प्रेमाच्या दिवशी अर्थात (आंग्ल भाषेतील वेलेन्टाईन डे) कार्यालायातून सांयकाळी ५च्या सुमारास बाहेर पडलो, राजपथावर अक्षरश: प्रेमी जोडपे हातात हात घालून फिरत होते. या प्रकरणांचा अंत काय होईल, विचार करताना सुचलेल्या दोन क्षणिका
तिच्या साठी सर्व सोडले, पण तिने ....
गुलाबी काटा
ह्रदयी डसला.
जीव भौंऱ्याचा
नाहक गेला.
बहुतेक मुलींच्या नशिबी ....
रस पिउनी
भौंरा उडाला.
कळीच्या नशिबी
विरह वेदना.
प्रतिक्रिया
17 Feb 2015 - 6:32 pm | पैसा
असां काय नाय ओ! व्हॅलेंटाईन असा रस्त्यात साजरा करणारे सगळे पोट्टे पोट्ट्या बरे तयारीचे असतात! प्रेमात फसण्याचे, उसासे टाकण्याचे आणि विरहात गाणी बिणी म्हणायचे दिवस राजकपूर आणि देव आनंदच्या सिनेमांबरोबर गेले कधीच!
17 Feb 2015 - 7:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
17 Feb 2015 - 8:23 pm | सूड
सत्तरच्या दशकातल्या वाटल्या!!
17 Feb 2015 - 8:24 pm | सूड
तुम्हाला माहित असावं म्हणूनः भौंरा= मराठी भुंगा
18 Feb 2015 - 6:32 pm | वेल्लाभट
अवांतर
भौंरा LOL
संध्याकाळ नंतर सेंट्रल वर डाऊन लोकल मधे एक माणूस रोज भोवरे विकायला येतो खेळातले.
तेंव्हा तो हा शब्द भौंरा (नाकात) असा उच्चारतो. गम्मत वाटते.