पावसामुळे काय काय

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
8 Oct 2017 - 11:20 pm

पावसामुळे काय काय

तुझी झाली ओली अर्धी साडी
अन माझाही भिजला पुर्ण खांदा
एकाच छत्रीमुळे झाला वांधा

वरतून दणका जोरदार पावसाचा
साथीला गोल गोल टपोर्या गारा
भसकन शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा

आणीक खोल फसला माझा चिखलात पाय
धुमाकूळ घालून उलटे केले वार्याने छत्रीला
तू ही गेली दुर निघूनी हातामध्ये दांडा आला

प्रश्न:
अ) सुचनेनुसार उत्तरे लिहा.

१) पावसामुळे कुणावर परिणाम झाले? वाक्यात उत्तर लिहा.
२) पावसामुळे कसे परिणाम झाले? सचित्र उत्तर लिहा.

ब) रिकाम्या जागा भरा.

१) तुझी झाली ओली अर्धी XX
२) माझाही भिजला पुर्ण XX
३) वरतून दणका जोरदार XXXX
४) XXXX शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा

क) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) वार्याने कुणाला उलटे केले?
२) कुणाचा खांदा पुर्ण भिजला?
३) कुणाचा दणका जोरदार होता?

- पाभे

हास्यकविताविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

9 Oct 2017 - 12:17 am | पाषाणभेद

पुरवणी प्रश्न
१)"तू ही गेली दुर निघूनी" हे उद्गार कुणाला उद्देशून आहेत? आणि का? सविस्तर उत्तर अपेक्षित.