कलत्या उन्हात, कोण अंगणात?
तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण आकाशात?
फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण झाडात?
झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण घरात?
चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण उरात?
एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण गॅलरीत?
असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!
प्रतिक्रिया
4 Dec 2015 - 1:06 pm | पालीचा खंडोबा १
छान
4 Dec 2015 - 6:13 pm | चांदणे संदीप
आवडली कविता!
4 Dec 2015 - 6:24 pm | निनाव
छान कविता.
5 Dec 2015 - 4:58 pm | मित्रहो
आवडली
5 Dec 2015 - 5:15 pm | बिन्नी
खुप छान कविता.
5 Dec 2015 - 10:09 pm | एक एकटा एकटाच
कलत्या उन्हात, कोण घरात?
चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही!
हे मस्तच
11 Dec 2015 - 11:10 am | एस
तरल आणि मनस्वी लिहिता आपण.
11 Dec 2015 - 11:28 am | मितान
तरल ! असंच म्हणते !
11 Dec 2015 - 7:48 pm | जातवेद
खूपच छान!
11 Dec 2015 - 8:19 pm | पैसा
कविता आवडली!
11 Dec 2015 - 10:32 pm | मोगा
शाळेच्या पुस्तकात पद्मा गोळे नामक कवयित्रिची कविता होती. ती आठवली.
छान आहे.
11 Dec 2015 - 10:56 pm | म्हसोबा
अतिशय सुंदर कविता आहे. खुप खुप आवडली.
12 Dec 2015 - 1:52 am | नूतन सावंत
सुरेख आहे कविता.
12 Dec 2015 - 7:17 am | सौन्दर्य
मस्त लिहिली आहे.
12 Dec 2015 - 10:56 am | अजया
जवळची वाटली! आवडली कविता.
12 Dec 2015 - 11:11 pm | प्रीत-मोहर
खूपच छान लिहिताय. :)
13 Dec 2015 - 4:05 pm | चाणक्य
मस्त