इथे शहाळे म्हणजे संसार आशी कल्पना केलीयं. वरवर कठीण पण आतमधे मधुर गोड पाणी आणी मलाईदार साय पण त्या आगोदर नियतीच्या कोयत्याचे घाव सहन करावे लागतात.
माहीत नाही जमलीय का नाही😐
वाटले असावे कुणी जवळचे
वेचण्या कवडसे उन्हाचे
भेटावे कुणीतरी असे....
ऐकण्या हितगुज मनाचे
स्वप्न चांदण्या रात्रीतले
कधी न मी पाहीले
भेटावा चंद्र कोजागिरीचा....
असे कधीही मला न वाटले
अवसान उसने कधी
आणलेच नव्हते
तुझ्यासाठी मी
तारे तोडून आणीन...
चांदण्यांचा गजरा करून
तुझ्या केसांत माळीन...
असे कधीच म्हटंले नव्हते
तू ही घेतल्या नव्हत्या
कधी आणाभाका....
फक्त एवढंच म्हंटली होतीस,
नेहमीच उभी राहिन हात धरुन मी तुझा...
मी तुझी सावित्री,तु सत्यवान माझा ,
असेही तू कधी म्हटंले नव्हते
किती सोसल्या त्या कळा...
किती पाहीले ते सोहळे
भोगले किती क्षण अमृताचे....
किती गोठले उमाळे
मिळवण्या थेंब अमृताचे
तुझ्यासवे.....
आजवर जपले हे शहाळे.
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 11:45 am | प्राची अश्विनी
:)
शहाळं गोड आहे की .
5 Nov 2022 - 11:57 am | मुक्त विहारि
छान आहे
7 Nov 2022 - 9:54 am | कर्नलतपस्वी
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
29 Dec 2022 - 8:45 am | कुमार१
छान आहे
29 Dec 2022 - 11:17 am | चित्रगुप्त
कविता तर आवडलीच, आणि सुरुवातीलाच थोडेसे स्पष्टीकरण दिलेत, ते तर लईच ब्येष्ट. नाहीतर आमच्यासारख्या ठोंब्याला हे शहाळे कुठून उपटले बुवा ? असा प्रश्न पडला असता.
29 Dec 2022 - 1:03 pm | श्वेता२४
चांगलं गोड व मलईदार आहे की!