माझेच दु:ख मोठे का?
इतरांचे दु:ख छोटे का?
हातातले गमावले सारे काही
त्यांनी तरी कमावले का?
पर्वतासम संकटे आली
हादरून मी गेलो, ते नाही का?
जे गेले ते माझे होते
इतरांचे काहीच नव्हते का?
मानले माझे माझे, केले माझे माझे
असेच असते इतरांचेही, नव्हे का?
प्रतिक्रिया
19 Sep 2021 - 2:05 pm | गॉडजिला
आता कसं व्हायच… हा खरा प्रश्न आपणास क्षणोक्षणी सतावत आहे… हे अॅक्सेप्ट केले तर गोष्टी खुप सोप्या होतील आपली मानसिकता आपल्या क्लेशाला कारणीभुत असते… बाह्य जग त्यातील घटना, व्यक्ती त्याला कारण वाटणे हा निव्वळ भास होय.