( काल रातीला सपान पडलं )
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत. ज्याप्रमाणे केशवसुतांनी "नवा शिपाई" या कवितेतुन नव्या पिढीचे मनोगत व्यक्त केले होते, त्याचप्रमाणे आम्ही या कवितेतून अशा सर्व नवकवींचे मनोगत व्यक्त करत आहोत
नवा कवी
नव्या कवितील नवकाव्याचा क्रूर कवी मी आहे
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे
गणहि नाही, छंदहि नाही, न मी जाणी वृत्ताला
ठेचे मीटर मी जे आडवती उगाच काव्याला
उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले
भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले
दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले
पारावरती विसावलो अन तिथेच चुकले
खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले
तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले
सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले
पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...
माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी.
केल्या रित्या बाटल्या
चकण्यांच्या ताटल्या
पडे बिअरचाच पाऊस
पण आता...
आता फक्त घास फुस
चापिल्या बोट्या
फोडिल्या नळ्या
ढेरी तुडुंब करी मन खुश
पण आता...
आता फक्त घास फुस
दिन ते गेले
वय ही झाले
झाली शरीराची नासधूस
अन आता ...
आता फक्त घास फुस
संदीप खरे व सलील कुलकर्णी यांची प्रथम माफी मागून सादर करतो आहे त्यांच्या "नसतेस घरी तू जेव्हा" चे विडंबन......
असतेस घरी तू जेव्हा
****************
असतेस घरी तू जेव्हां
जीव घाबरा घुबरा होतो
जगण्याची विरते आशा
संसार नकोसा होतो
असतेस घरी तू जेव्हां ...../1/
नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ग होतो
घराची तावदाने फुटती
अन भितींना कंपही सुटतो
असतेस घरी तू जेव्हां ...../2/
येतात मुले दाराशी,
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून भैय्या
मग कपड्यांवाचून जातो
असतेस घरी तू जेव्हां ...../3/
!!बालदीन !!
असूया वाटते बघुनीया माथी केशसंभार
कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे
लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून
मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून
किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज
मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन
छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची
नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची
शिलकीच्या तबल्यासम बालतळावर
स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू
अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू
उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू
-झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार )
२२ जून २०१७
पावसामुळे काय काय
तुझी झाली ओली अर्धी साडी
अन माझाही भिजला पुर्ण खांदा
एकाच छत्रीमुळे झाला वांधा
वरतून दणका जोरदार पावसाचा
साथीला गोल गोल टपोर्या गारा
भसकन शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा
आणीक खोल फसला माझा चिखलात पाय
धुमाकूळ घालून उलटे केले वार्याने छत्रीला
तू ही गेली दुर निघूनी हातामध्ये दांडा आला
प्रश्न:
अ) सुचनेनुसार उत्तरे लिहा.
१) पावसामुळे कुणावर परिणाम झाले? वाक्यात उत्तर लिहा.
२) पावसामुळे कसे परिणाम झाले? सचित्र उत्तर लिहा.
ब) रिकाम्या जागा भरा.
ह्याच्यातून त्याच्यात
त्याच्यातून ह्याच्यात
शब्दातून क्रीडेत
क्रीडेतून शब्दात
व्यासातून आसात
आसातून व्यासात
शब्दांच्या मनोय्रात
मनोय्रांच्या शब्दात
अर्थ नाही आशयात
आशय नाही अर्थात
रिकाम्या कुंथनात
कुंथनातून रिकाम्यात..
शब्दकृतींच्या प्र-हारात
भासं~कृतींच्या पूर्ण-विरामात! ;)
कवी- अपना
ती मला आवडते
जेव्हा लाडिकपणे
अंगाशी झोंबते
तेव्हा ती मला खूप आवडते
जेव्हा किरकोळ गोष्टीला
खट्याळपणे Oh My God म्हणते
तेव्हा ती मला खूप आवडते
माझ्या टोमण्यांवर
गुद्द्यांचा प्रसाद देते
तेव्हा ती मला खूप आवडते
मी टकाटक आवरून बाहेर जाताना
हूं... करून नाक मुरडते
तेव्हा ती मला खूप आवडते
जेव्हा माझा पचका होतो
तिला कशी जिरली एकाची
असा लहान मुलासारखा आनंद होतो
तेव्हा ती मला खूप आवडते
कधी कधी माझ्या रागवण्यावर
भोळा भाबडा चेहरा करते
तेव्हा ती मला खूप आवडते
नवकवितेच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक,
"गण-मात्रांचे कृत्रिम बंधन सत्वर तोडुनी टाक !"
यतिभंगाचे भूत लेखणीस कायम भिववित होते
त्या भीतीने तरल काहिसे हातून निसटत होते
गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको अता मळलेली
वाट पुन्हा ती छंद-बद्ध कवितांची कोंदटलेली
वृत्त-छंद-मात्रांचे अवजड ओझे लेवुनी बसली..
..होती माझी कविता, विमुक्त होता निर्मळ हसली
त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"