कण अमृताचे......
आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही
भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही
पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही
उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही
करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही
कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही
झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही
अमृत कणांचे आता, विष मी बनवत नाही