हवाबाणहरडेचघळ

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 3:21 pm

पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्‍या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.

घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,

सोडत होता गुपचुप तो, हळूच् उनाड वारा,
श्वास रोखून् धरत होता, उभा आसमंत सारा,
उनाड वार्‍या बरोबर, त्याने करार एक केला,
न चुकता खायला देणार, पादेलोण त्याला,
पाच दहा मिनिटा मधे मोकळा होउन आला,

राकट त्याच्या हातात होता, मोठा एक डब्बा
मोठी थोरली ढेरी दाखवत, चालला होता ढब्बा,
हाता मधल्या डब्ब्याशी त्याने, एक करार आहे केला,
लपवून थोडा धोतरा आड, नेणार आहे त्याला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,

येई मातीसही शिसरी, पाऊल त्याचे थबकता,
जशी भरधाव स्कॉर्पिओतून् , गुटक्याची पिंक उडता,
(आठवा गर्दीमधे वायुवेगाने पांडरी कॉर्पिओ चालवताना काळी काच खाली करुन जोरदार उडवलेले कारंजे)
मातीशीही त्याने असा, एक करार आहे केला,
खड्डा करुनच डाउनलोड करणार, पुण्यसंचिताला,
(सतिश सर मी माझा शब्द पाळाला आहे)
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,

पोटात जोरात कळ येता, डोळा अलवार आले पाणी,
मोठे त्याचे Xगण, आणि चुळुकभर पाणी,
त्या चुळुकभर पाण्याशी, त्याने एक करार आहे केला,
झटकणार नाही हात आता, पंचा वापरणार पुसायला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,

घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,

घालपाणी

आरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीप्रवासवर्णनप्रेम कविताभूछत्रीमुक्त कवितापाकक्रियाविडंबनऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

सतीश कुडतरकर's picture

23 Dec 2015 - 3:44 pm | सतीश कुडतरकर

हातात चहाचा कप आहे, आता चहा प्यावी कि नाही याचा विचार करतोय. :-)

अभ्या..'s picture

23 Dec 2015 - 4:46 pm | अभ्या..

माऊली माऊली.
धन्य आहात तुम्ही.

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 4:51 pm | प्रचेतस

क्या बात है पैजारबुवा.
आमचे एक मित्र अशी एकाहून एक सरस काव्ये पूर्वी करायचे. हल्ली मात्र करत नाहीत.

चार भिंतीतल्या काव्यांना माळरानावर आणण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे.

अभ्या..'s picture

23 Dec 2015 - 5:03 pm | अभ्या..

पण आपल्या मित्राचा निबंध मानला तर हा प्रबंध आहे.
किती विस्तृत वर्णन आहे ते तरी पाहा. व्हारायटी तरी बघा मालक.

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 5:19 pm | प्रचेतस

ते बाकी खरेच.
पण आपले मित्रही काही कमी नाहित.
किमान शब्दांत कमाल आशय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Dec 2015 - 5:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

वल्ली सर उगाच आम्हाला हरबर्‍याच्या झाडावर चढवु नका...... ते कुठे आम्ही कुठे.......
तुमच्या मित्राच्या जवळपासही आम्ही जाऊ शकता नाही हे नम्र पणे आम्ही नमुद करू इच्छितो.
तुमच्या परममित्राच्या प्रतिभेचा पंखा

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 5:20 pm | प्रचेतस

हा आपला विनय आहे पैजारबुवा.

नाखु's picture

23 Dec 2015 - 5:30 pm | नाखु

आणी आपला विनय शील पणा आवडला !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2015 - 6:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या मित्राच्या जवळपासही आम्ही जाऊ शकता नाही

असली कामे फार जवळपास जावून करायचीही नसतात ;)

रातराणी's picture

23 Dec 2015 - 6:56 pm | रातराणी

खी खी खी !
हाय फाइव..
राहू दया म्हणता.
राहू दया तर राहू दया.
;)

अभ्या..'s picture

23 Dec 2015 - 6:59 pm | अभ्या..

तसे कसे, तसे कसे.
आम्ही तांब्याला तांब्या (की अजून कशाला काई) लावून बसलोय अशीच व्याख्या करतो ब्वा मैत्रीची.

बाबा योगिराज's picture

23 Dec 2015 - 5:00 pm | बाबा योगिराज

____/\____

कवितेच्या शेवटी ""घालपाणी
काव्यरस:
आरोग्यदायी पाककृती
कॉकटेल रेसिपी
कोडाईकनाल
गरम पाण्याचे कुंड
जिलबी
प्रवासवर्णन
प्रेम कविता
भूछत्री
मुक्त कविता
लेखनविषय::
पाकक्रियाविडंबनऔषधोपचारकृष्णमुर्ती" दिलं आहे त्यातही पेरणाचपेरणा कित्ती त्या पेरणा?

सुमीत भातखंडे's picture

23 Dec 2015 - 6:31 pm | सुमीत भातखंडे

.

रातराणी's picture

23 Dec 2015 - 6:37 pm | रातराणी

पैजारबुवा तांब्या संस्थान बळकावताय काय?!?
अशी भावस्पर्शी कविता वाचली नव्हती बरेच दिवसात.
आई ग्ग्ग !
थांबा जरा मोकळा होऊन येतो
.
.
.
.
.
.
.
.
.
( अजून वाचताय व्हय? काय राव तुम्ही?)

पैसा's picture

25 Dec 2015 - 12:20 pm | पैसा

आलास काय रे?

नाव आडनाव's picture

25 Dec 2015 - 2:53 pm | नाव आडनाव

:)
रातराजा ??? :)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Dec 2015 - 4:56 pm | अत्रुप्त आत्मा

दोन दोन दू ...आपलं ते हे.. डू आय.डी!? ;)
मज्जा आहे बाबा... =))

मार्कस ऑरेलियस's picture

23 Dec 2015 - 6:39 pm | मार्कस ऑरेलियस

अगलतगल कवितेचे अगलतगल विडंबन =))))

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2015 - 6:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

आंघोळपांघोळवर एक येऊ दया आता.

एक एकटा एकटाच's picture

23 Dec 2015 - 7:32 pm | एक एकटा एकटाच

गडाबडा लोळींग

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2015 - 7:44 pm | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-060.gif

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 7:55 pm | प्रचेतस

=))

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2015 - 8:41 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw007.gif

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 8:47 pm | प्रचेतस

=)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2015 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil12.gif

http://freesmileyface.net/smiley/battle/sword.gif