मोह !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
12 Apr 2017 - 2:23 pm

इंटरनेट बँकींगमुळे हल्ली वर्षानुवर्ष बँकेत जायलाच लागत नाही पण काल एका पर्सनल कामासाठी जरा उशीरानं बँकेत गेलो. तिथे काम करणारी ऑफिसर ओळखीची आहे. कस्टमर्स नसल्यानं ती नेहेमीच्या सरावानं झपाझप काम उरकत होती. तेवढ्यात तिथल्या काचेच्या पार्टीशनवर लावलेल्या, सीसीटिवी इमेजसारख्या, एका फोटोकडे लक्ष गेलं.

`हे कोण ?' मी विचारलं.

`हे अनेकरुपात आणि वेगवेगळ्या बँकेत लोकांना भेटतात !' इती ऑफिसर.

`किती पैश्यावर हात साफ केलायं यांनी ?'

`नक्की कल्पना नाही पण ते एका ब्रांचला एकदाच भेट देतात' तीनं उत्सुकता वाढवली.

`काय आहे कार्यप्रणाली यांची ?' बुद्धिमत्ता मग ती कोणत्या का क्षेत्रात असेना, मला कायम इंटरेस्टींग वाटते.

'बँकेत आलेल्या सिनिअर सिटीझनला गाठायचं, आमच्या कंपनीनं सिनिअर सिटीझन्ससाठी एखादी वस्तू किंवा सेवा, मार्केटरेटच्या फिफ्टी परसेंटला देण्याची स्कीम काढलीये म्हणून सांगायचं. माणूस पटला की त्याला `तुमच्या घरी येऊन चेक घेऊन जाईन' असं सांगायचं आणि घरचा पत्ता घ्यायचा. मग घरी जाऊन रीतसर टाटा स्काय वगैरे कंपनीच्या नांवचा चेक घ्यायचा. दुसर्‍या दिवशी त्या व्यक्तीला कळतं की आपल्या खात्यातून ४०/४५ हजार काढले गेलेत !'

`ग्रेट! म्हणजे तुमच्याकडे असलेली कस्टमरची सही त्याच्याकडे ऑलरेडी अ‍ॅवलेबल असते ! .....पण कस्टमरचा ब्लँक चेक तो कुठून मिळवतो ?'

'कस्टमरनी चेक आणि फॉर्म भरुन दिला की त्याला पाणी मागायचं. तो पाणी आणायला गेला की समोरच असलेल्या चेकबुकमधून, एखादा मधला चेक अलगद काढून घ्यायचा.' तीनं कार्यप्रणाली विशद केली !

`भारतात जुगाड करणारे एकसोएकेत ! एकदम फ्लॉलेस आयडीया काढतात लोक्स. पण द बॉटम लाईन फॉर एवरी डिसीविंग रिमेन्स द सेम' मी म्हणालो.

`काये ती बॉटम लाईन ? तीनं विचारलं.

`सर्व आर्थिक फसवणूकीत एकच फासा काम करतो, मोह !' मी म्हणालो.

`येस ! ' मनापासून हसत ती म्हणाली.

अर्थव्यवहारमाहिती

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

12 Apr 2017 - 3:41 pm | सिरुसेरि

सावध केल्याबद्दल धन्यवाद .

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2017 - 4:44 pm | संजय क्षीरसागर

तोच उद्देश आहे . पण बहुतेक आर्थिक फसवणूकीत गहाळपणा बरोबर मोह नडतो हे लक्षात आलं की झालं .

हेमंत८२'s picture

12 Apr 2017 - 6:08 pm | हेमंत८२

मोह कोणाला चुकला आहे. लहान मुलाकडे एखादे चॉकलेट असेल आणि तुम्ही त्याला एखादी कॅडबरी दाखवली तर ते चॉकलेटसोडून कॅडबरी मागते आणि इथे तर पैश्याचा प्रश्न आहे. त्यामुळे RBi ला सुद्धा MLM मध्ये पैसे गुंतवूनका किंवा सेबी ला Mutual fund investments are subject to market risks. Please read the scheme information and other related documents before इन्वेस्टींग असे छापावे लागते. आणि त्याची सुद्धा जाहिरात करावी लागते.

सर्व सामान्य माणूस हे बघत नाही. अरे मला सरकारी बॅंकयेत ७% व्याज मिळते तर इथे १० % ते बोलणार्याच्या मर्जीवर पैसे मिळणारे दाखवतात आणि इथंच माणूस फसतो.

आदूबाळ's picture

12 Apr 2017 - 5:46 pm | आदूबाळ

`सर्व आर्थिक फसवणूकीत एकच फासा काम करतो, मोह !' मी म्हणालो.

"द हसल" ही मालिका पहावी असे सुचवतो.

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2017 - 5:52 pm | संजय क्षीरसागर

पण काय पॉइंटे त्यांचा ?

फसवणार्‍यांची बंटी बबली टाइप टोळी आणि ते लोकांच्या मोहाचा कसा फायदा घेतात वगैरे. मूल्यनिर्णय न करता मनोरंजन म्हणून पाहता आली तर उत्तम.

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2017 - 6:29 pm | संजय क्षीरसागर

मजेशिर असेल.

हेमंत८२'s picture

12 Apr 2017 - 5:58 pm | हेमंत८२

काय हे असे कधी घडते का? कोण तो कर्मचारी जो आपल्या ऑर्गनाईझशन बद्दल असे सांगेल. हे तर खरे बनावट आहे किंवा कोठल्या तरी मालिकेमधून उचलला आहे.
सध्या असे काही घडत नाही. हे पूर्वी खूप चालायचे. साधारणतः २००५ साली रेल्वे प्लॅटफॉर्मवर CHEQUE बॉक्स होते, लोक त्यातून CHEQUE काढून असे धंदे करायचे.
जर कोणी डुप्लिकेट सही करून जर पायमेन्ट काढले असेल तर त्या कोइ मध्ये सर्वस्वी बँकांची चुकी असते.
कदाचित आपण वाचले असेल माहित नाही पण अश्या कोणत्याही खोट्या सही प्रकारांमध्ये एक सुद्धा बँक जिंकली नाही.

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2017 - 6:39 pm | संजय क्षीरसागर

त्यामुळे कस्टमर्स आणि बँक स्टाफ दोघंही दक्ष राहू शकतात. तुम्ही पुण्यात असाल तर व्य नि करा, तुम्हाला बँकनेम आणि ब्रांच कळवतो. तुम्ही जाऊन बघून या.

हेमंत८२'s picture

12 Apr 2017 - 7:03 pm | हेमंत८२

नाही पुण्यात नाही.. पण बँक आणि ब्रांच सांगा इथे सगळ्यांनाच कळेल. आणि मला कधी जमले तर आवश्यक भेट देईन.

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2017 - 8:04 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला शंका असेल तर खात्री करुन घ्या.