✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कळते जगत जाताना

च — चांदणे संदीप, Tue, 02/01/2022 - 17:40
युगायुगांचे असते एकटेपण लाखोंच्या सोबतीने जगताना खोल खोल भासते आयुष्य रितेपन भरून काढताना अनामिक नात्याची वीण दिसते कधी घट्ट बसताना नकळत मग तुटते काही तिथे मनापासून गुंफताना डोळ्यादेखत ढळते, ज्यात वेचले आयुष्य रचताना हे असे घडू नये वाटते नेमके तेच घडत असताना पतंग विसरतो दाहकता पिंगा घालून जळताना आयुष्यही असते असेच कळते जगत जाताना - संदीप चांदणे

प्रतिक्रिया द्या
3199 वाचन

💬 प्रतिसाद (6)

हमम्मम

तुषार काळभोर
Tue, 02/01/2022 - 18:05 नवीन
ओ- माय- गॉड कविता. :) असो, सक्तीच्या विश्रांतीचा नकारात्मक प्रभाव कवितेवर पण जाणवतोय.
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 02/01/2022 - 19:05 नवीन
आवडली ठणठणीत बरे झाल्याचा खणखणीत पुरावा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

+१

प्रशांत
Tue, 02/01/2022 - 19:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अनामिक नात्याची वीण

श्रीगणेशा
Tue, 02/01/2022 - 21:59 नवीन
अनामिक नात्याची वीण दिसते कधी घट्ट बसताना नकळत मग तुटते काही तिथे मनापासून गुंफताना
खूप छान! वाटतं असं कधी कधी, पण शब्दात मांडता येत नाही!
  • Log in or register to post comments

एकदम सुरेख रचना संदीपशेठ.

प्रचेतस
Wed, 02/02/2022 - 07:18 नवीन
एकदम सुरेख रचना संदीपशेठ.
  • Log in or register to post comments

कुणी कुणाचे नाही राजा...... सुरेख

कर्नलतपस्वी
Wed, 02/02/2022 - 09:31 नवीन
कुणी कुणासाठी थाबंत नाही कुणी कुणाच्या आयुष्याला पुरत नाही आस म्हणाल तर काही अर्थच उरत नाही असेल तोवर मस्त रहायचं नंतर फक्त आठवणींत जगायचं
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा