प्रेमाच्या वेळीवर सर्वच फुल फुलतात अस नाहि
जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात अस नाहि
प्रेमा सारख नात ज्याला सिमा नसतात, हे आपण जाणतो
पण प्रेमाच्या नात्याला सर्वच जाणतात अस नाहि
कुणी म्ह्टलय प्रेमाम्ध्ये हातावरील रेषानाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात
पण त्या वाटा बदले पर्यन्त... सर्वच थाबतात अस नाहि
प्रतिक्रिया
26 Apr 2013 - 10:35 pm | सूड
वेळीवर?...... नक्की?
26 Apr 2013 - 10:48 pm | दिपक वायळ
वेलीवर लिहायचे होते मला पण वेळीवर झाले समजुन घ्या
30 Apr 2013 - 10:12 pm | अविनाशकुलकर्णी
प्रेमाच्या वेळीवर संशयाची आळी.अळी मेळी गुप चिळी ..चिकन चिळी ..झाळी शिळी..
पुर्णाची पोळी..घालुका सायबा बंदुकिची गोळी..
30 Apr 2013 - 10:18 pm | चाणक्य
आवडला प्रतिसाद
30 Apr 2013 - 10:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
कदाचित अशी लिहील्यावर वाचनीय होईलः
प्रयत्न चांगला आहे.
पुलेशु.
30 Apr 2013 - 10:29 pm | संजय क्षीरसागर
नव कवींना प्रोत्साहन देणार्या एक सदस्यिय मंडळाचं संपादकत्व बहाल करण्यात येत आहे
30 Apr 2013 - 10:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ओ संक्षी, मी सुद्धा कधीकाळी नवकविच होतो.
असो.
पण मला हि रचना खरचं बरी वाटली, मांडणीत मार खातेय असे वाटले
तेवढे सुधारुन दिले, बस्स..
आता त्यातून हा मान देतच आहात तर सविनय मी हे संपादकत्व मान्य करतो. :)
30 Apr 2013 - 11:53 pm | अभ्या..
मिका तू नवकवि असताना कोण होतं असं संपादक? ;)
बाकी अभिनंदन ह्या पदाबद्दल. :)
3 May 2013 - 8:39 pm | दिपक वायळ
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार !
बदल सुचविल्याबद्दल विशेष धन्यवाद !
3 May 2013 - 9:02 pm | विसोबा खेचर
मूळ कविता आणि मिकाची कविता, दोन्हीही छान...