चारोळ्या - २
या चारोळ्या मी जवळपास साडे पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. यमकं बर्यापैकी जुळलेली असली तरी हे "र ला र आणि ट ला ट" जोडणं नव्हतं. बरंचसं उस्फुर्त.
११
कुठल्याही नात्याची खोली
प्रसंग आल्यावरच कळते
नेहमीची पायाखालची वाटही
कधी आडवाटेला वळते
१२
अस्वस्थता ही मनाची मी
सांगू कशी अन् कुणाला
असून गजबज भोवताली
आतून मात्र मी एकला