भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;)....
आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:
आयुष्यात पुढे पुढे जावे
सकारात्मक,नकारात्मक
दोन्ही बाजु पेलून असावे
..............................डीएने च्या ५’ टू ३’ सिन्थेसिस सारखे
नवीन साथ-मैत्री जोडीत निघावे
यशाची शिडी वाटेत वळणे घेईल
गुंतुनि घट्ट एकमेकांत रहावे
........................डीएने च्या ड्बल हेलिक्स ३० ऍगस्ट्न सारखे
जगात चुकत चुकत शिकावे
त्या दुरूस्त करून सुधाराव्या
कार्यरत हाताने नशीब घडवावे
..........................डीएने च्या पाम आणि फ़िंगर मॉडेल सारखे
मागील बंधातूनि हळू हळू निसटावे
जुन्या आठवणीसह नव्यात नाते गुंफ़ावे
धागे प्रेमाचे सांभाळित जगावे
.................डीएने च्या सेमी कॉन्सरवॅटिव्ह रेप्लिकॅशन सारखे
काम झट पट करावे
प्रत्येक क्षण झपाटून लढ्णॆ
स्वप्नपूर्तीसाठी रडावे हसावे
....................डीएने च्या पॉलीमरेझ ३ प्रोसेसिटिव्हिटी सारखे
आयुष्याचा प्रेमात पडावे
ध्यास सुंदरतेचा मनास जडावा
सोनेरी पानांत स्व:ताचे नाव कोरावे
..............डीएने मॉडेल मांडणा~या वॅट्सन आणि क्रिक सारखे
-भक्त्ती
प्रतिक्रिया
22 Feb 2023 - 12:30 pm | आंद्रे वडापाव
डीएनए वर बोलू काही ... नावाचा कार्यक्रम पण होऊ शकतो ... (हळू घ्या .. )
दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी ... नावाची कविताही घेऊ शकता ...
22 Feb 2023 - 3:07 pm | Bhakti
सांगायची आहे दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी तुला..ना ना ना...ना ना ना ;)
कार्यक्रम जेव्हा कविता २००८ ला लिहिली तेव्हाच सुरू करायला पाहिजे होते,
आता गाडी सुटली ,रुमाल हलले
क्षणात डोळे टचकन ओले..
:)
4 May 2023 - 8:53 am | कुमार१
छान !
4 May 2023 - 9:11 am | विवेकपटाईत
मस्त
4 May 2023 - 10:33 am | Bhakti
:) धन्यवाद मंडळी!