Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५

अबोली२१५'s picture
अबोली२१५ in जनातलं, मनातलं
12 Dec 2016 - 12:50 pm

त्या सॅलरी स्लिप त्याने बँकेत जमा केल्यावर त्याने (आनंदाने) एक बातमी दिली तुझी सॅलरी २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे तुझं लोन फक्त १,७०,००० एवढच होऊ शकत... (काय???? बाकीचे १,८०,००० कुठून आणु.) मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी ३. ५० लाख जमा करू शकत नाही आहे. तर तू मला थोडी मदत करशील का या वर माझ्या चुलत सासूबाई आजारी आहेत माझा नवरा चेकबुक आताच घेऊन गेलाय त्यामुळे मी काही मदत करू शकत नाही तुझं तुला पाहावं लागेल. (अरे हि तर म्हणत होती कि तुझ्या पैशांची जबाबदारी मी घेते, कमी पडलं तर मी मदत करेन ) मी गप्प बसलेली पाहून ती बोलली अग त्या खूप सिरिअस आहेत त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत. मी बोलली मग मी ३. ५० जमा नाही करू शकत. आणि माझा नवरा पण काही कामासाठी मुंबई बाहेर आहे तो आल्याशिवाय पुढची मीटिंगची तारीख नको घेऊस.( मला तिला थोडं थांबावाच होत म्हणून मी परत एकदा….) यावर ती म्हणाली Mr. परेश पण बाहेर आहेत आता. मी सांगते तुला काय करता येईल ते. (येथे ती नाही बोलली असती तर मी विषय बंद करायचं ठरवलं होत पण ती काही हार मानायला तय्यार नव्हती..)

तिने दोन दिवसानी मला फोन केला कि ते ठीक आहे म्हणता आहेत तुझ्या कडे किती जमा आहेत मी म्हणाली २ लाख ती म्हणाली Mr परेश बोलले कि तू दोन दिवसाच्या आत २. ७० जमा कर (अजूनही Mr परेश थिर्ड पार्टी मार्फत बोलत होता ). मी माझ्या नवऱ्याला फोन केला त्याला लोनची procedure सुरु कर असं सांगितलं. आणि त्याला विनंती केली माऊच्या FD वर लोन करूया तो तय्यार झाला त्याच अटीवर.

माझ्या मैत्रिणीने तुझं नॅशनॅलिझ बँकेत अकाउंट आहे का ? कारण त्या अकाउंटचा चेक लागेल असं सांगितलं. माझं नॅशनॅलिझ बँकेत अकॉउंट होत ते इनाक्टिव्ह होत. आणि इकडे बँकेने माझ्या नवऱ्याला सांगितलं कि बँकेत पैसे नाही आहेत त्यामुळे लोन पुढल्या आठवड्यात होईल. (आताच का पैसे संपले… आपली वेळ आली का समोरचा माणूस लंचला जातो, किंवा मशीन बंद होते, आणि पैसे संपून जातात...)

का माहित नाही मी रात्री खूप पॅनिक झाले, मी माझ्या नवऱ्याला सांगितलं कि हि संधी मला सोडायची नाही आहे. मला माझ्या माऊसाठी चांगलं करायचं आहे.

त्याने मला शांतपणे बसवलं तो म्हणलं तू पॅनिक होऊन निर्णय घेऊ नकोस, मला वाटतय तू शांतपणे निर्णय घे. त्यांना पैसे हवे आहेत. ते तुझ्यावर दबाव आणता आहेत ती त्याची strategy आहे जेणे करून तू पैसे देऊन मोकळी होशील. ते तू पैसे देईपर्यंत तुझा पिच्छा सोडणार नाही. मी गुजराथी मारवारी लोकांबरोबर असतो त्यांना त्याची liquid आणि assets डोळ्यासमोर लागतात. यावर मी शांत झाली होती. माझा निर्णय त्याने माझ्यावर सोडला होता. पण मी पैसे जमा करण मी सोडलं नव्हतं.

