्तम कर्म आणि इतरांशी तुम्ही कसे माणुसकीने वागता हेच पहायचे असते... आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits... Then you have no option... You have to go through it... No other options are available...

In reply to by विजय पुरोहित

शनेश्वर असू देत नै तर आणखी कोणी. देव कोणाचं वाईट करणार नाही. (जर तो असेल तर) आपली मस्ती आणि परिस्थिती कुठे तरी आडवी येते आणि त्याचा संबंध ग्रह तारे आणि देवदेवतांशी लावल्या जातो. बाकी, जिथे जिथे पुरुष जात असतील तिथे तिथे महिलांना येऊ द्या. आमचा महिलांना फुल सपोर्ट आहे. आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने हाय काय अन नाय काय ? -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

जिथे जिथे महिला जात असतील. (अपवाद सोडुन द्या) तिथे तिथे पुरुषांनाही प्रवेश देण्यात यावा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली मस्ती आणि परिस्थिती कुठे तरी आडवी येते आणि त्याचा संबंध ग्रह तारे आणि देवदेवतांशी लावल्या जातो.
हे वाक्य फारच आवडल्या गेले आहे. क्या बात है ! बाकी धाग्याच्या विषयावर आमचे काहीही मत नाही . जो जे वांछील तो ते लाहो !!

घरातल्या कडक लक्ष्मीने शनी सारख्या कडक देवतेची उपासना करून त्याला प्रसन्न केले तर बिचार्या नवर्यांचे काय हाल होतील. बहुतेक या साठीच महिलांना मज्जाव केला असेल. बाकी घरातल्या कडक लक्ष्मीला घाबरून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हि समर्थन केल्याचे ऐकले आहे.

सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत.... >> उका, ह्ये वागनं बरं नव्हं! सगळ्यात वरच्या फांदीवर बसून बघत आहे! पॉपकॉर्नचा बुधला आहेच.

In reply to by पैसा

ओ पैतै... आम्ही केवढी मोठ्ठी उडी मारलेय की आखाड्यात... त्यावर कुणीच काय बोलेना... :(

उगा, ही चर्चा आधीच एका धाग्यावर झाल्याचे स्मरते. त्यामुळे धागा आला नसेल. तरी नव्या घडामोडींसकट नव्या चर्चा घडायला पुर्ण वाव आहे. शनिचौथर्‍यावर प्रवेशासाठी महिला सक्षमीकरणवाल्यांनी मोर्चा, आंदोलन करणे म्हणजे 'बॉम्बींग फॉर पीस' असा प्रकार आहे. असो. आम्ही पॉप्कॉर्नच्या प्रतिक्षेत आहोत. लार्ज टब यायला वेळ लागेल बहुतेक!

पुरुषांनाही चौथा-यावर जाऊन दर्शन घेता येत नै आता. लांबूनच पूजा-यांच्या हातात तेल द्यावं लागतं आणि दुरुनच दर्शन घ्यावं लागतं. मी खुप वर्षापूर्वी ट्रिप घेऊन गेलो होतो तेव्हा सर्रास चौथा-यावर जाऊन शनेश्वराचं दर्शन घेता येत होतं. एकदा पुरुषांना चौथा-यावर जाऊ द्या मग महिलांना दर्शनाला घेऊन जाऊ. (वाक्यात घोळ होतोय काहीतरी) शनीचा त्रास महिलांना जास्त होतो विशेषत: असो, असे म्हणतात. माझा काही शनीवर विश्वास नाही. पण मी रिस्क घेत नै. ;) गुलशनकुमार आणि अनुराधा पौड़वाल यांनी शिंगनापुरच्या या शनेश्वराचं महत्व वाढवलं. नसता तिथे अजिबात गर्दी नसायची. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर, शनीमाऊलीचा त्रास स्त्रियांना जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच हिंदु धर्मशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... शनीमाऊली फक्त व्यक्तीने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला इक्व्हीव्हॅलंट पीडा करून ते कर्म नलीफाय करतात... शनीमाऊली कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपले वाईट कर्म शून्य करणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा देणारा तोच... अगदी छप्पर फाडके देतात...

