प्राथमिक प्रेरणा - तवंग
दुय्यम प्रेरणा - <लवंग>
माझा पतंग
सतत हरवतो
तुझ्या अभाळी
.
.
पेच लावती
ढगाढगात ढाले
ढालगजांचे
.
.
ढील देत मी
फिरकी झपझप
मांजा वाहतो
.
.
मांजा कातर
पडतो सैलसर
केएलपीडी
.
.
झाडा तारांत
पतंग ढिगभर
लटकलेले
.
.
नवा पतंग
उडेल लवकर
नव्या अभाळी
प्रतिक्रिया
15 Oct 2014 - 6:30 pm | सूड
>>मांजा कातर
पडतो सैलसर
केएलपीडी
__/\__
15 Oct 2014 - 6:56 pm | जेपी
काव्यरस प्रकार वाचुनच झीट आली.
15 Oct 2014 - 7:59 pm | एस
काव्यरस टपाटपा गळतोय. काय कविता आहे! वाचली पण नाही नीट. :-P
15 Oct 2014 - 8:02 pm | प्रभाकर पेठकर
'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... नवी ओळख सखेद स्विकारावी लागत आहे.
16 Oct 2014 - 2:44 am | राजेश घासकडवी
नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत.
कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा...
'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.
16 Oct 2014 - 2:47 am | प्यारे१
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे.
बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/
16 Oct 2014 - 11:58 am | प्रभाकर पेठकर
खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.
16 Oct 2014 - 9:31 am | अनुप ढेरे
http://www.misalpav.com/node/12871
http://www.misalpav.com/node/12872
http://www.misalpav.com/node/12873
16 Oct 2014 - 11:40 am | प्रभाकर पेठकर
पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे.
कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.
16 Oct 2014 - 12:25 pm | मदनबाण
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये.
काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup
इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
16 Oct 2014 - 12:42 pm | यशोधरा
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका.
बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.
16 Oct 2014 - 11:16 pm | राजेश घासकडवी
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!'
मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं.
तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.
16 Oct 2014 - 9:34 am | अनुप ढेरे
हे ही आठवले.
http://www.misalpav.com/node/2935
सर्किट, घाटावरचे भट आणि मुक्तसुनीत यांचे प्रतिसाद वाचनीय आहेत.
16 Oct 2014 - 12:15 pm | असंका
ढालगज म्हणजे काय?
16 Oct 2014 - 3:26 pm | बॅटमॅन
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई.
मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण.
दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे.
पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे.
वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो.
मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे.
http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%...
16 Oct 2014 - 3:35 pm | असंका
धन्यवाद...!