प्रकाशचित्रण
हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..
हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले की
स्मृतीतला गाव दिसू लागतो
त्या गाव वेशी उभा मीच मजला
पाहून अनोळखी हसू लागतो
दशकान्तुनी उभ्या तिथल्या विक्राळ वटाच्या
सावलीत जरासा बसू पाहतो
स्मरणे ती जुनी अन बदलांच्या खुणा
उद्विग्न नास्तिकासम तपासू पाहतो.
पोपटी तृणांचा जुन्हा तो जिव्हाळा
बदलाच्या भ्रांती फसू लागतो
लोभस ते जग कधीचे संपले खरा
भावनांचा उन्हाळा पुन्हा दिसू लागतो..
प्रसन्न सकाळ
सकाळ होती वाचत होतो
पेपर, हातामध्ये चहाचा कप
ग्यालरी माझी चार फुटाची
माती भरल्या मडक्यांचे जग
एका मडक्यात होती तुळस
रांगोळीला केलेला आळस
गतलग्नाच्या बांगड्याही तशाच
नुकतीच आलेली न्हाउनी उन्हात
दुसर्या मधील अबोली तर खास
खेळवीत होती ओल्या दवास
थोडीशी गच्ची बाहेर झुकून
रोखवीत होती अगणित श्वास
हाय एक होते कोरफड तशात
ना रूप सुगंध गणनाही कशात
घेतसे कधिमधी आजारी असता
औषध म्हणून केवळ लावावयास
गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा
कलत्या उन्हात, कोण अंगणात?
तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण आकाशात?
फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण झाडात?
झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण घरात?
चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण उरात?
एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण गॅलरीत?
असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!
<पतंग>
प्राथमिक प्रेरणा - तवंग
दुय्यम प्रेरणा -
माझा पतंग
सतत हरवतो
तुझ्या अभाळी
.
.
पेच लावती
ढगाढगात ढाले
ढालगजांचे
.
.
ढील देत मी
फिरकी झपझप
मांजा वाहतो
.
.
मांजा कातर
पडतो सैलसर
केएलपीडी
.
.
झाडा तारांत
पतंग ढिगभर
लटकलेले
.
.
नवा पतंग
उडेल लवकर
नव्या अभाळी