नवऱ्याचा मित्राने मदत केली पण तो बोलला कि पैसे जुन्या नोटा देईन आणि कॅशमध्ये देईन. मी अडचणीत होते मला हि पैसे दयाचे होते. मला नवऱ्याने फोन करून सांगितलं कि तू हे पैसे घे आणि तुझं लोन झालं कि त्याला परत कर. माझं आणि माझ्या नवराच जॉईंट अकाऊंट असल्यामुळे मी ते पैसे आमच्या अकाउंट मध्ये भरू शकत नव्हती. कारण त्याने पण त्यांच्या वेंडरचे पैसे जमा केले होते आणि जर का मी हे पैसे आमच्या अकाउंट मध्ये जमा केले असते तर माझ्या नवऱ्याला डायरेक्ट IT enquiry लागली असती.

माझ्या नॅशनलाइझ बँकेतील अकाउंट चालू करायचं हा एकाच उपाय होता. (हे राम.... )

मी बँकेत KYC देउन आली आणि मॅडमना विचारलं किती दिवसात अकाउंट चालू होईल त्यावर ती अगाऊ बाई मला ओरडला लागली गरज असल्यावर तुम्ही येता.एक आठवडयांनी या. पेपर्स बॅकऑफिस मध्ये जातील ते verify होतील मगच येतील. (****ली सरडा छाप तिराळी.. अस्सा राग आला होत ना तिचा शांतपणे माहितीसाठी विचारलं होत तर आख्या बँकेसमोर माझ्यावर ओरडली... Frustration काढायला मीच मिळावी…. गरज आहे म्हणून येतात लोक बँकेत नाहीतर.... कंट्रोल केलं स्वतःला) शांतपणे (राग गिळून...) बाहेर पडली. मी चरफडून मंदिरात आले माझा रागावले चेहरा बघुन पुजारी काकांनी काय झालं असं विचारलं मी झालेला प्रकार सांगितलं त्यावर ते एवढेच ना माझ्या मुलाचा मित्र त्या बँकेत ब्रँच मॅनेजर होता तु माझ्या मुलाला फोन कर. मी त्यांच्या मुलाला फोन केला त्याने त्याच्या मित्राला फोन केला तो त्याच बँकेच्या मोठ्या पदावर काम करत होता, त्याने माझ्या अकाउंट नंबर घेतला आणि एक दिवसात अकाउंट चालू करून दिल.

समाजजीवनमानअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकबातमीअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

12 Dec 2016 - 1:12 pm | संजय क्षीरसागर

.

vikrammadhav's picture

12 Dec 2016 - 1:20 pm | vikrammadhav

वाचतोय !!! पुभालटा!!

गवि's picture

12 Dec 2016 - 1:26 pm | गवि

त्या गुंतवणुकीच्या कल्पनेबद्दल प्रचंड प्रभावित झाला होतात तुम्ही असं दिसतं. एक दोन नव्हे तर चांगले दहा पंधरा रेड फ्लॅग्जही तुम्हाला दिसले जाणवले नाहीत.

संदीप डांगे's picture

12 Dec 2016 - 2:18 pm | संदीप डांगे

+१

जिन्क्स's picture

12 Dec 2016 - 3:12 pm | जिन्क्स

+१

माम्लेदारचा पन्खा's picture

12 Dec 2016 - 2:26 pm | माम्लेदारचा पन्खा

लवकर लवकर....

ताई, रागावू नका, पण क्यूनेट आणि फसवणुकीव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट गेल्या काही भागांतून जाणवली - आणि ती म्हणजे अर्थसाक्षरतेचा अभाव. सॅलरी स्लिप्स घेणे, बँकांचं केवायसी पूर्ण करणे, गरजेला रक्कम उभी करण्याची क्षमता बाळगून असणे वगैरे गोष्टी या अगदी बेसिक आहेत हो.

