रंगल्या रात्री अश्या
गोलघुमट टक्कल जश्या
तो विजेचा खांब
तरर्राट उभा असा
या सडकेच्या तोंडावरती
देऊन टाक भसाभसा
दुरून पहा ते कुत्रे
सांडांच्या खांद्यावरचे
लावलाय लळा तु त्यास
आज असा कसा?
बुंगाट ढेकर देऊन
ऊठ त्या पानावरुन
घेऊन जा घागरी
अनं हलव तो हापसा
आम्ही सुर्याची लेकरे
कोवळ्या ऊन्हात निपजितो
अन घेऊन या घागरी
आज सकाळीच हापसितो
दे दे मला तो बंजरखंड
मशेरी त्यावर मी भाजितो
आज सकाळी टकलावर
हात मी फिरवितो
प्रतिक्रिया
13 Sep 2015 - 10:18 pm | मांत्रिक
बापरे! कविता काहिच्च कळली नाही! तरीपण आवडली!!! काय भयानक चित्रसृष्टी निर्माण केलीय लेखकाने!!! बाबौ!!!
सलाम त्याबद्दल!!! आवडलं लिखाण!!!
13 Sep 2015 - 10:23 pm | एस
काय शरदिनीतै आल्या का अंगात की मास्तरांनी डुआयडी घेतलाय परत? :-)
13 Sep 2015 - 10:26 pm | मांत्रिक
भौ! कृपया अमूर्त चित्रसृष्टीकडे लक्ष द्यावे. जे पकडायचा प्रयत्न करून देखील सापडत नाही असे काहीतरी आहे.
त्या अमूर्ताचा शोध हाच कवितेचा प्लस पाॅईंट आहे.
13 Sep 2015 - 11:41 pm | चांदणे संदीप
कळाली... मला कविता कळाली...
अस वाटायच्या आतच लांब पळाली!
(विको वज्रदंती लावल्यावर कळेल काय? :-/)
17 Sep 2015 - 5:59 pm | भैड्या
या भक्क्कळ कमेंटा वाचुन आमाला भरतं आलेलं हाये.
डोळ्यातील चार टिपुस धाग्यावर शिंपडुन वरच्यांच्या आभारप्रदर्शनाचा ठराव पास खरतो.
असावा लोभ
भैडु.
18 Sep 2015 - 3:34 pm | नाव आडनाव
कायंच कळलं नाय, पण मस्तं.
भक्क्कळ - व्वा. सरकार नवा शब्द दिला तुम्ही माय मराठीला.
पण, तो "क्क्क" कसा वाचायचा आणि उच्चारायचा ?
18 Sep 2015 - 7:54 pm | भैड्या
आधी चुळ भरा बघू.. मग घसा घराघरा खाक्रा.
आता वर बघा (तिकडे नैवो).. परत खाली बघा.
जोर लावुन वरडा " हे क्क्काय आहे?????"
बघा जमलं की नाही.
18 Sep 2015 - 3:11 pm | मदनबाण
काय झेपलं नाय बाँ आपल्याला...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani
18 Sep 2015 - 7:58 pm | भैड्या
उलीउलीकसं उचला की मग.. (नसता सगळा सान्डालवन्डा!)
18 Sep 2015 - 7:50 pm | विवेकपटाईत
कविता आवडली. टकल्यावर चंद्रमा चमकल्या सारखे वाटले. पांढरे केसं असती तर सूर्य चमकला असता.
18 Sep 2015 - 7:55 pm | फुलथ्रॉटल जिनियस
भैड्याजी, निराकार गाढाव क्वोण वो तुम्चं
18 Sep 2015 - 8:05 pm | भैड्या
भैड्याजी?????
चरणकमळ करा हीकडे ( खेटरं बाजुला)..
आपलाच
(अडला हरी) भैडु
18 Sep 2015 - 8:47 pm | अत्रुप्त आत्मा
18 Sep 2015 - 9:01 pm | भैड्या
महा-तम्यांचे चरण दोऱ्याला लागले अणिक जीव खालसा झाला. _/\_
18 Sep 2015 - 10:26 pm | अत्रुप्त आत्मा
ओळखलं मी तुला....
पां डुब्बा Ssssss. :-/