तू अशी
मौन माझे तुला एवढे सांगते
तू किती बोलते तू किती बोलते
मैत्रिणी मैत्रिणी रोज जे बोलती
फोनची कंपनी त्यावरी चालते
वाजले चार रे, दे मला तू चहा
मी नव्हे, तू मला, रोज हे सांगते
उंट तंबू मधे, आणि उघडयात मी
या कपाटात तू, वल्कले कोंबते
सांगतो दुःख मी, अश्रू तू गाळते
ते न माझ्यावरी, तू टिव्ही पाहते
शस्त्र नाही करी, हार नाही तरी
येतसे लोचनी, चक्क ब्रम्हास्त्र ते
वाढले वय तसे, समज ही वाढली
रात्र समजून तू, दिवसभर झोपते
राग मानू नको, स्वप्न होते तुझे
दिवस संपेल हा, का तरी लोळते