हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..

Primary tabs

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जे न देखे रवी...
24 Feb 2016 - 1:42 am

हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले की
स्मृतीतला गाव दिसू लागतो
त्या गाव वेशी उभा मीच मजला
पाहून अनोळखी हसू लागतो

दशकान्तुनी उभ्या तिथल्या विक्राळ वटाच्या
सावलीत जरासा बसू पाहतो
स्मरणे ती जुनी अन बदलांच्या खुणा
उद्विग्न नास्तिकासम तपासू पाहतो.

पोपटी तृणांचा जुन्हा तो जिव्हाळा
बदलाच्या भ्रांती फसू लागतो
लोभस ते जग कधीचे संपले खरा
भावनांचा उन्हाळा पुन्हा दिसू लागतो..

(कविता अपूर्णच आहे. अकरावीत असताना केव्हातरी लिहिली होती. बऱ्याच वेळा पूर्ण करण्याच्या प्रयत्न केला पण हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात तो इतका भव्य वाटणारा पण आशयाने जवळपास शुन्य होता कि ते कधीच जमले नाही. आणि हि कविता माझ्या हिशेबाप्रमाणे कडव्या-कडव्यात ट्युनिंग बदलत जाते त्यामुळे कदाचित या अशा कन्फ्युज्ड व बालिश आशयाला साजेशे स्पष्टीकरण करण्यासाठी माझ्या बुद्धीतले काव्यात्मक शब्द अपुरे पडत जातात. आलोय आता मिपावर असे जुने-नवे प्रयोग दाखवत जाइल! सर्व मंडळींना रामराम! मिपावर आज पहिलाच दिवस.. मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल)

प्रकाशचित्रणकविता

प्रतिक्रिया

सनईचौघडा's picture

24 Feb 2016 - 11:23 am | सनईचौघडा

कविता आवडली. मिपावर स्वागत.
बाकी दशकान्तुनी शब्द पाहुन मोकलाया दाही दिशा आठवली.

निशांत_खाडे's picture

24 Feb 2016 - 1:49 pm | निशांत_खाडे

धन्यवाद!

पैसा's picture

24 Feb 2016 - 9:31 pm | पैसा

११वीत लिहिलेली? शब्दांची निवड बघून वाटतंय खरं. शिवाय वृत्तात लिहावे का मुक्तछंदात यातही गोंधळ झालेला दिसतोय.

निशांत_खाडे's picture

24 Feb 2016 - 10:29 pm | निशांत_खाडे

बहुतेक त्यामुळेच पूर्ण करणे जमले नसावे!

विजय पुरोहित's picture

24 Feb 2016 - 9:39 pm | विजय पुरोहित

सुंदर रे भावा...
तुझा अगोदरचा पण लेख वाचलाय...
अतिशय हुंदर भावविश्व आहे तुझं...
माझ्यासारखंच आहे ते...
मी पण पाऊस, कृष्णमेघ, गावचा पार, भुरभुर पाऊस पाहिला आहे गावचा...
I just love it....

निशांत_खाडे's picture

24 Feb 2016 - 10:30 pm | निशांत_खाडे

मिपावर हे असे स्वागत होईल असे वाटले नव्हते..

विजय पुरोहित's picture

24 Feb 2016 - 9:40 pm | विजय पुरोहित

हुंदर = सुंदर असे वाचावे...
मोबल्या लै त्रास देतो... :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2016 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला कवितेच्या बाबतीत कडव्या कडव्यात जे ट्यूनिंग बदलत जाते आणि तो आशयही जेव्हा अधिक आशयघन होत जातो ते मला खुप आवडतं. राग येऊ द्या हवं तर. आपण बोलायला घाबरत नाही. ;)

-दिलीप बिरुटे

प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब, आपण एक चांगले समीक्षक आहात.. आपणाला माहित आहे?
काय मोजक्या शब्दात समीक्षण करता राव प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब तुम्ही!

बायदवे, पाऊस, मानवी मन, आणि भावना यांच्यात काहीच संबंध नसतो असे आपण समजता म्हणून मी आपला हा 'आशयाविशयीचा' प्रतिसाद तेवढासा सिरीयसली घेत नाहीये!

विजय पुरोहित's picture

24 Feb 2016 - 10:50 pm | विजय पुरोहित

लिहित रहा नि.खा...
कुणाला राग येऊचा तर येऊ दे...
सुंदर अप्रतिम लिहीता...
हे भावविश्व फार दुर्मिळ आहे...
गावची आठवण देणारे भावविश्व...
लिहित रहा....

निशांत_खाडे's picture

24 Feb 2016 - 11:09 pm | निशांत_खाडे

धन्यवाद! नक्कीच लिहीन!