अबोली२१५'s picture

12 Dec 2016 - 3:19 pm | अबोली२१५

कस काय ? नीट वाचून पहा मी सांगितलं कि
१) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत नाही
२) KYC मी दिल पण सगळे नोट बंदीमध्ये अडकले होते त्यामुळे खचितच त्याला वेळ लागणार होता किती तो मला पाहिजे होता
३) रक्कम उभी करण हे सोप्पं होताच पण हे मी माझ्या जबाबदारीवर उभी करतंय माझा नवराने मदत केली असती तर त्याची किंमत मला राहिली नसती या धावपळीमुळे माझा आत्मविश्वास वाढला मी कोणावर विसंबून राहिली नव्हती कि कोणा पुढे हात पसरायला लाज बाळगली नाही.

१) माझं ऑफिस सॅलरी स्लिप देत नाही

अपॉईंटमेंट लेटर, एम्प्लॉयमेंट अ‍ॅग्रीमेंट, सॅलरी स्लिप, फॉर्म १६ (टीडीएस होत असल्यास), ईपीएफचे कागद, एक्सपीरियंस सर्टिफिकेट (नोकरी सोडल्यानंतर) या गोष्टी प्रत्येक ऑफिसने देणं (वेगवेगळ्या) कायद्यांनी बंधनकारक आहे. "आपल्याकडे हे देत नाहीत" किंवा "इथे तशी पद्धत नाही" ही अकाऊंट्स / एचारवाणी ऐकून घेऊ नये. प्रस्तुत ऑफिसमध्ये तुम्ही क्ष तारीख ते य तारीख झ पदावर नोकरी करत होतात याचे हे पुरावे आहेत. जग माणसापेक्षा कागदावर जास्त विश्वास ठेवतं हे कितीही कटू असलं तरी सत्य आहे.

२) KYC मी दिल पण सगळे नोट बंदीमध्ये अडकले होते त्यामुळे खचितच त्याला वेळ लागणार होता किती तो मला पाहिजे होता

केवायसी दिलं ते गरज पडल्यावर. जर अकाऊंट जिवंत होतं तर ते केवायसी कंप्लायंट का नव्हतं? अकाऊंटची गरज नव्हती तर ते बंद का केलं नव्हतं?

-------
वरील गोष्टी प्रमाणाबाहेर कडक / किचकट वाटू शकतील. पण वेळ सांगून येत नाही. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलबाहेरच्या असतात त्याला कोणीच काही करू शकत नाही. पण ज्या कंट्रोलमध्ये असतात त्या कराव्यात असं माझं मत. किचकट आहे / वेळखाऊ आहे / आत्ता गरज नाही तर कशाला करायचं / वेळ पडेल तेव्हा बघू / करायचंय-एकदा-पण-वेळ-कुठाय या सबबींना अर्थ नाही.

अबोली२१५'s picture

12 Dec 2016 - 4:00 pm | अबोली२१५

माझ्या प्रेगन्स मध्ये माझं अकाउंट ignore झालं होत त्यामुळे ते चालू करायाच होतच. पण बर झालं ते येनकेन प्रकाराने सुरु झालं.

कुंदन's picture

12 Dec 2016 - 4:00 pm | कुंदन

आदूबाळ शी सहमत.

आदूशेठ, कायद्याची भाषा कितीही बोलली तरी बहुतेक कंपन्या आपल्या इथे एमप्लॉईला सॅलरी स्लिप मागितल्याशिवाय देत नाहीत. हे कटू सत्य आहे.

आदूबाळ's picture

12 Dec 2016 - 6:47 pm | आदूबाळ

आहे ना. म्हणून तर आवर्जून मागून घ्यायच्या असतात.

