user

हास्य

<एक पाहुणी पोरगी>

एक पाहुणी पोरगी
फॉर्म भरायला येते
आणि भलत्या अपेक्षेने
स्टुल कापसाचं होते

कसे न्याहाळती डोळे
कसे चिकटती हात
जणू अंधार राहतो
सौंदर्याच्या फुफाट्यात

ब्राउझरची खिडकी
उगा राईट क्लिकते
आणि पाहुण्या पोरीच्या
हाती स्पेलिंग चुकते

..सारा दिस कॅफेवर तरी भरे ना फारम
एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर..

संस्थळी प्रतिसाद देता

वदनी कवल घेता
नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म
जय जय रघुवीर समर्थ

च्या चालीवर -

संस्थळी प्रतिसाद देता
सौजन्य सांडूनच चाला
महाभारत होते सौजन्य सांडता फुकाचे
शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे
फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ

(बट डोईवरि बट झुलते तरि)

नुकतीच खरडवहीत डानरावांशी 'आधुनिक पुरुषांच्या केसांची निगा' या विषयावर चर्चा झडली. आपला केशसंभार कसा सांभाळावा, त्यासाठी कुठची उत्पादनं वापरावीत वगैरे खास पौरुषिण (स्त्रैण प्रमाणे) विषयांवर भाबडं हितगुज झालं. सध्याच्या पुरुषमनाची सुकुमार स्पंदनं त्यात प्रतीत झाली - कवितेला यापेक्षा अधिक राजस विषय तो कोणता मिळणार? मग आम्ही डॉनराव आपल्या केशकर्तन केंद्रात (जवळच्याच एखाद्या सायबर कॅफेमध्ये मेगाबायटी खरडी टाकून) गेले आहेत ही कल्पना केली. त्यांच्या न्हाव्याशी (कोणी केशकर्तनतज्ञ, तंतूकर्तनविशारद, स्टायलिस्ट, रचनाकार, किंवा नुसतंच कर्तक वगैरे म्हणेल...) जिव्हाळ्याच्या विषयावर होणाऱ्या चर्चेची झपूर्झा अवस्था पकडण्याचा हा क्षीण प्रयत्न. डॉनराव न्हाव्याला म्हणतात, अरे, माझ्या बटांना तसंच ठेव. त्यांना रंगवू नकोस - माझ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनेत रंगीत बटांना पुरेशी जागा नाही. जर कोणी अशा रंगलेल्या बटांचा फोटो काढला तर मी माझं तोंड आणि बट दोन्ही कुठे लपवू? आणि बट डोईजड होता कामा नये, शेवटी डोक्याने मी विचार करतो ना... बटांचा हव्यासही व त्यांना न रंगवण्याचा ध्यासही - ही खास पुरुषमनाची कुतरओढ चित्रित करणारी ही कविता. (घट डोईवर, घट कमरेवर या मूळ सुंदर कवितेला थोडी झुल्फं चढवून. [दुवा दिसत नसला तरी कवितेच्या नावावर क्लिक करा, तिथे तो आहे.])

बट डोईवरि बट झुलते तरि
सोडी बटांना, न्हावीलाला, न्हावीलाला रे

मुळी नको त्यां हायलायटी
नको चांदण्या ना रंगोटी
कसा पॅक् करू केसाला, न्हावीलाला रे

कुणितरी येईल फोटो काढिल
कलादालनी अवचित चढविल
कसा राखू मग लाजेला, न्हावीलाला रे

अभिव्यक्तीहून महान होते
बट तीमध्ये नाही बसते
हेच बरे वाटे मजला, न्हावीलाला रे

त्याने करतो विचार मी, बट*
डोईहुनही बट मम उत्कट
ठेव काहि मज शोभेला, न्हावीलाला रे

केले कर्तन, पुरे एवढे
घाव बटांवर दिले केवढे
दे राहू काही बटांना, न्हावीलाला रे

* इथे but या इंग्रजी शब्दाप्रमाणे, परंतु, पण या अर्थाने आलेला आहे. त्याच उच्चाराचा दुसरा इंग्रजी शब्द butt - नितंब, ढुंगण, पार्श्वभाग या अर्थाचा आहे. योग्य अर्थ वापरला जावा म्हणून ही तळटीप.

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

. गंगाधर मुटे
------------....--------------....--------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
------------....--------------....--------------

(प्रार्थना)

यशोधराचे 'प्रार्थना' हे अप्रतिम छंद्काव्य वाचून आम्हाला काही छंद आठवले नसते तरच नवल. सादर आहे ;)

ठेवतो अपेक्षा
मिळेल दर्शन
जिन्यात लपेन
आज तुझ्या..

एकाएकी तुझे
प्रकटती तात
कैसे बोलतात
अरे चोरा!...

फोकलाया पाठी
काठी बाभळीची
कन्यका तुमची
माझी ताई!...

अवकळा उरे
'सरली' जाणीव
उरली नेणीव
आवर रे...

छंदः परद्वार

चतुरंग

मी पहात होतो दूर...

तसा काव्याच्या प्रांतात मी नवशिक्याच.. जमेल तशी केलीय, चू.भू.दे.घे.

मी पहात होतो दूर,
तू दिलास मजला सूर,
लावलीस मला हुरहूर,
मी पहात होतो दूर..

