असा मी तसा मी--भाग-४
चार आण्याचा प्रसाद
देवाजीच्या दारात अन्
डोंगराएव्हढ्या कामना
भक्ताच्या मनात.
******************************
सगळ्यांच्याच जीवनाच एक
सामाईक धोरण
आयुष्याची दोन टोकं
जिवण आणि मरण.
******************************
साव कुनाला म्हणावं,
सगळेच हात बरबटलेले
साधु-संताचे मठही एथं
गुन्हेगारीत गुरफटलेले.
******************************
अशीच तु मला एकदा
उदास्-उदास दिसलीस
तेव्हा पासुन मला तु
माझ्यासारखीच भासलीस.