पैसा's picture

12 Dec 2016 - 3:20 pm | पैसा

अनुभव प्रामाणिकपणे लिहिताय हे आवडलेच. पण यानिमित्ताने लोक असे इझीमनीच्या मागे का लागतात असेही वाटले. नोकरी सांभाळून महिलांनी फावल्या वेळात करण्यासारखे कित्येक उद्योग असतात. कॉम्प्युटर टायपिंग, घरघंटी, मसाले तयार करून विकणे, लहान प्रमाणात केटरिंग, शिकवण्या, साड्यांना फॉल बिडिंग, भरतकाम व इतर कलाकौशल्याच्या वस्तू, रजया/पर्सेस/खेळणी/खोटे दागिने तयार करून विकणे, विमा एजन्सी वगैरे. या पूरक उद्योगांना तसे काही पैसेही लागत नाहीत. स्वबळावर असा काही व्यवसाय न करता अशा हवेतल्या धंद्याच्या ऑफरला लोक कसे काय फसतात म्हणून कुतुहल वाटत आहे.

अबोली२१५'s picture

12 Dec 2016 - 3:46 pm | अबोली२१५

easymoney नाही आहे यात मी माझा पैसा आणि वेळ देतेय अजूनही लोकांना माहित नाही आहे कि ते You tube द्वारे पैसे कसे कमाऊ शकतात आणि मी कॉम्पुटर क्षेत्रात असल्यामुळे मला माहित आहे कि SEO(Search engine optimization ) साठी कंपनी चांगले पैसे देते किंवा ऑनलाईन ad आणि प्रमोशनसाठी काही चांगल्या कंपन्या वर्षाकाठी काही लाखात खर्च करते.

तुम्ही कॉम्प्युटर क्षेत्रत आहात आणि वर उल्लेख केलेले सगळे तुम्हाला माहीत आहे, मग तर असल्या स्कीम्समध्ये केवढे फ्रॉड्स होतात याबद्दल तुम्हाला माहीत नसावे याचं आश्चर्य वाटतंय. इतके होउनही तो माणूस कोणती कंपनी, कोणते प्रॉडक्ट याबद्दल माहिती देत नाही हे तुम्हीच सांगताय. माफ करा, आधीच स्पष्ट करते की स्पेसिफिक तुमच्याबद्दल असे बोलत नाहीये, पण लोक ना खूपदा असा विचार करतात की भले फ्रॉड असेल पण मी हुशार आहे, तेव्हा याचा फुगा फुटण्यापूर्वीच मी माझे पैसे काढून घेईन. त्यामुळेही असल्या साखळ्या वाढत जातात.

भले हुशार असेलही, पण , मलम योजनेतून बाहेर पडण्याआधी खाली आपल्याच परिचित लोकांना गंडा घालून झाला असेल त्याचं काय?
किरकोळ फायद्यासाठी आपल्याच मित्र नातलगांना गंडवण्यात कांही शहाणपणा नाहीच!

संजय क्षीरसागर's picture

12 Dec 2016 - 4:45 pm | संजय क्षीरसागर

भारी मराठीकरण !

चौथा कोनाडा's picture

12 Dec 2016 - 5:36 pm | चौथा कोनाडा

मलम योजना ! :-) :-) :-)))

लै भारी ! एमएलएम स्किम पेक्षा भन्नाट वाटतयं !

खेडूत's picture

12 Dec 2016 - 3:48 pm | खेडूत

+१
कमी कष्ट/ वेळात मोठा फायदा होण्याचे आमिष हे सर्व प्रकारच्या योजनांमधले साम्य दिसते.
वर दिलेले व्यवसाय प्रकार कष्ट करायला लावणारे आहेत. पण लोकांना लवकर मोठे व्हायचे असते.
दुसर्‍याचे पाहून आपलेही तसेच होईल हा फाजिल विश्वास असतो. सगळ्याचा परिणाम म्हणून नव्या पॅकेजमधल्या योजनाना पुन्हा नव्याने फसणारे महाभाग पाहिलेत. स्किल/ कष्टाशिवाय फायदा मिळणे शक्य नाही, हे ज्याला समजते तो या मंडळींना वेळीच फटकावतो.