मीच होतो मूढ,
की तूच होती शूर,
तू केलस मला चूर,
मी पहात होतो दूर..

तुझा होता वेगळाच नूर,
माझ्या भावनांना आला पूर,
तू छेडलास माझा सूर,
मी पहात होतो दूर..

तू आलीस जवळ पुरेपूर,
सांग माझा काय कसूर,
लावलीस मला हुरहूर,
मी पहात होतो दूर..

तू पलटविलास तूझा नूर,
केलस मला भेसूर,
मी पहात होतो दूर....
तू... तू ऊडुन गेलीस भूर्र्....

लावणी : आसं कसं वो तुमी मर्द गडी


आसं कसं वो तुमी मर्द गडी

{{{कानडाऊ योगेशु वदला तू
लावणी लिहायची फर्माईश केलीस तू

पाषाणाने लिहीली लावणी आनंदाने
वाचन करा आस्वाद घ्या तुम्ही सारे}}}


जमीन खोदताय निसती तुम्ही
जेसीबी यंत्र येईना धड कामी
खालचा वरचा गियर टाकीता
अ‍ॅक्शीलेटर दाबूनी बंद पाडता गाडी
पाव्हनं आसं कसं वो तुमी मर्द गडी ||धृ||

कोरस : डिझल भरलंय नव्ह टाकीत तुमी, हात लावून जरा हलवा
दाजी तुमी गाडी निट चालवा

दिवसाराती कामच काम, नाय दुसरं काही ठावं
जळ्ळं मेलं लक्षण तुमचं, धंदा करायचं नुसतं नावं
गाडी भाड्यानं कशाला लावता
धंद्याची गावंना तुम्हा नाडी
अहो आमदार, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||१||

लई दिसांची मैतरी आपली, वाढू लागली प्रित
डोक्यामदी गजरा माळूनी, साजरी करूया रात
टॅक्टर दामटायचा सोडून देवून
उगा म्हनं चालवू का बैलगाडी
अहो मिशीवाले, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||२||

गावरान आबं पिकल्याती, पेरू लागल्याती पाडाला
पाडायाची आठवन पडली, बहार जड झाला झाडाला
उगाच खुळ का काढीता
म्हनं तुझी माझी नाय जमायाची जोडी ||३||
टोपीवालं, आसं कसं वो तुमी मर्द गडी

येड्यावानी करताय सगळं, सरळ चालंना काही
सांगून सांगून थकले मी ग,काम्हून वाकड्यात शिरता बाई
पायात पाय आडकला तुमचा
कमरंचं धोतार रस्ता झाडी
अहो फ्येटेवालं, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||४||

कोरस : डिझल भरलंय नव्ह टाकीत तुमी, हात लावून जरा हलवा
दाजी तुमी गाडी निट चालवा

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०७/२०१०

(अवलिया रुप)

आमची प्रेरणा क्रान्तियांची सुरेख रचना अरूपाचे रूप आणि हरिकथेतील कीर्तनकुमार परा यांचे <अवलियाचे रूप>

"अवलिया" रूप। अवांतर खूप
पाध्ये देई चोप । वारंवार

कंटकांचेपाठी । रोजपडेकाठी
उभा पाध्येजेठी । चौपाटीत

मिपाचा कैवारी । साळसूद वरी
खर्डी व्यनी करी । संपादका

परात्पर गुरु । नाना कैवारु
सहजची उद्धरु । धागे काही

मायबाप, भ्राता । तूच सखा, त्राता
घे रे नीलकांता । सुदर्शन

केसुरंगा

<अवलियाचे रूप>

आमची प्रेरणा क्रान्तितैची सुरेख रचना 'अरूपाचे रूप'

"अवलिया" रूप। अवांतर खूप
पाहताही पाध्ये। धाव घेई

जंताचीयासाठी। या हाटेलाकाठी
उभा अवलिया। टणत्कारी

अवांत्राचा कैवारी। पर्‍याही फरारी
संकटात टाकी। केसु-रंगा

बाण तेथे देव। नांदतो सदैव
कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत

मायबाप, भ्राता। तूच सखा, त्राता
अनुष्काच्या कांता। दे दर्शन

विकांताची करमणूक .

फार फार दिवसांपूर्वी लिहीलेली ही विनोदी कविता आहे.

वाचा. हसा.विसरा. या क्याटेगरीतली.

जुने जालसंदर्भ शक्य तितके पुसून टाकले आहेत .

अजूनही काही सापडले तर ते हसण्यावारी न्यावेत ही विनंती.

अर्ज-ए-पेश है रफीक जुमाणीची प्रेमकविता.
*********************************************************************************************

मी हलवीत बसतो गल्ल्यामधली पाव-अधेली नाणी

कशी कळावी तुला प्रेमळे दिलकी आणिबाणी.

"हल्का कथ्था छोडबे कुत्ते" सांगू नको गर्जूणी

मी पिंक दिलाचा ग्यासूद्दीन तू खिडकीत्ली पदमीणी.

मी फुटका फानूस कविमनाचा तू माझी रोशणी

इकरार करू मी कसा प्यारचा थुंकून येतो गुळणी.

बचूभाईची कसम घालतो प्रेमी रफीक जुमाणी

मी पतलीगलीचा बादशहा तू डॅन्स बारची राणी.

Syndicate content
Scroll to Top