( काल रातीला सपान पडलं )

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
11 Dec 2017 - 9:44 am

हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )

गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये. परंतु कधी कधी विडंबन करण्याच्या उत्साहाच्या भरात विडंबक नकळत मूळ कवीच्या भावनेला ठेच पोहचवू शकतात. माझ्याकडून असा प्रमाद झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी जाहीरपणे सांगू इच्छितो कि या साऱ्या विडंबनांमागे कोणाचा अनादर करण्याचा, कोणाला कमी लेखण्याचा वा कोणताही वाईट उद्देश अजिबात नव्हता, नाही व इथून पुढेही नसेल. हे सर्व फक्त मनोरंजन या एका हेतूवरच आधारित आहे. तरी पण कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो. सगळे जण असेच लिहीत रहा व आपल्या प्रतिभेला आपापल्या परीने लेखणीतून व्यक्त करत रहा.

तर ।। गुरु महिमा ।। पुढे सुरु. या विडंबनामध्ये विडंबक आणि मूळ समोरासमोर उभे ठाकले आहेत. विडंबनासाठी आधार घेतलेले गाणे : काल रातीला सपान पडलं

   विडंबन

   मूळ गाणे

   काल रातीला सपान पडलं
   सपनात आले कवी न कवी नि लै धुतले

   अन जालावरती टीका बघुनी
   कवी म्हणाले का पिडले ?

   स्थिती झाली अशी, वेडीपिशी
   पडलो कवीच्या तोंडघशी मी

   कवितेचा कंटाळा, आला का बाळा
   थकून तू जाऊ नको
   रसिका तू ईश्वरी, न माझा वैरी
   प्रतिभा ठेचू नको
   अरे तू , प्रतिभा ठेचू नको, नको रे, प्रतिभा ठेचू नको

   धरला बोरू हाती तुम्ही
   अन मी ओरडलो पुरे करा
   कवी सपनामंदी
   भीत किती पण तुम्ही म्हणाला
   कोठा आजचा करू पुरा
   कवी सपनामंदी

   विडंबनाचा चा खेळ खेळता
   दर्जाघसरुनी मी लिहिले
   अन जालावरती टीका बघुनी
   कवी म्हणाले का पिडले ?

   स्थिती झाली अशी, वेडीपिशी
   पडलो कवीच्या तोंडघशी मी

   या कवितेचं पाखरू
   मी बघतोय धरू
   तरी मला घावंना

   ठेवतो तुझ्यावर भिशी
   कळ जरा सोशी
   लिहिल्याविन ऱ्हावंना

   चल कल्पनेत शिरू न
   कविता करू
   उगा टवाळी करू नको

   रसिका तू ईश्वरी, न माझा वैरी
   प्रतिभा ठेचू नको
   अरे तू , प्रतिभा ठेचू नको, नको रे, प्रतिभा ठेचू नको

   काल रातीला सपान पडलं
   सपनात आला तुमी न बाई मी बडबडले

   अन गालावरती खुणा बघुनी
   आई म्हणाली काय घडले ?

   आता सांगू कशी, बोलू कशी
   नाव कुणाचं घेऊ कशी मी

   तू माझी मंजुळा, गोड तुझा गळा
   दुरून तू पाहू नको
   रंगानं तू गोरी, गं दिसतेस पोरी,
   जवळ ये लाजू नको
   ये जवळ ये लाजू नको, ये जवळ ये लाजू नको

   धरला माझा हात तुम्ही
   अन मी ओरडले पुरे करा
   बाई सपनामंदी
   भीत किती पण तुम्ही म्हणाला
   डाव आजचा करू पुरा
   बाई सपनामंदी

   पाठशिवणीचा चा खेळ खेळता
   पाय घसरुनी मी पडले
   अन गालावरती खुणा बघुनी
   आई म्हणाली काय घडले ?

   आता सांगू कशी, बोलू कशी
   नाव कुणाचं घेऊ कशी मी

   तू भिरभिरतं पाखरू
   मी बघतोय धरू
   तरी मला घावंना

   झालो तुझ्यावर ख़ुशी
   तू माझी मिशी
   तुझ्याविन ऱ्हावंना

   चल गवतात शिरू न
   गंमत करू
   उगाच येळ तू घालू नको

   रंगानं तू गोरी, गं दिसतेस पोरी,
   जवळ ये लाजू नको
   ये जवळ ये लाजू नको, ये जवळ ये लाजू नको

vidambanअदभूतअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितावाङ्मयशेतीहास्यअद्भुतरसकलाकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदसाहित्यिकव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणमौजमजाचित्रपटरेखाटन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Dec 2017 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार

जमलय विडंबन,

काल रातीला सपान पडलं
सपनात आले कवी न कवी नि लै धुतले

मनी वसे ते स्वप्नी दिसे...

पैजारबुवा,

गबाळ्या's picture

11 Dec 2017 - 10:07 am | गबाळ्या

दस्तुरखुद्द पैजार बुवांची पाठीवर थाप! वाहवा! कौतुकाने आम्ही पावन झालो.

मनी वसे ते स्वप्नी दिसे...

अहो मला खरेच आपण जरा जास्तच खेचले असे वाटले.

babu b's picture

11 Dec 2017 - 11:15 pm | babu b

छान

गबाळ्या's picture

11 Dec 2017 - 11:22 pm | गबाळ्या

बाबू , आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.