सतारीचे बोल
जरा सोडला लगाम ढिला,
अंग प्रत्यंगाने संकेत दिला.
हळूहळू कुरकूर करू लागलं.
गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं.
हात पायाच्या झाल्या काड्या,
कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या.
कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता.
दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता.
कधी माझ्या भोवती जग फिरले,
तर कधी डोळ्यासमोर तारे विरले.
भर दुपारी जगाला भोवळ आली.
आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली.
काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले,
तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले.
हृदयाची सतार बिघडली होती
दिड दा दिड दा लय बेकाबू होती