मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत. ज्याप्रमाणे केशवसुतांनी "नवा शिपाई" या कवितेतुन नव्या पिढीचे मनोगत व्यक्त केले होते, त्याचप्रमाणे आम्ही या कवितेतून अशा सर्व नवकवींचे मनोगत व्यक्त करत आहोत
नवा कवी
नव्या कवितील नवकाव्याचा क्रूर कवी मी आहे
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे
गणहि नाही, छंदहि नाही, न मी जाणी वृत्ताला
ठेचे मीटर मी जे आडवती उगाच काव्याला
मुर्दाड असे हि तुमची भूक
जिल्ब्यांचे जरी तुम्हा ना सुख
घालीत जाईन तरी रतीब
काव्यास माझ्या लाथा पडणे अगदी मला ना साहे !
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे
-- बेचवभूत
प्रतिक्रिया
6 Dec 2017 - 2:32 pm | टवाळ कार्टा
बेचवभूत =))