In reply to by माहितगार

मी मिसला होता तो धागा . खफवर बोललो होतो अगोदर याविषयी . जौद्या होउद्या डेडीकेटेड धाग्यावर चर्चा त्या धाग्यात अजून बरेच मुद्दे होतेना.

चेपु वर खालील माहिती बघण्यात आली... अभिजीत साधले नामक एक आर्किटेक्ट या देवळाच्या नुतनीकरणाच्या कामात आहे. त्यांनी दिलेली ही माहीती आहे. त्यापेक्षा जर काही वेगळी (उलट) माहिती इतरांना असेल तर ती अवश्य सांगावीत... Shani Shinganapur Shani Shinganapur 2 Shani Shinganapur 3

In reply to by विकास

विकास सर... प्लीज स्वलिखित माहिती द्यावी. विषय खूप काॅम्प्लिकेटेड आहे. यात काही लक्षात येईना...

In reply to by विजय पुरोहित

"जे नाही ते आहे, असे वाटणे म्हणजे माया" :) घटनेतले वास्तव वेगळे आहे का काय असे मी जे वर फोटो चिकटवलेत त्यावरून वाटते. कारण त्यात त्या देवळाच्या आर्कीटेक्टने दिलेल्या जाहीर माहितीनुसार अशी काही बंदी आता अस्तित्वातच नाही. मग या कोण ज्या बायका निदर्शने करत आहेत, त्या कशासाठी? हे कळत नाही. त्याच बरोबर, जर अजून मंदीर ट्रस्टने हेच जाहीरपणे सांगितले नसेल तसेच मुख्यमंत्री पण "कालानुसार प्रथा बदलायला हव्यात" अशा पद्धतीचे या संदर्भात विधान करत असतील तर त्याचे कारण काय? का ते देखील नुसत्याच पेपरातल्या बातम्या बघून ठरवत आहेत, हे समजत नाही... कुठल्याही प्रार्थना स्थळात सगळ्यांना प्रवेश असावा असे माझे मत आहे. हळू हळू तसे होत आहे पण हळू हळूच... याचे एक चांगले उदाहरण म्हणजे तिरूपती संस्थान आता दलीतांना पुजाअर्चा करण्याचे (पुजारी होण्याचे) शिक्षण देऊन त्यांना देखील सामावून घेत आहे. त्या उलट एक ऐकीव गोष्टः एक कुटूंब आपल्या लहान मुलीला घेऊन कुळाचारानुसार कोल्हापूरच्या आंबाबाईच्या पुजेसाठी घेऊन गेले. पण पुजार्‍यांनी मुलगी असल्याने तिच्या हातून का तिच्यासाठी म्हणून पुजा करण्यास (प्रथेनुसार) नकार दिला. हे आजच्या काळात देखील होत आहे... कधी काळी तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधींना पुरीच्या देवळात देवदर्शनाला जायचे होते. पण देवस्थानाने त्यांना प्रवेश नाकारला. कारण त्यांनी पारशी माणसाशी विवाह केला होता म्हणून! त्यांना तो शेवटपर्यंत मिळाला नाही. पण हे केवळ हिंदूंच्या विशिष्ठ देवस्थांपुरतेच मर्यादीत नाही. हजीअली संदर्भात गडबड चालू केली आहेच. मक्का-मदीनेस केवळ मुस्लीमच जाऊ शकतात. ख्रिश्चन लोकांच्या मॉर्मन पंथातील चर्चमधे केवळ मॉर्मनच जाऊ शकतात. (मला वाटते अगदी कोणी मॉर्मन झाले तरी तात्काळ सगळ्या चर्च/देवळात जाता येत नाही. परवानगी लागते आणि खात्री केल्यावरच मिळते). हे झाले देवळांचे... आता किंचीत वेगळे, ते म्हणजे मुंबईतल्या कुठल्यातरी आलिशान क्लब/हॉटेलमधे एकदा एम एफ हुसैन अनवाणी गेले होते. (वेष पण अर्थातच नेहमीसारखा साधाच असेल) तर त्यांना देखील परवानगी दिली नव्हती. परत पाठवले होते. असे अनेक ठिकाणी नियम असतात जेथे अमुक कपडे घातलेले नसले तर चालत नाही वगैरे... त्यामुळे हे आक्षेपार्ह असले तरी कळपसंस्कृतीचा भाग आहे. केवळ एका अथवा सर्व धर्मालाच जबाबदार ठरवून संपणार नाही. असो.

