चौकस
निवेदक : तेंव्हा मंडळी .............. अपराध पोटात घाला चुकलं माकलं माफ करा.
( एक लहान मुलगा हेल्मेट घालून स्टेजवर येतो.)
अरे हे कोण आले. ए बाळा काय हवय तुला. आणि इथं कसा आलास? ए बाळा...... अरे ए बाळा.
मुलगा : ( हेल्मेट काढतो ) काय म्हणालात ओ काका अज्जिबात ऐकू आलं नाही. हेल्मेटमुळे काही ऐकूच येत नाही
बघा.
निवेदक: अरे मी विचारले कोण आहेस तू. इथे काय करतोयेस? ते हेल्मेट का घातले आहेस.
मुलगा: ओ काका मी मीच आहे. माझी आई म्हणते की उगाच नसत्या चौकशा करणार्या चहाडबुचक्या माणसाना
अज्जिब्बात नाव सांगायचे नाही.