बबन ताम्बे's picture

12 Dec 2016 - 5:44 pm | बबन ताम्बे

काही जण इथे पण फसवणूक करतात.

http://www.misalpav.com/node/28706

पैसा's picture

12 Dec 2016 - 6:00 pm | पैसा

तसले नाय हो! वेगवेगळी अ‍ॅग्रीमेंंट्स, कसले अर्ज वगैरे पानाला २० का ३० रुपये घेऊन टाईप करून देणारे असतात बघा!

बोका-ए-आझम's picture

12 Dec 2016 - 6:17 pm | बोका-ए-आझम

त्यांच्याबद्दल बोलताय?

पैसा's picture

12 Dec 2016 - 6:21 pm | पैसा

सायबर कॅफे किंवा झेरॉक्सवाले हे टायपिंगचे काम नक्कीच करतात.

अबोली२१५'s picture

12 Dec 2016 - 3:54 pm | अबोली२१५

मी याच उत्तर संजय क्षीरसागर च्या एका प्रतिसादाला दिलाय
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४
http://www.misalpav.com/comment/907765#comment-907765

अनुप ढेरे's picture

12 Dec 2016 - 4:34 pm | अनुप ढेरे

लेखमालेचे टायटल 'फसवणूक' असले तरी धागाकर्तीच्या प्रतिसादांवरून वाटतय की त्या अजूनही या QNETमध्ये सहभागी आहेत.

अजूनही वाटत नाही आहे काहीतरी नवीन करायला मिळेल आणि त्यातून मी थोडेफार पैसे कमवून उरलेला वेळ मी माझ्या मुलीसाठी देऊ शकेन

कॉम्पुटर क्षेत्रात असल्यामुळे मला माहित आहे कि SEO(Search engine optimization ) साठी कंपनी चांगले पैसे देते

हा धागा QNETच्या प्रचारासाठी काढला असावा अशी शंका येत आहे.

सतीश कुडतरकर's picture

12 Dec 2016 - 4:56 pm | सतीश कुडतरकर

कारण त्याने पण त्यांच्या वेंडरचे पैसे जमा केले होते>>> ????

अबोली२१५'s picture

12 Dec 2016 - 5:29 pm | अबोली२१५

हे खूपच पर्सनल आहे ते मी तुम्हाला सांगु शकत नाही

संजय क्षीरसागर's picture

12 Dec 2016 - 8:06 pm | संजय क्षीरसागर

.

धर्मराजमुटके's picture

12 Dec 2016 - 5:07 pm | धर्मराजमुटके

प्लीज. लेखिकेला ४-५ भागातच शिकवणूक देण्याच्या भानगडीत पडू नका. नाहितर त्याने नाऊमेद होऊन पुढचे भाग कदाचित कधीच येणार नाही आणि सगळ्यांचे अंदाज हे अंदाजच राहतील. सगळे भाग आल्यावर तुम्ही सगळे मत मांडूच शकता.

संदीप डांगे's picture

12 Dec 2016 - 5:13 pm | संदीप डांगे

सगळे प्रतिसाद वाचून हेच मनात आले. जरा रुको तो...

पण लेखिका ताई फारच ताणतायत. मला तरी हे क्युनेट चे काय लफडे आहे ते जाणुन घेण्यात रस आहे. पण लेखिका सॅलरी स्लीप मिळवण्यात येणार्‍या अडचणी वगैरे विस्तारुन सांगत आहेत. बाकी खुप विसंगती आहेत ते वेगळेच.

पैसा's picture

12 Dec 2016 - 5:22 pm | पैसा
जव्हेरगंज's picture

12 Dec 2016 - 6:18 pm | जव्हेरगंज

लेखिका ताई फारच ताणतायत. >>>>>>> पण त्या भाग पटापट टाकतायेत. So NO problem at all..