In reply to by विकास

विकास,
>> मग या कोण ज्या बायका निदर्शने करत आहेत, त्या कशासाठी? हे कळत नाही.
खाजवून खरूज काढणे ते हेच. हे कम्युनिस्टांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. लोकं गुण्यागोविंद्याने नांदलेली त्यांना बघवत नाहीत. कुठूनतरी कसलंतरी खुसपट काढून भांडणं लावल्याखेरीज त्यांना चैन पडंत नाही. तस्मात भूमाता ब्रिगेडीस शनीच्या चौथऱ्याकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा. (पोलिसांनी तसा तो केलेला आहेच). तसेच तृप्ती देसाई यांच्याकडे दुर्लक्ष करणे हितावह आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सहमत... समाजातील ईतर महत्वाच्या प्रश्नांचा विसर पडून या भुक्कडांना फक्त असल्याच गोष्टी महत्वाच्या वाटतात...

काही मूलभूत भाबडे प्रश्न, मशिदीत स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेड कधी आंदोलन करणार आहे? आजवर एकही स्त्री पोप झालेली नाही. भूमाता ब्रिगेड याबद्दल काय करत आहे?

In reply to by राँर्बट

आज हाजीअलीला महिलांना प्रवेश मिळावा यासाठी निदर्शने, आंदोलन झाले. बातम्या येत आहेत. कोण करत आहेत माहीत नाही.

In reply to by पैसा

पैसा जी तुम्ही सांगा फक्त तुमच्या साठी काय आणु ? आले लिंबु मिश्रीत नगरी उसाचा ताजा घुंगुरवाळा रस ? की मलई वाली लबाबदार लस्सी ? की मग गुणकारी नैसर्गिक निशापुर्व निरा की गार गार लिंबु शरबत ? नैत ते पाश्चात्य च हव असेल तर अंगठाअप पण आणतो पण तुम्ही अस स्फोटक संदर्भ वगैरे नका देऊ बर

In reply to by टवाळ कार्टा

मला बनवता येतो साहेब चहा उत्तम दार्जीलीग ची माकाइबारी चाय पत्ती आहे माझ्या कडे त्यासाठी पुण्यात का जायला हव ? अमृततुल्य नव्हे अमृत चा च आग्रह आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

वाचला लेख. आता ही बातमीदाराची चूक आहे की शंकराचार्यांचं निवेदन च असं आहे कोण जाणे पण धर्माचा अधिकार वेगळा अस्तो आणि तो परंपरा आणि मान्यतांवर चालतो हे म्हणताना , त्या मान्यता बदलायची वेळ आलीये हे त्यांनी मान्य करु नये किंवा अ‍ॅक्नॉलेज करु नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

In reply to by संदीप डांगे

अहो पण कंडिशनल मान्यता आहे ती. अशा अनेक मान्यता आहेत आपल्या धर्मात. पण सरसकट धार्मिक अधिकार हे मान्यतेने येतात हे विधान आहे त्यांचं. वडिलांना अग्नी द्यायची मान्यता मुलाला नाही तर जावयाला. मुंज मुलाची होते. अशा अनेक मान्यता आहेत च की. त्या सगळ्याच या "ब्लँकेट स्टेटमेंट " मध्ये आल्या च ना.

