स्वप्ना, जागृती, सीमा
आल्या तिघीही घरी
कुणास घेवु कवेत
अन कुणास ठेऊ दुरी?
सीमेसोबत जरा लोळलो
कामज्वराच्या धगीं पोळलो
स्वप्ना, जागुस शेजेघेऊनी
षड्-मोहघटांसवे खेळलो
(स्वसंपादित)
(अतिशृंगारिक कडवी स्वसंपादित)
(स्वसंपादित)
आवेगाचे वेग अनावर
असे गळुनी पडताना
एकांमेकीं विरुनी जाऊ
द्वैत आपुले विस्मरताना
- शृंगार्_रात्रीं
प्रतिक्रिया
18 Dec 2021 - 8:59 pm | प्रसाद गोडबोले
आमची प्रेरणा : स्वप्न जागृतीची सीमा https://www.misalpav.com/node/49675
(प्रेरणा नंतर स्वतंत्रपणे भेटली ;) )
18 Dec 2021 - 10:34 pm | मुक्त विहारि
आवडले
20 Dec 2021 - 10:15 am | ज्ञानोबाचे पैजार
तिघिंच्या आठवणीने काळजात कळ गेली
ते स्वसंपादन काय असेल याचा साधारण अंदाज आला, तरी सुध्दा एक उत्सुकता म्हणून..... शक्य असेल तर व्यनि करा.
पैजारबुवा,
20 Dec 2021 - 5:01 pm | राघव
धन्य आहात!!
स्वसंपादनाची कल्पनाही भारी!! हा हा हा..
20 Dec 2021 - 6:44 pm | प्रचेतस
कहर
=))
20 Dec 2021 - 10:31 pm | अनन्त्_यात्री
साहित्यिकाने नापास केलेली दवणीय लेखनकामाठी आपल्या अतुलनीय स्वयंसंपादित नवनिर्मितीची प्रेरणा ठरू शकते याचे सानंद आश्चर्य वाटले.
20 Dec 2021 - 10:35 pm | प्रसाद गोडबोले
आपली खिलाडूवृत्ती पाहुन खुप छान वाटलं !
मनःपुर्वक धन्यवाद :)