गॅलरीतला पालापाचोळा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
17 May 2015 - 7:45 am

या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?

कष्टाने खुरमुडले हात यांचे,
पाठीवरती मऊच कसे होतात?
कानाखाली लगावल्या कधी दोन,
आज त्यांचे गालगुच्चे कसे होतात?
या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?

देव सारे पाण्यात बुडले,
तरी यांच्या श्रद्धा, गाथेसारख्या
कशा बरे तरतात?
बाग सारी उजाड झाली,
तरी नातीसाठी दोन फुले
कुठून बरे आणतात?
या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?

मुलेबाळेलेकीसुना सगळे परके झाले,
तरी यांच्या गार पडवीत इतके झोपाळे
कसे बरे झुलतात?
घरदारगावदेश सगळे कसे मागे पडले,
तरी यांच्याच एका गॅलरीसाठी
पावले कशी माघारी वळतात?
या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?

भावकविताकविता

प्रतिक्रिया

रुपी's picture

19 May 2015 - 3:44 am | रुपी

छान .. भावपूर्ण!

झंम्प्या's picture

19 May 2015 - 8:55 am | झंम्प्या

"देव सारे पाण्यात बुडले,
तरी यांच्या श्रद्धा, गाथेसारख्या
कशा बरे तरतात?"

भारी जमलंय