(सध्या चालू असलेल्या भारत - ऑस्ट्रेलीया कसोटीतल्या ताज्या घडामोडीवर हा आमचा भोन्डला )
पात्र - वात्र परिचय
स्मीथा- स्टीव स्मीथ
ग्लेना- ग्लेन मॅक्सवेल
नाथा - नाथन लायन
रेन्शा - मॅट रेन्शा
केशभूषा - गणपत हज्जाम
वेशभूषा - भगवान कटपीस हाऊस
विशेष आभार : चप्पल गुरुजी
डी आर एस घे स्मिथा
घेऊ मी कशी ?
ह्या स्टॅन्ड चा त्या स्टॅन्ड्चा इशारा नाही आला
ठाऊक नाही मला
घेऊ मी कशी ?
उठ ग ग्लेना
उठू मी कशी ?
डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा चेन्डू अडविला
खान्दा निखळिला
उठू मी कशी
वळव ग नाथा
वळवू मी कशी
ह्या बाजूने त्या बाजूने चेन्डू वळविला
टर्न नाही झाला
वळवू मी कशी ?
थाम्ब ग रेनशा
थाम्बू मी कशी
ह्या गावचा त्या गावचा मासा नाही पचला
"कॉल" आला मला
थाम्बू मी कशी ?
प्रतिक्रिया
26 Mar 2017 - 6:40 pm | पैसा
=))