In reply to by स्रुजा

एक स्टॅण्ड अलोन स्टेटमेंट जनरलाइज पद्धतीने पाहिलं तर फुल्ली चूक आहे. धार्मिक मान्यता आहे च्या नावाखाली घटनादत्त अधिकारही संपुष्टात येऊ शकतील. म्हणजे हे शरीया टैप व्हायचं. बाकी पाळायचे कंपल्शन असलेल्या रितीत बळजबरी किंवा भेदभाव नकोच हे मी आधीच सांगितलंय ह्या धाग्यावर. म्हणजे मुंज करायची जबरदस्ती नको वा न करायचीही. हल्ली अग्नी देण्याची मान्यताही बदलत आहे. काही महिन्यांआधीच नाशिकच्या स्मशानभूमीत (मी स्वतः तिथे हजर होतो) एका कन्येने आपल्या पित्याला अग्नि दिला आणि जमलेले सर्व ते जणू काही वेगळं घडतंच नाही अशा पद्धतीने वागत होते. ये शादी नही हो सकती च्या धर्तीवर ये अग्नी नही दे सकती असा कोणी विरोध केला नाही. म्हणजे काही प्रथा आहेत ज्या बदलायच्या म्हटल्या तर चटकन बदलू शकतात. बरेच लोक 'लोक काय म्हणतील' ह्या रोगाने ग्रस्त असतात अन् कुणीच काही करत नाही. सगळ्याना वाटते प्रथा बदलावी कोणीच बदलत नाही. एक रामबाण उपायः जी प्रथा, परंपरा, मान्यता, रुढी पाळण्यावाचून गत्यंतर नसते तीला बदलल्यावाचून ठेवू नये. बाकी शनीचौथर्‍याबद्दल आपले मत क्लिअर आहे. तिकडे स्त्रियांनीच का पुरुषांनी सुद्धा जाऊ नये.

In reply to by संदीप डांगे

अहो आपल्याला (तुम्हा-आम्हाला) काय वाटतं हा मुद्दा नाहीये. शंकराचार्य हे खुप मोठं धर्मपीठ आहे. त्यांनी विधान करताना मान्यता या एकुणात अधिकृतरित्या बदलायला हव्यात हा सूर ठेवलेला नाही. ही मान्यता मुळात चुकीची आहे आणि बाकी धार्मिक अधिकार हे मान्यता आणि परंपरेने चालत आलेले असतात असा कुठेतरी "आहे ते, सकारण!" असा अध्याहृत सूर वाटला. आणि एक, विधान आहे , सरसकटीकरण नको हे अगदी मान्य म्हणुनच सुरुवातीला मी म्हणलं की हा बातमीदाराने काढलेला अर्थ आहे की खरोखर त्यांचं विधान हे माहिती नाही. त्यांचं विधान असेल असं जर गृहित धरलं तर पुरेसं नाही, एवढंच. हिंदु धर्म तसा ही बराच पुढारलेला आहे आणि इतर धर्मांसारखे प्रत्येकाची वैयक्तिक मान्यता ( आस्तिक, नास्तिक, कर्मकांडं मानणं न मा न णं रविवारी देवळात जाणं किंवा कोणत्या देवळात जाणं, वगैरे) काही ही असोत तो माणुस हिंदु असु शकतो. तुम्ही म्हणाता तशा घटना मी देखील पाहिल्या आहेत पण काही कट्टर लोकं याच धर्मपीठांचा किंवा चालत आलेल्या परंपरांचा आधार घेऊन हे कसं चूकीचं आहे असा नवीन बखेडा उभा करु शकतात. कालानुरुप अनेक गोष्टी बदलल्या आहेत पण अधिकृतरित्या केल्या गेलेल्या विधानांचं वजन वेगळं असतं , इतकंच.

