प्रिय,
तु विचारत होतास, कि corporate life कशी आहे.
मुळात नाटकात आणि यात जास्त काही फरक नाही.
फरक फक्त इतकाच, कि नाटकात तु होतास आणि इथे manager आहे.
नाटकाचे प्रयोग असायचे, इथे projects असतात.
इथे ही उशिर झाला कि बोलणी बसतात, बर का...
उलट ११ चे १२ झाले कि तु फार शिव्या घालायचास...
इथ मात्र manager फक्त "Good Morning" असा टोमणा मारतो.
इथली लोक यास sarcasm म्हणतात...
इथे हि नाटकाप्रमाणे night shifts असतात...
फरक फक्त इतकाच, नाटकात सोबती ला चहा असायची इथ मात्र coffee असते.
पण इथे night shift ला झोप येते रे...
कदाचीत इथल्या coffee त अापल्या चहा सारखी किक् नाही...
इथे ही project यशस्वी झाल्यावर लोक उबदार हातांनी अभिनंदन करतात.
अगदी अापल्या नाटकाच्या यशस्वी प्रयोगाप्रमाणेच...
फरक फक्त इतकाच, प्रयोगानंतर अभिनंदन करणार्या हातांना आलेली उब ही टाळ्यांमुळे असायची...
पण, इथ मात्र कोणी टाळ्या ही वाजवत नाही, पुर्ण दिवस AC मधे असतात...
तरीमात्र त्यांचे हात उबदार कसे असतात कोण जाणे?
असो...
माझ सर्व सुरळीत सुरू आहे...
तुझ पुढील नाटक कधी आहे कळव...
जमल तर Weekend ला ठेव, मलापण येता येईल.
अगदी पहिल्या रांगेत तिकीट काढुन पाहिल, आता ते तिकीट परवडत मला...
तुझा,
प. शी.