मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतले आपण, आपले आपले.
गुलाब काढा, मोगरा लावा
मोगरा काढा, मरवा लावा,
मरवा काढा, सुगंध ठेवा
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतला सुगंध आपला आपला.
खुर्ची काढा, झोपाळा लावा,
झोपाळा काढा, चटई टाका,
चटई काढा, मोकळीच ठेवा
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतली स्पेस आपली आपली.
काचा काढा, गज लावा
गज काढा, पडदे लावा,
पडदे काढा, उघडीच ठेवा
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतला प्रकाश आपला आपला.
असणे नको, नसणे नको,
आता कुठला ध्यास नको,
कुठे फुलला, कुठे अडकला,
असला मिळमिळ श्वास नको,
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतला श्वास आपला आपला.
प्रतिक्रिया
27 Dec 2015 - 8:24 pm | प्राची अश्विनी
खूप छान! आवडली.
27 Dec 2015 - 8:49 pm | एक एकटा एकटाच
गेलरी मस्त आहे.....
प्रत्येक कविता आपापल वेगळेपण जपते आणि दरवेळेस नवीन अनुभूती देऊन जाते
28 Dec 2015 - 7:49 pm | विश्वव्यापी
कविता आवडली.
मग वाटले, हल्ली ( मुंबईत)
घरांना गॅलरी का नसते?