संदीप खरे व सलील कुलकर्णी यांची प्रथम माफी मागून सादर करतो आहे त्यांच्या "नसतेस घरी तू जेव्हा" चे विडंबन......
असतेस घरी तू जेव्हा
****************
असतेस घरी तू जेव्हां
जीव घाबरा घुबरा होतो
जगण्याची विरते आशा
संसार नकोसा होतो
असतेस घरी तू जेव्हां ...../1/
नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ग होतो
घराची तावदाने फुटती
अन भितींना कंपही सुटतो
असतेस घरी तू जेव्हां ...../2/
येतात मुले दाराशी,
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून भैय्या
मग कपड्यांवाचून जातो
असतेस घरी तू जेव्हां ...../3/
तुज घाबरून घालविलेल्या
मज स्मरती लाखो वेळा
तव पैशांने घर हे चालते
म्हणूनच तुला ग झेलतो
असतेस घरी तू जेव्हां ...../4/
तू सांग बये मज काय
मी काय करू घरच्यांना
आईचा जीव उदास
बाबांनी अंथरूण धरले
असतेस घरी तू जेव्हां ...../5/
ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजूनी झालो
खर्चाचा सगळा हिशोब
मला तुला द्यावाच लागतो
असतेस घरी तू जेव्हां ...../6/
प्रतिक्रिया
15 Nov 2017 - 7:58 am | आनन्दा
समजले नाही
15 Nov 2017 - 11:28 am | OBAMA80
मधल्या 1-2 वर्षापासून आमच्या ऑईल आणि गॅस क्षेत्राला वाईट दिवस चालू आहेत. दुर्दैवाने यात काम करणार्या नॉर्वेतील माझ्या एका मित्राचा यात जॉब गेला. त्याच्या बायकोची नोकरी सुरू असल्यामुळे बिचार्यावर घरात बसून सगळी कामे करण्याची वेळ आली. तीच्या काही प्रमाणातील अरेरावीला त्याला मुकाट्याने सहन करावे लागत होते. ती जेव्हा जेव्हा ती घरी असे तेव्हा त्यांच्यातली भांडणे वाढत गेली. फोनवरून बोलताना त्याने मला त्याच्या या घरच्या गोष्टी रडत रडत सांगितल्या. तेव्हा त्याच्या त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करून ही कविता मी केली होती. सुदैवाने आता त्याला उत्तम नोकरी लागून त्यांचा संसार परत सुखाचा चालू आहे. तेव्हा काळजी नसावी.
15 Nov 2017 - 4:43 pm | सूड
त्याच्या पडत्या वेळी समजून घेतलं असतं तर त्याला सुखाचा संसार म्हणता येईल.