In reply to by स्रुजा

शंकराचार्यांना अधिकृत वैगरे काही किंमत नाही हिंदू धर्माचरणात, ते उगाच आजकाल टीवी-पत्रकारांचा बुळबुळाट झाला म्हणून नाहीतर शंकराचार्य हे इतिहासाच्या पुस्तकात असतात एवढाच समज होता माझातरी. चार सामान्य लोकांना शंकराचार्य कोण किंवा हा शंकराचार्य कोणत्या पिठाचा ते सांगता यायचं नाही. ते पीठ म्हणजे गव्हाचं का बाजरीचं विचारतील. ;-) मुळात हे शंकराचार्य सर्वसामान्य हिंदू धर्माचे कोणी लागत नाहीत. त्यांचा संसारच वेगळा, सामान्य हिंदूंशी त्यांचा संबंध नाही. ते आखाडे, मठ वैगरे योगी-साधु-सन्याशांचे-अध्यात्मिकांचे हे धर्मगुरु, त्यांनी सांगितलेले नियम तिकडे पाळतात, ते नियम पाळण्याची पात्रता अंगी येण्यास खास संस्कार-विधि असतात. सामान्य संसारी हिंदूंचा ह्यांच्या मतांशी काही संबंध नाही. आपले संसारी हिंदू कृपाकटाक्षासाठी ह्यांचे पाय धरतात तेवढाच काय तो संबंध. सामान्य हिंदूंनी काय करावे करू नये हे सांगण्याचा कोणताही शास्त्रिय अधिकार ह्या शंकराचार्यांना नाही. हिंदूंनीही त्यांची मते घराबाहेरच ठेवावी. याचे उदाहरण म्हणुन तुम्हाला लक्षात येईल की काही साध्वि, महंत इत्यादी टिनपाटांची काही वक्तव्ये प्रचलित हिंदू मान्यतांपेक्षा वेगळी असतात, कारण हे नॉर्मल समाजात कधी नसतातच. त्यांच्या कोंडाळ्यात सदैव राजकारण राजकारण खेळत असतात. त्यांची सत्ता मठ व त्याच्याशी संलग्नित आखाडे यांच्यापुरतीच. हिंदूंच्या घर-संसारात, चाली-रीतीत, कर्मकांडांत काही लुडबुड करण्याचा, उपदेश करण्याचा लिगल, मॉरल, नॅचरल, रिलीजियस कुठलाच हक्क नाही. कुणाला काही गैरसमज असतील तर कृपया आजच दूर करावे. मुद्दा असा आहे की चाली-रीती, मान्यता ह्या काही धर्मगुरु ठरवत नाहीत हिंदूंमधे, ज्याला जसं वाटतं तसे वागतात, वागणार्‍यांची मेजॉरिटी वाढली की त्याचे नियम, मान्यता होतात. तो मोडणार्‍यांची मेजॉरिटी झाली की परत नियम बदलतात. हिंदूधर्माचं हेच खुप सॉल्लिड आवडतं मला. फक्त तेवढ्यासाठी अभिमान आहे. बाकी कट्टर लोकांना काय, जंगल पेटवायला काहीही पुरतं, लोक तसे सुज्ञ आहेत. पण आता अशा अडगळीतल्या धर्माचार्यांना पुढे आणून मुल्लामौलवी, पोप-बिपच्या जागी बसवण्याचे प्रकार होत असतील तर कठिण आहे. एक ते मक्का मदिना स्टाईल राममंदिर करायचं चाल्लंय उगाच. त्यात आणि हे. कहर आहे. आधीच खूप गोंधळ आहे भारतात, त्यात ह्या मिडीयावाल्यांनी 'भगवे कपडे घातलेला कोणी दिसला की उकळ काहीतरी त्याच्याकडून वादग्रस्त', असा स्वतःच्याच घराला आग लावण्याचा प्रकार चालवला आहे. शनि चौथर्‍याप्रकरणी फक्त शनि-भाविकांचे मत विचारात घेतले जावे. असल्या असंबंधित लोकांना महत्त्व देऊ नये. (कुंभमेळ्यानिमित्त ह्या आणि अशाच दुर्लक्षित विषयांवर लिहायचं होतं पण वेळ मिळू शकला नाही. बघुया कधी जमतंय ते, फार खोदकाम करायला लागतं.)