वाईट वाटुन घेऊ नका पण तुम्ही चक्क "अहो मला फसवा ना" म्हणून त्याच्या (Mr परेश) मागे लागला होता. अशी संधी कुठला लफंगा सोडेल?
हे वाचून अॅमवे/स्वदेशी या लुच्च्या कंपन्यांची आठवण झाली. अॅमवे तर अजुन चालु आहे असं ऐकलंय.

हल्ली एखादा जुना मित्र अचानक सलगी दाखवायला लागला की आधी आडून चौकशी करतो की वीम्याचा व्यवसाय / मलेमा तर सुरु नाही ना केलं?

अजया's picture

12 Dec 2016 - 6:07 pm | अजया

वाईट वाटुन घेऊ नका पण तुम्ही चक्क "अहो मला फसवा ना" म्हणून त्याच्या (Mr परेश) मागे लागला होता. अशी संधी कुठला लफंगा सोडेल?

:)
अगदी हेच वाटलं.

बोका-ए-आझम's picture

12 Dec 2016 - 6:20 pm | बोका-ए-आझम

पण विम्याच्या व्यवसायाला MLM बरोबर जोडू नये. विमा ही गरज आहे - आयुर्विमा असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचा.

निरंजन._.'s picture

12 Dec 2016 - 7:22 pm | निरंजन._.

निःसंशय.. माझी हरकत विमा विक्रेत्यांच्या मागे लागण्याला आहे.. अर्थातच यालाही अपवाद आहेत.

नक्कीच ७२ ची चाचणी (test of 72) माहित असेल. जर एखादी गुंतवणूक १०% परतावा (returns) देत असेल तर आपली रक्कम ७.२ वर्षांत (७२/१०) दुप्पट होते. याचा अर्थ जर कोणी आपली रक्कम दोन वर्षांत दुप्पट करुन देणार असं म्हणत असेल तर याचा अर्थ परताव्याचा दर (rate of returns) हा ३६% हवा. हे अशक्य आहे. कोणीही इतका भारी परतावा देऊ शकत नाही आणि तोही छातीठोकपणे. मला वाटतं कोणीही काहीही सांगण्याअाधी किमान ही एक चाचणी करुन पाहावी. बाकी अबोलीताईंना आलेला अनुभव थोड्याफार प्रमाणात आलेला आहे. मला फोन करुन आमिष दाखवणा-या दुर्दैवाने माझ्या २ विद्यार्थिनी होत्या. दोघींचेही फोन सध्या बंद आहेत.

Dhananjay Borgaonkar's picture

12 Dec 2016 - 5:34 pm | Dhananjay Borgaonkar

हे क्युनेट प्रकरण आमच्या ऑफिसमधे सुद्धा खुप गाजलं. मुंबई ऑफिसमधेतर एक दोन लोकांनी जॉब सोडुन फुलटाईम क्युनेटमधे गेले.
माझि एक कलीग क्युनेतसाठी काम करत होती आणि तीने मला सुद्धा सांगितल तु सुद्धा जॉईन कर. मी ऐका त्यांच्या वर्कशॉपला गेलो होतो आणि तेव्हाच नाही म्हणून सांगितलं. भयंकर भावनिक अपील करताट ही लोक आणि 2,3 व्हीडियो क्लिप दाखवतात ज्यात बाकेच्या लोकांची सक्सेस स्टोरी असते. एम.एल.एम वाला हा प्रकार होता. नंतर काहीच महिन्यात बमन ईराणीच्या मुलाला यात अट्क झाली ही बातमी पेपरमधे वाचली.

संदिप एस's picture

12 Dec 2016 - 5:47 pm | संदिप एस

तिथल्या २-३ मित्रा नी संपर्क केला होता ;-)

जव्हेरगंज's picture

12 Dec 2016 - 6:17 pm | जव्हेरगंज

भारी लिहीताय!!
येऊंद्या!!