क्षितिजाचे कुंपण
बालपण......
साखर झोपेच्या वळणावर
अंदोलत स्वप्न हिंदोळ्यावर
बांग कुणाची येता कानी
विरून गेली सारी कहाणी
तरूणपण......
विझल्या साऱ्या चांदणठिणग्या
बघा बघा ती पहाटफुटणी
छोट्या टीचभर खळगीसाठी
धरावी आता वाट ही कुठली
दगड मातीच्या रस्त्यामधूनी
दिसेल काही अमोघ अद्भूत
धावत होतो उर फुटोस्तर
हाती आले मृगजळ सुंदर
म्हातारपण......
झाली आता चांदणसंध्या
चक्क कळाले भ्रमनिरास होणे
ओलांडून क्षितिजाचे कुंपण
उरले फक्त मार्गस्थ होणे