In reply to by संदीप डांगे

हे पहा, आपण त्यांना महत्त्व देण्याचा न देण्याचा मुद्दा नाहीये. आपली मतं पेपर मध्ये येतात का छापून? ज्यांची येतात त्यांनी हा विचार करुन मत व्यक्त करावं . बाकी सूज्ञ कशाला महत्व द्यायचं ते त्यांचं ते ठरवतात. पण म्हणुन शंकराचार्यांसारखं कुणी विधानं करताना त्यांच्यावर असलेलं (विधानकर्त्यावर) त्याचं उत्तरदायित्व टळतं असं नाही.

In reply to by स्रुजा

स्रुजाताई, माझे प्रतिसाद तुम्हाला व्यक्तिगत उद्देशून नाहीत, गैरसमज नसावा. सामान्यपणे वाचकांना ठावूक असावं म्हणून लिहलंय. पेपरात असली विधानं वाचणारे माझंही विधान वाचतील, विचार करतील, चार जागी अजून सांगतील. आपल्यालाही जे व्यासपीठ मिळालंय ते का सोडावं? ज्यांची मतं छापून येतात त्यांनी उत्तरदायित्वाचा विचार केला असता तर आणि काय पाहिजे होतं. मुख्य म्हणजे जे छापतात त्यांच्यावर हे उत्तरदायित्व असावं असं मला वाटतं. उद्या मिडिया कोणाही माकडाला उचलून विचारवंत, अधिकारी, तज्ञ, धर्मगुरू म्हणून छापेल (जे आज नाही करत असे नाहीच म्हणा) तर त्याचं उत्तरदायित्व त्या माकडावर येईल काय? खरं उत्तरदायित्व वाट्टेल तसा प्रसार करणार्‍यावर व त्यातून वाट्टेल तसा अर्थ काढणार्‍यावर असावे असे माझे मत आहे. कुठलीही न्युजएजंसी, वृत्तपत्र, वॄत्तवाहिनी आपण प्रसारित करत असलेल्या बातम्यांची जबाबदारी घेते. त्या बातम्यांद्वारे काही अफवा, कटुता, अनिष्ट समज, धार्मिक तेढ, तणाव पसरत असतील तर ती जबाबदारी पूर्णपणे त्या संस्थेची आहे. इथे या विशिष्ट केसमधे शंकराचार्यांच्या विधानाला तसा काही अर्थ नाही पण मीडियाने छापले म्हणून ते महत्त्वाचे झाले, अन्यथा तो तिकडे आपल्या शिष्यांसोबत सत्संगमधे काही-बाही बरळला तर आपल्याला काय कळतं? किंवा मागचेच त्याचे विधान की 'साई हा देव वैगरे नाही, लोकांनी त्याची पुजा, भक्ती करु नये.' बराच वाद झाला. साईभक्तांवर कणभर फरक पडला नाही. त्यामुळे तुम्ही जे उत्तरदायित्वाचं म्हणालात तेवढं सिरियस म्याटर नाहीये.

राबर्ट क्या हुआ ये भुमाता वाले मेरे पीछे पडे है एक काम करो भागो वही तो कर रहा हु लेकीन थक गया हु बॉस एक काम करो खो खो खेलो कैसे ? तुम उन्हे दुसरो के पीछे भगाओ और खुद बैठ जाओ खो यु मीन प्रो कब्बडी जैसा प्रो खो खो येस राबर्ट येस्स

चौथार्यावर महिलांना प्रवेश द्या अथवा न द्या माज्या बा च काय जातय! ;) गेलतर शिंगापुर वाल्याच जाई. -इति सूर्य पुत्र सनी..;)