बाजाराचा कल : १० मार्चचा आठवडा
====================
मागच्या भाकीतात क्लेमास्पेस डायग्रॅममध्ये मार्केट वर जाण्याची शक्यता १००% दाखवली होती, तसेच मार्केट डुबकी मारून स्थिर होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे मार्केटने अगोदर तळ गाठला आणि मग उसळी मारली. माझ्या अल्पमती प्रमाणे मार्केटने सध्या तरी तळ गाठला आहे, पण हे माझे वैयक्तिक मत आहे. काही तज्ज्ञ अजूनही घसरगुंडीची शक्यता असल्याचे सांगत आहेत. पुढच्या तिमाहीने निराशाजनक आकडे दाखवले तर कदाचित हे शक्य आहे.
आकृती १ - निफ्टीचा क्लेमास्पेस डायाग्रॅम मार्केट वर/खाली जायची शक्यता ८१/१९% दाखवत आहे. पुढील आकृतीमध्ये तांबडा ठिपका बाजार १ल्या डोळ्या जवळ पोचल्याचे दिसत आहे (मागील आठवड्यात हा तांबडा ठिपका डावीकडे खालच्या कोपर्यात होता). त्यानंतर मधे असलेला डोळा जास्त प्रकाशमान आहे. त्यामुळे मध्यम कालीन अंदाज- बाजार वर जाणार हे नक्की! पण अल्पकालीन अंदाजासाठी युयुत्सुनेटची मदत घेणे योग्य ठरेल.
आकृती २ - सोने वर/खाली जायची शक्यता ४३/५७%
आकृती ३ - युयुत्सुनेट मात्र पुढच्या आठवड्यात नकारात्मक अनिश्चितता दाखवते आहे.
मागील आठवड्याचे भाकीत इथे पहा -https://www.misalpav.com/node/52774
टीप- बाजारातील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवर करावेत. युयुत्सुनेटवर डोळे मिटून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.
प्रतिक्रिया
9 Mar 2025 - 1:46 pm | आंद्रे वडापाव
21500 - 19800 या रेंज मधे नेतील १ ते २ महिने तिथेच ताटकळत ठेवतील...
9 Mar 2025 - 1:49 pm | आंद्रे वडापाव
दुरुस्ती: 21500 - 19800 ही रेंज ... पुढच्या आठवड्यात येईल असं मला म्हणायचं नाहीये...
तरसवत तरसवत नेतील....२-३ महिने तर सहज घेतील....
9 Mar 2025 - 2:53 pm | युयुत्सु
२१५०० जवळ जबरदस्त आधार-क्षेत्र तयार झाले आहे. बघू या!
9 Mar 2025 - 6:42 pm | वामन देशमुख
धाग्यांवर आणि निफ्टीवर लक्ष ठेवून आहे याची पोचपावती.
10 Mar 2025 - 11:50 am | युयुत्सु
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी काही निर्णायक माहितीची आणि त्यातून मिळणार्या आघाडीची ("एज") गरज असते. डेटाची कल्पकतेने मांडणी करून वेगवेगळी कल्पनाचित्रणे (व्हिज्युअलायझेशन) तयार करून अशी निर्णायक आघाडी मिळू शकते.
पुढे ओएन्जीसीच्या एका मॉडेलचे ३डी कल्पनाचित्र तुफान खरेदीचा सपाटा दाखवत आहे. अशी सपाटून खरेदी झाली की किंमत पण किंचित भरकटते आणि मग नंतरच्या सत्रात शेअर घसरतो
आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे वेगवेगळे फॅन्सी मॉडेलचे नखरे कशासाठी? तर त्याचे उत्तर असे - वेगवेगळी मॉडेल्स जेव्हा एकच गोष्ट सुचवतात, ते घडायची शक्यता खुप असते.
12 Mar 2025 - 10:34 am | युयुत्सु
मंडळी,
कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की युयुत्सू-नेट आता "पूर्णत्वास" पोचले आहे! प्रायोगिक चाचण्यांमध्ये ते पैसे कमवण्यात यशस्वी झाले असून त्याची भूतकालीन कामगिरी पुढील आकृतीमध्ये स्पष्ट दिसत आहे. यात फक्त ब्रोकरेज आणि वेगवेगळे कर यांचा विचार केलेला नाही.
पुढील आकृतीत तांबडा आलेख भाकीतांनी मिळवलेले पैसे दाखवतो, काळा आलेख प्रत्यक्ष निफ्टीची कामगिरी दाखवतो.
आता काळी रेघ वर हवी की खाली यावर काही जण आक्षेप घेऊ शकतात पण भविष्यात युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे.
